•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

उद्या निगडीत जाहीर व्याख्यान

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 11 days ago
बातम्या  

 

उद्या निगडीत जाहीर व्याख्यान

- कै.भय्याजी काणे जन्मशताब्दी निमित्त अतुल जोग यांचे जाहीर व्याख्यान
- पूर्वांचल व तेथील परिस्थिती विषयावर व्याख्यान

दि.७ चिंचवड (प्रतिनिधी)
 
     पूर्वांचलातील राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणारे कै.भय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अतुलजी जोग यांच्या जाहीर व्याख्यानाचे दि.८ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
         पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान , स्व.तात्या बापट स्मृती समिती तसेच जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील कै.मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर २५, प्राधिकरण या ठिकाणी रविवार दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.अमरजी लांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिनजी सोनिगरा यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       भारताच्या पूर्वोत्तर भागात आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय अशी छोटी राज्ये आहेत ही ठिकाणे अंतर, पहाडी क्षेत्र दळणवळण अभाव यामुळे मुख्य प्रवाहापासून वेगळी पडली होती इथल्या धर्मांतरण, फुटिरता, हिंसा या सर्व आव्हानाचा सामना करून त्यावर उपाय काढून राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशभक्तांपैकी एक असलेले भय्याजी काणे यांच्या जीवनाविषयी व तेथील चित्तथरारक परिस्थिती विषयी अतुलजी जोग बोलणार आहेत. वक्त्यांनी देखील जवळपास २० वर्षे त्याच भागात पूर्णवेळ सेवा कार्य केले असल्याने थेट तेथील परिस्थिती आपल्याला जाणून घेण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने व्याख्यानाचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • शिक्षणाचा पाया
  • व्याख्यान
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.