•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज

विश्व संवाद केंद्र - पुणे 6 days ago
व्यक्तिविशेष  

                    हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज

                          ॥ देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥१॥
                                  देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥२॥
                             गुणाची करूनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥३॥
                       जीव शिव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥४॥
                           विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥५॥
                                   मनबुद्धीची कातरी। रामनाम सोनें चोरी ॥६ ॥
                         ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥७॥
                                  खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥८॥
                     नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९॥

महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीत उठून दिसणारे एक नाव म्हणजे मगवद्भक्त नरहरी सोनार. आज माघ कृष्ण ३ शके १२३५ रोजी त्यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली.

श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे संवत शके १११५ श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी बुधवार रोजी पहाटे प्रातःकाळी झाला. त्यांच्या बारशाचे दिवशी महानयोगी चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज आले आणि त्यांनीच या बाळाचे नाव नरहरी ठेवले. वयाचा सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडुन गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाच्या अठरा-वीस दरम्यान गंगाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. साल सुमारे १२७६ असावे आशा तर-हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखा-समाधानाने सुरु झाला.
नरहरी सोनार हे आरंभीच्या आयुष्यात एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याही देवाचे दर्शन घ्यावयाचे नाही,असा त्यांचा बाणा होता. प॑ढरपूरला राहूनही त्यांनी कधी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. एकदा एका विठ्ठलभक्त सावकाराने विठोबाच्या कमरेस येईल, असा  सोन्याचा करगोटा करण्याचं काम नरहरी सोनारंना सांगितले.  परंतु माप घेऊनही करगोटा लांब तरी होत असे किंवा आंखूड तरी होत असे. असे चारपांच वेळा घडले, तेव्हा डोळे बांधून नरहरी महाराज देवळात गेले आणि विठ्ठलास चाचपू लागले.  तेव्हा त्यांच्या हातांना पांच मुखे, सर्पालंकार, मस्तकीं जटा व त्यांत गंगा अशी शंकराची मूर्ती लागली. तेव्हा त्यांनी डोळे उघडले. तो पुढे विठ्ठलाची मूर्ती!  पुनः डोळे झाकले तर पुन्हा शंकराची मूर्ती! असा प्रकार पाहिल्यावर हरिहर हे एकरूपच आहेत याचा बोध त्यांना झाला.

नरहरी सोनार वारकरी मंडळात येऊन मिळाले. याबद्दलचा त्यांचा अभंगही प्रसिद्ध आहे-
                                                        शिव आणि विष्णु एकचि प्रतिमा। ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥१॥
                                                              धन्य ते संसारीं नर आणि नारीं। वाचें हरि हरि उच्चारिती॥२॥
                                                            नाहीं पै तो भेद अवघाचि अभेद। द्वेषाद्वेष संबंधा उरी नुरे ॥३॥
                                                              सोनार नरहरि न देखे पै द्वैत । अवधा मूर्तिमंत एकरूप ॥४॥

शिव आणि विष्णु यांच्यांत भेद नादी असा प्रचार महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने जोमाने केला. त्यामुळे शैव-वैष्णवांचे वाद येथे मुळीच माजले नाहीत. नरहरी सोनारांच्या चरित्रात याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. ज्ञानदेवांच्या तीर्थयात्रेत ते होते. ज्ञानदेवादी भावंडांवर त्यांची फारच भक्ती बसली.
माघ व. ३ रोजी नरहरी सोनार समाधिस्थ झाले.  त्यांच्या पवित्र स्मृतीस शतशः वंदन.

संत नरहरी सोनार
 
हरि-हराचा वाद मिटवणारे संत नरहरी महाराज

वारकरी संप्रदायात,संत वाङ्मयात संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांचे नाम निर्देशित केल्या शिवाय ते पूर्ण करता येणार नाही. विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा, वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.

वारकरी संप्रदायातील शैवपंथी, हरि-हराचा वाद मिटवण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक असूनही, जीवन विठ्ठलमय करणारे संत नरहरी महाराज यांच्याबद्दल थोडेसे..  

