•  11 Mar 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संघाची समन्वय बैठक केरळात

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 19 days ago
बातम्या  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

पुणे, विश्व संवाद केंद्र ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदाच घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली होती. संघप्रणित संघटनांमध्ये काम करणाऱ्या संघटनांचे प्रमुख अधिकारी यात सहभागी होत असल्याने बैठकीला विशेष महत्त्व आहे. या सर्व संस्था सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रात लोकशाही पद्धतीने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक कार्य करत आहेत.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या कामाची माहिती व अनुभव यांची देवाणघेवाण करतील. राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती, अलीकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवरील योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सर्व संघटना चर्चा करतील.

आदरणीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, आदरणीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे  आणि सहाही सहसरकार्यवाह बैठकीला उपस्थित असतील. तसेच संघाचे इतर प्रमुख अधिकारी यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह विविध संघ प्रेरित 32 संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटना मंत्री आणि प्रमुख अधिकारी सहभागी होतील.
 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • सघ
  • RSS
  • समन्वय बैठक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (144), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.