उपासना नारीशक्तीची
‘हरित घर’ संकल्पना जनमानसात रुजविणाऱ्या पर्यावरणदूत आरतीताई
आपले बहुसंख्य सण निसर्ग धरणीमाता आणि कृषी संस्कृती विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देणारे आहेत. आरती देशपांडे या पर्यावरणाबाबत नागरिकांचा दृष्टिकोन बदलणे, जागरुकता आणणे यासाठी विदर्भात काम करतात. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांचा संपर्क अभाविपशी आला. त्यातून त्यांना सामाजिक कार्याची आणि पर्यावरणाची आवड निर्माण झाली.
नोकरी करायची नाही असे त्यांनी आधीच ठरवले होते त्यामुळे पूर्ण घराला आणि आपल्या आवडीच्या कामांना वेळ द्यायचा असे त्यांनी ठरवले. त्यांच्या मते पर्यावरण रक्षण करणे म्हणजे फक्त झाड लावणं असे नाही तर प्रत्येकाने आपलं मानस परिवर्तन करणे आवश्यक आहे त्यासाठी स्वतःपासून बदल घडवणे यासाठी अगदी कोणीही सहज करू शकेल असे उपाय त्या सुचवतात उदा.. घरातील प्लास्टिकचा कचरा पिशव्या रॅपर हे सर्व एका बाटलीत वरून ती बाटली कचऱ्यात टाकणे हा उपक्रम त्यांनी नागपूरमधील अनेक शाळांमध्ये राबविला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. शाळेतील विद्यार्थी त्यामुळे प्लास्टिक गोळा करत घरी व शाळेत स्वच्छतादूत बनली . त्यासाठी त्याआधी शाळेत जाऊन मुलांना स्वच्छतेचे महत्व जाणून दिले त्या म्हणतात फक्त सांगून आणि विरोध करून काहीच होत नाही प्रत्यक्षात आपण घरी, कामाच्या ठिकाणी पर्यावरण पूरक जीवनशैली कशी असावीहे अंगीकारायला हवे.
कचरा करतो कोण ? आपण. म्हणून विरोध न करता छोटे छोटे उपाय त्या सुचवितात घरातील कचरा घरातच जिरवणे ओला सुका कचरा वेगळा करणे घरच्या कचऱ्यापासून खत निर्माण करणे माती तयार करणे यासाठी त्या कार्यशाळा घेतात.
नागपूर महापालिकेसोबत त्यांनी बाजारातील सर्व दुकानदारांकरिता ‘पॉलिथिन नको रे बाबा’ ही चळवळ चालविली. प्रत्येकाने खरेदीसाठी कापडी पिशवी चा वापर करणे याचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला व बाजारातील कचऱ्याचे प्रमाण कमी झालेले दिसून आले अशा छोट्या-मोठ्या उपक्रमातूनच आपण समाजाचे लोकांचे मानस परिवर्तन करून पर्यावरणाविषयी लोकांच्या दृष्टिकोन बदलू शकतो. यासाठी. आपलं घर हरित घर ,आपली शाळा हरित शाळा, हरित देवस्थान, हरित ऑफिस कसे होईल असे प्रत्येकाने ठरवायला हवे.
‘हरित घर’ ही संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी आणि असे अनेक छोटे-मोठे प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. येणाऱ्या पिढीला आपण चांगले पर्यावरण देऊ शकू असा आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे
लेखक – शीतल बसाकरे