ईश्वरनिष्ठा :

मानवाला जीवानातील स्वास्थासाठी मानवाला ईश्वराची आराधना करावीशी वाटते. मात्र अनित्य भौतिकतेच्या ठिकाणी जडलेली आसक्ती त्याला भगवंताची आठवण करू देत नाही. त्यामुळे ईश्वर विषयक ओढ अशी राहात नाही. काही वेळा मात्र मानव या दृष्टीने प्रयत्न करताना आढळतो. या ओढीने त्याच्या हातून निर्हेतुक साधना झाल्यास ती त्याला ईश्वर प्राप्ती पर्यंत नेऊ शकते. मानवाला ईश्वर निष्ठ होण्याची प्रेरणा संत, सत्पुरुष, वा सद्गुरुकडून प्राप्त होवू शकते. तशी साथ लाभल्यास त्याचे जीवन कृतार्थ होते. भगवंताखेरीज साऱ्या गोष्टी अनित्य आहेत अशी संत शिकवणूक देतात. आणि त्याची ईश्वराबद्दलची निष्ठा वृद्धिंगत करतात. गीतेमध्येही या संबंधी उल्लेख आढळतो. "अनित्य असुखं लोक इमं प्राप्य भजस्व माम् ।

भगवत् प्राप्तीसाठी अनेकानेक साधने आहेत.त्यापैकी भक्ती हे साधन सर्वात श्रेष्ठ व सुगम असे आहे. त्यातही नामस्मरणासारखी सुलभ साधना नाही. नाम साधनामुळे मन शुद्ध होत जाते. प्रत्यक्ष शंकरानी राम नामाच्या स्मरणाने हालाहाल सारखे विष पचविले. श्री नाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात; ऐसा श्री रामनाम प्रताप । जेणे विष हलाहल ताप । भस्म झाला आपोआप । ते परम जाप्य जाण माझे ।

लोक प्रबोधन :

सात शतकांहून अधिक वर्षे होऊन गेली. श्री ज्ञानदेव प्रभृति संतानी भारतभर भारतीय संस्कार व संस्कृतीचे जागरण केले. समाजाला जागे केले. तो संक्रमणाचा काळ होता. कर्मकांड,व्रत, वैकल्ये याना ऊत आला होता. सामान्य जनता आपल्या मनाप्रमाणे वागत होती. कोणतीही वैचारिक बैठक उरली नव्हती. ही परिस्थिती घालविण्यासाठी आणि जन मानसात स्थिरता आणण्यासाठी संतानी नाम महात्म्य समाजात प्रसृत केले.
अशा सर्व श्रेष्ठ साधनाची जनमानसात संस्थापना करण्यासाठी निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या ठिकठिकाणी संतांचा मेळा कार्यरत झाला. धर्म हा सबळांचा असून तो सनातनत्व व संत प्रवृत्ती जागविणारा आहे याची जाण संतानी आपल्या आचरणानी समाजाला करून दिली. या संतांच्या मेळाव्यात सर्व जाती जमातींच्या संतांचा समावेश होता. मानव कोणत्याही कुळातला वा जातीतला असो त्याला संतपद प्राप्त करून घेता येते हे रूढ केले.

पंढरीतील संत मेळा :

सातशे वर्षापूर्वी असाच संतांचा मेळा पंढरपुरी जमला. ज्ञानदेवांनी त्यांचे नेतृत्व केले. संत चोखामेळा, रोहिदास चांभार, गोरोबा कुंभार, सावतामाळी, नामदेव शिंपी, नरहरी सोनार, सेना न्हावी आदी संत मंडळी विठ्ठल भक्तीने भारून जनसामान्यात परमार्थ विचार समर्थपणे मांडून जन जागरण करू लागली. पंढरीरायाच्या चरणाश्रयाने प्रपंच आणि परमार्थ साधून सर्वजनाना धर्माची, नितीची, सदाचाराची, स्वकर्तव्याचरणाची आपल्या स्वतःच्या आचरणाने गोडी लावली.

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.