•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

विश्वविजेती दिव्या देशमुख : हुशारी आणि सौंदर्याचा मेळ

विश्व संवाद केंद्र - पुणे 19 days ago
क्रीडाविश्व  

विश्वविजेती दिव्या देशमुख : हुशारी आणि सौंदर्याचा मेळ


दिव्या देशमुखने आज इतिहास घडवला आहे. तिने आता बुद्धीबळात वर्ल्ड कप जिंकून ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली आहे. एवढेच नव्हे, तर तिने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर ही पदवीसुद्धा प्राप्त केली आहे. तिच्या या सुंदर कामगिरीबद्दल तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्यासाठी ती पात्र देखील आहे.

- श्वेता सरदेसाई, पुणे

- दिव्या देशमुखचे बालपण
दिव्याचा जन्म नागपूरमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. तल्लख बुद्धिमत्ता ही तिच्या कुटुंबात आधीपासूनच आहे. तिचे आई-वडील, नम्रता आणि जितेंद्र देशमुख, स्वतः डॉक्टर आहेत. तिचे शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर येथून झाले. ती सुरुवातीला चेस आवड म्हणून खेळायला लागली, नंतर ती आवड तिच्या करिअरमध्ये बदलली. आणि मग तिने मागे वळून पाहिले नाही. तिने या खेळात खूप यश मिळवले. याचा अर्थ तिने अपयश पाहिले नाही का? तर तसे मुळीच नाही आहे. तिने अपयश देखील पाहिले, पण त्या अपयशातून तिने बोध घेतले आणि ते तिच्या पुढच्या खेळात अमलात आणले. ही खरी एका चॅम्पियनची ओळख असते.

- चॅम्पियन बनण्याकडे पाऊले
२०२१ मध्ये दिव्या देशमुख भारताची २१ वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली. तिने २०२२ ची महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तिने २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक कांस्यपदकही जिंकले. ती सुवर्णपदक विजेत्या FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२० संघाचाही भाग होती. डिसेंबर २०२४ रोजी, ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू आहे.
२०२३ मध्ये, अल्माटी येथे तिने आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर तिने टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात शेवटचे सीडिंग असूनही महिलांच्या रॅपिड विभागात पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेत तिने हरिका द्रोणवल्ली, वंतिका अग्रवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी, इरिना क्रश आणि निनो बत्सियाश्विली यांना पराभूत केले, महिला विश्वविजेत्या जू वेंजुन आणि ॲना उशेनिना यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि पोलिना शुवालोवा हिच्याकडून तिचा एकमेव पराभव झाला.


मे २०२४ मध्ये, देशमुख शारजा चॅलेंजर्स स्पर्धेत विजेती ठरली. एक मोठी ओपन टूर्नामेंट जिंकल्याने तिला पुढच्या वर्षी शारजा मास्टर्समध्ये स्थान मिळाले. जूनमध्ये, ती २०२४ ची FIDE वर्ल्ड 20 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेची विजेती बनली. २००१ मध्ये कोनेरू हम्पी, २००८ मध्ये हरिका द्रोणवल्ली आणि २००९ मध्ये सौम्या स्वामीनाथन यांच्यानंतर ती जागतिक ज्युनियर मुलींचे विजेतेपद जिंकणारी चौथी भारतीय ठरली. अंतिम फेरीत विजयाची आवश्यकता असताना, तिने पाच तासांच्या दीर्घ लढतीत बल्गेरियाच्या तिसऱ्या मानांकित बेलोस्लावा क्रॅस्टेवाला पराभूत करून संभाव्य ११ पैकी १० गुण मिळवले आणि सुवर्णपदक जिंकले. सप्टेंबर २०२४ मध्ये, तिने २०२४ मध्ये झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सांघिक सुवर्ण तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली.



- वर्ल्ड कप
कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील वर्ल्ड कप महिला बुद्धिबळ स्पर्धा जॉर्जिया येथे सुरू आहे. दोघींमध्ये पहिला व दुसरा डाव बरोबरीत सुटला. आजच्या तिसऱ्या डावात दिव्या देशमुख ही विजेती ठरली आहे आणि वर्ल्ड कप तिच्या नावावर झाला आहे. आतापर्यंत तिने महिला ग्रँडमास्टर आणि वर्ल्ड कप विजेतेपद जिंकले आहे आणि ती आणखी विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

या वेळी तिच्या पेहरावात काही खास गोष्ट आढळली असेल, तर ती म्हणजे तिच्या नखांना तिने जे नेलपेंट लावले होते, त्याच्या एका बोटावर तिने चेस बोर्डचे डिझाइन काढले होते.
जेवढे विश्वविजेती बनण्यात तिचे श्रेय आहे, तेवढेच तिच्या आई-वडिलांचे देखील आहे. खासकरून तिच्या आईचे. त्या डॉक्टर असूनही त्यांनी दिव्याच्या करिअरसाठी त्यांची प्रॅक्टिस सोडली आणि तिला पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे आपल्याला आज एक विश्वविजेती मिळाली.
________________________________________


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • दिव्या देसमुख
  • विश्वविजेती
  • बुद्धिबळ
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.