•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

हिंदूंनो , ' शिवचरित्र असे वाचा !!

हेमंत सांबरे (Hemant Sambare) 6 days ago
दिन विशेष   व्यक्तिविशेष  

 

                             

 

अलीकडे अशा बऱ्याच गोष्टी खोट्या स्वरूपात मांडण्याची सुरुवात झाली आहे  , मग या खोट्या गोष्टींना उचलून धरून त्यांना प्रसारित करण्याचे पद्धतशीर काम सुरू केले जाते , अशावेळी ज्यांचे योग्य वाचन नाही वा अभ्यास नाही असे नव-वाचक संभ्रमित होतात ...या सगळ्याला छेद द्यावा यासाठी हा लेख !

छत्रपती शिवराय हे आज नुसत्या महाराष्ट्राचे नव्हे , नुसत्या भारताचे नव्हे तर अवघ्या विश्वाचे आदर्श आहेत यात काय संशय ?  पण जेव्हा याच शिवरायांचें चरित्र नेमके कसे वाचावे ?  त्याकडे बघताना कसे बघावे , हे आज सांगून टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे .

 हा अभ्यास करताना व त्याकडे तटस्थपणे बघताना चार प्रकारचे कालखंडात त्यास विभागणी करावी लागेल .

 

१ . शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र व भारत

हा काळ म्हणजे प्रचंड धामधुमीचा व हिंदूंसाठी (जे इथले मूळ रहिवासी ! ) पारतंत्र्यात राहण्याचा होता .  साधारणपणे १५६५ च्या दरम्यान  विजयनगरचे हिंदू साम्राज्य पाच मुस्लिम शाह्यानी एकत्र येऊन नष्ट केले ..यात सगळ्यात मुख्य मुद्दा असा  होता की विजयनगर चा शेवटचा राजा रामदेवराय हा काहीसा सर्वधर्मसमभाव ( हा शब्द वा वृत्ती तेव्हा सार्वत्रिक नव्हती , पण रामदेवराय मात्र त्याप्रमाणे राज्य चालवीत होता ) पाळत होता याच कारणाने त्याच्या या राज्यात दोन मुस्लिम सरदार अतिशय महत्त्वाच्या पदावर जाऊन बसले होते ...१५६५ ला आजूबाजूच्या पाच बहामनी मुस्लिम राज्यांनी एकत्र येऊन या विजयनगरच्या हिंदू राज्यावर निकराचा हल्ला केला ...ऐन युध्दात रामरायाच्या या दोन मुस्लिम सरदारांनी खाल्लेल्या मिठा बरोबर गद्दारी करून धर्माला जास्त महत्व दिले व  बहामनी राजांच्या बाजूने जाऊन मिळाले  , व त्यामुळे विजयनगर चा मोठा पराभव झाला . मग मात्र सर्वधर्मसमभाव पाळणाऱ्या व अखंड सावध नसणाऱ्या  या रामदेवरायाला ठार मारले गेले व त्याचे मस्तक अहमदनगरच्या निजामशहा ने त्याच्या महालाचे सांडपाणी जेथे पडते तेथे ठेवले व त्या मस्तकावरून त्यांनी अंघोळ वा इतर विधी केलेले पाणी वाहू लागले ...विजयनगर चे साम्राज्य नुसते उध्वस्त झाले नाही तर तेथील अनेक मंदिरे भ्रष्ट झाली , अनेक मंदिरे जमीनदोस्त झाली , त्यांना वाचवायला कोणताही समभाव आला नाही की या परक्या आक्रमकांनी रामदेवराया सारखा विचार केला नाही . अनेक प्रकारचे अनमोल ठेवे नष्ट - भ्रष्ट केले गेले  ..आजही हंपीला आपण गेलो व हे चित्र पाहिले की मन सुन्न -भग्न होऊन जाते ..विजयनगरच्या उदाहरणाने परत एकदा सिद्ध झाले की हे नुसते राजकीय आक्रमण नव्हते तर हे धार्मिक आक्रमण ही होतेच होते !

