•  28 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीत 'समान नागरिक संहिते'ची मागणी

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
बातम्या  

राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीत 'समान नागरिक संहिते'ची मागणी
समालखा येथे बैठक संपन्न

समालखा, हरियाणा (२६ जुलै २०२६):
राष्ट्र सेविका समितीची अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाची अर्धवार्षिक बैठक आज समालखा येथे पार पडली. या बैठकीला समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी जी, प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री जी यांच्यासह ४० प्रांतांमधून ४८८ प्रतिनिधी उपस्थित होत्या.

बैठकीमध्ये फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत विविध स्तरांवर झालेल्या समितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. गेल्या ६ महिन्यांत कार्य विस्तारलेले जिल्हे, तसेच शाखा आणि 'मिलनां'च्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या देशातील ८५२ जिल्ह्यांमध्ये ४,८८६ शाखा आणि १,१७३ मिलन सक्रिय आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यविस्तारासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांवर बैठकीत चर्चा झाली. यासोबतच सध्याची सामाजिक परिस्थिती, महिला व तरुणांचे प्रश्न आणि त्यांच्या संभाव्य उपायांवरही सविस्तर मंथन करण्यात आले.

- समान नागरिक कायद्याचा ठराव संमत
तीन दिवसीय बैठकीच्या अंतिम दिवशी लोकसंख्या असंतुलनाची कारणे आणि त्याच्या परिणामांवर सविस्तर चर्चा झाली. या विषयावर तीव्र चिंता व्यक्त करत एक महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारांनी सर्व समुदायांसाठी 'समान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण' आणि 'समान नागरिक संहिता' (UCC) लागू करावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

- शांताकुमारी जी यांचे मार्गदर्शन
बैठकीच्या समारोप प्रसंगी बोलताना प्रमुख संचालिका शांताकुमारी जी म्हणाल्या, "कुरुक्षेत्राची भूमी ही मनातील द्वंद्व समाप्त करून स्थिर मनाने समाजहितासाठी दृढ संकल्प घेण्याचा संदेश देते. धर्मसंस्थापनेसाठी सर्वस्वाचे समर्पण करण्याचे संकेत देणाऱ्या या भूमीकडून प्रेरणा घेऊन, आपल्याला गुणवत्तापूर्ण कार्यविस्ताराचा दृढ संकल्प करायचा आहे. सोबतच एक कार्यकर्ता म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवून ते संघकार्यासाठी उपयुक्त बनवायचे आहे. ९० वर्षांचा प्रवास पूर्ण करून आता शतकाकडे वाटचाल करताना आपली पावले ध्येयाच्या दिशेने अधिक मजबूतीने व निरंतर पडली पाहिजेत.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • राष्ट्र सेविका समिती
  • समालखा
  • हरियाणा
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (174), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (86), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.