त्याचवेळी शिवरायांचे आजोबा , वडील ( अनुक्रमे मालोजी राजे ,शहाजी राजे ) हे महाराष्ट्रातील वेरूळ मधून वेगवेगळ्या शाह्यांची चाकरी करत होते त्यांनी विजयनगर चे विध्वंसक चित्र बघितलेच होते , व त्यांच्या ही मनात याचे खूप दुःख झालेच असेल हे नक्की ! हिंदूंना कुणीही वाली उरला असा नव्हता ! हिंदूंचे देव , मंदिरे जागोजाग पाडली जात होती . त्यावेळी शहाजी राजे-जिजाऊ  जागे झाले , त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटून उठली ..त्यांनी ठरवले की या सगळ्यात आपले स्वतःचे- हिंदूंचे असे स्वराज्य असले पाहिजे ..विजयनगर चे बुडालेले राज्य हा त्यांच्यासाठी एक धडा होता , की अखंड सावधान कसे राहावे व धर्म हे वेगळेच असतात , व हिंदूंवर जो अन्याय, अत्याचार होत होता तो धर्म भिन्न असल्यानेच होत होता ...

म्हणजेच शिवरायांच्या जन्मापूर्वी हे असे महाराष्ट्र व भारताचे चित्र होते ...जेव्हा खूप खूप गडद अंधार दाटून येतो , तेव्हाच  आशेचा एका छोटासा किरण ही खूप मोठे काम करत असतो ...आणि हा आशेचा किरण म्हणजे शहाजी-जिजाऊ यांच्या मनात पेटून उठलेली हिंदूंवरील अन्यायाची चीड !

२. शिवरायांचा काळ

मग शिवनेरीवर १६३० साली एका नव्या सूर्याचा उदय झाला , शिवरायांचा जन्म झाला ! तशी  महत्वाची  घटना , पण शहाजी-जिजाऊंच्या  मनातील आगामी योजनांना मूर्त स्वरूप द्यायचे अजून बाकीच होते , अंधार अजून पूर्ण मिटला नव्हता , पण योजना आकारास येऊ लागली होती ..

ही योजना होती स्वराज्याची! हिंदवी म्हणजेच हिंदूंच्या स्वतःच्या राज्याची ! कारण ही मूळ भूमी हिंदूंची असूनही ते मात्र उपेक्षित झाले होते , गुलाम झाले होते ! पण त्याचवेळी त्यांचा स्वाभिमान मेला होता ..जे मराठे वा हिंदू सरदार मुस्लिम शाह्यांची चाकरी करत होते , ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत होते , त्यांना सर्वसामान्य रयतेचे काही घेणेदेणे नव्हते ! त्या हिंदू सरदारांचा ही स्वाभिमान केव्हाच संपला होता , त्यांच्या देखत मुर्त्या ,मंदिरे , पुजास्थाने भ्रष्ट , नष्ट होत होती , व ते फक्त बघत होते ! अशावेळी जिजाऊ व शहाजी यांचा स्वाभिमान जागा झाला व हेच स्वतत्व त्यांनी शिवाजी व संभाजी यांच्यात बीजारोपण करण्यास सुरुवात केली .

जिजाऊ आपल्या शत्रूला खूप व्यवस्थित ओळखून होत्या ..व मराठे सरदारांना ही तशाच ओळखून होत्या ,त्यामुळे शिवरायांना त्यांनी शस्रांचे शिक्षण तर दिलेच पण त्यापेक्षा ही जास्त त्यांनी व्यवहार व माणसे कधी ओळखावी हे शिकवले . त्यावेळी श्रीमंत मराठे व हिंदू सरदारांचा स्वाभिमान जरी मेला होता , पण त्याचवेळी सर्वसामान्य डोंगर-दर्यात राहणारे गरीब मावळे , स्वतःचा देवाचा  धर्माचा  अभिमान बाळगून होते , त्यांना गरज होती फक्त कुणीतरी येऊन मायेने , ममतेने पाठीवर हात ठेवून आपलेसे करणारे ! जिजाऊ व शिवराय यांनी हे बघितले व कुठलाही उच्च-नीच , जातपात असा भेदभाव न करता या अठरापगड मावळ्यांना त्यांनी जवळ केले व त्यांच्या मनात  स्वातंत्र्याची ज्योत पेटवली ...येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की पारतंत्र्यातून बाहेर येणे हा मुख्य उद्देश कदाचित नंतर पुढे आला किंवा समजला असेल पण प्राथमिक प्रेरणा धर्मिकच होती  प्राथमिक प्रेरणा हीच होती की हिंदू देवांचा , देवतांचा , मंदिरांचा होत असलेल्या अपमानाची चीड  आणी ही चीड उच्चपदस्थ लोकांपेक्षा , साध्या-भोळ्या जनतेत जास्त होती ...याच अपमानाचा सूड घेण्याची गरज शिवरायांनी  मावळ्यांमध्ये रुजवली व त्यातून आकार घेऊ लागले हिंदूंचे स्वतःचे राज्य , स्वराज्य ! 

हे स्वतःचे राज्य सर्वधर्मीयांचे असे नव्हते पण हिंदूंमधील सर्व अठरापगड लोकांचे मात्र होते ! कारण तेव्हा सर्वधर्मसमभाव वगैरे ची संकल्पना नव्हती  ,  किंबहुना जिजाऊ - शिवराय यांना स्वराज्य निर्मितीची गरज , त्यावेळच्या असलेल्या राज्यांत हिंदूंना समानतेने वागवले जात नव्हते , म्हणूनच वाटली होती ! जर समानतेने वागवले जात असते , बळजबरीने धर्मांतरणे होत नसती , हिंदूंच्या आयाबाया पळवून त्यांच्यावर बलात्कार होतच नसते , हिंदूंचे मंदिरे , देव भ्रष्ट होतच नसते तर शिवराय-जिजाऊ-शहाजी राजे यांना वेगळ्या अशा स्वराज्याची गरजच का भासावी ? हे का सांगावे लागत आहे तर आजकाल काही लोक औरंगजेब ही कसा चांगला होता व त्याची महत्वकांक्षा धार्मिक नसून , राजकीय होती अशी चुकीची मांडणी करून आत्ताच्या हिंदूंची दिशाभूल केली जात आहे .. औरंगजेबाची महत्वकांक्षा निःसंशय धार्मिक होती , त्याला या देशाला पूर्णपणे इस्लामिक देश बनवायचे होते , पण त्याच्या या आसुरी वेडाच्या समोर शिवाजी राजे , संभाजी राजे व समस्त मराठे सह्याद्री बनून आडवे आले ....म्हणूनच औरंगजेबाची जशी  महत्वकांक्षा  ही  धार्मिक होती , तशीच शिवराय व जिजाऊंच्या  स्वराज्याची प्रेरणा ही  धार्मिकच होती !

शिवाजी महाराज कसे धार्मिक होते व हिंदू धर्माचे अभिमानी होते हे आम्ही खाली जी उदाहरणे देतोय त्यावरून वाचकांना सहज लक्षात येईल

१ .शिवरायांनी परधर्मात गेलेल्या नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले व त्यांच्या बरोबर भोजन घेतले , त्यांच्या कुटुंबाला ही परत सन्मान दिला .

शिवरायांनी प्रथमच दाखवून दिले की परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात आणताही येते . जर शिवरायांना सगळे धर्म सारखेच आहे असेच  वाटत असते व त्यामुळे काही फरक पडत नाही असे वाटत असते तर त्यांनी आपल्या या सहकार्यांना त्याच धर्मात राहू दिले असते की नाही ?

 

२ . कर्नाटक मोहिमेवर असताना शिवरायांच्या चरित्रातील हा प्रसंग वाचा वाचकांसाठी मुद्दामच हा प्रसंग पूर्ण देत आहे

राजांची छावणी तिरुवन्नमलईलापडली होती.राजांचे अश्वपथक गावाकडे वळले.समोर समोत्तीपेरूमलच्या एके काळच्या भव्य मंदिराचे भग्न अवशेष विखुरले होते. निष्णात हातांनी शिल्पीलेल्या त्या अत्यन्त सुबक मूर्तींची उध्वस्त अवस्था पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली:  'पंत, या मशिदी पाडून टाका! इथं आमच्या दैवतांची स्थापना करा ! समोत्तीपेरूमलच्या मंदिराच्या पडलेल्या या विटांतून नायक राजांनी बांधलेल्या या हजारखांबी मांडवासमोर सुरेख गोपुर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही'

 त्या आज्ञेने जनार्दनपंत, हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, 'पण,महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मनं दुखावतील.'

जेव्हा आमची मंदिरं पाडली आणि मशिदी उभ्या केल्या, तेव्हा आमच्या भावना दुखावतील, याचा कुणी विचार केला होता? किंबहुना, आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्ये केली ना?'

पंत, परधर्मसहिष्णूता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारामुळं परकीय आक्रमण सहन करायची सवय आम्हांला लागली आहे मनं कोडगी बनलीत.देवळं फोडली, तरी आम्ही स्वस्थ ! विजयनगरच साम्राज्य कोलमडले, तरी खंत नाही ! हीच सवय नडली आम्हांला. नाही तर आम्हां लाखों हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशीविश्वेश्वराचं मंदिर औरंगजेब पाडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही.तो पिढ्यान पिढ्यांचा वारसा आहे, तो टिकविणे हे आमचं कर्तव्य आहे आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्याही फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी उभारण्याला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत, असं कोणी म्हणेल, तर ते आमच्या राज्यात होणार नाही. आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा '

 ( संदर्भ : श्रीमान योगी)

 ३ . गोव्यावरच्या मोहिमेचे सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार

शिवराय गोव्याच्या मोहिमेवर असताना त्यांना भग्न अवस्थेत असलेले मूळ कदंब राजांनी बांधलेले व मधल्या बहामनी राज्यांत पाडले गेलेले मंदिर दिसले . शिवरायांनी मग या मंदिराचा ही जीर्णोद्धार केला व त्याचा शिलालेख आजही येथे बघायला मिळतो .

 

                 

४ .शिवाजी महाराज नियमितपणे पूजाअर्चा करत व मोहिमेवर असताना ही त्यांचे पूजेचे शिवलिंग स्फटिक त्यांच्या बरोबर असायचे .

५.  जिथे जिथे त्यांनी नवीन किल्ले बांधले तिथे त्यांनी अनेक नवीन मंदिरे ही बांधली , कुठेही त्यांनी मशीद वा चर्च असे काही उभारली नाहित .

६ . शिवरायांचा मृत्यू समय जवळ आला तेव्हा त्यांचे शेवटचे वाक्य वा अंतिम इच्छा हीच होती की " मथुरा , काशी विश्वेश्वर मुक्त करा " ...त्यांची ही       अपूर्ण इच्छा पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७७० साली पूर्ण केली .

७ . गोव्यात पोर्तुगीजांनी व त्यांच्या पाद्री  लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता . हिंदूंना तर धर्मांतर करणे किंवा मरण हेच पर्याय त्यांनी शिल्लक ठेवले होते .  तेव्हा जशास तसे या न्यायाने शिवरायांनी तेथे चार पाद्री लोकांना एकतर हिंदू व्हा किंवा मरण पत्करा असा हुकूम सोडला व जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्या चारही पाद्रीना ठार मारले , तेव्हा कुठे तेथील हिंदूंचा छळ काही प्रमाणात थांबला वा त्याला आळा बसला ,

३ . संभाजी महाराजांचे बलिदान  व दिल्लीवर फडकला भगवा !

छत्रपती संभाजी यांच्या मातोश्री सईबाई साहेब  ते खूप लहान असतानाच गेल्या .त्यामूळे त्यांचे मुख्य पालनपोषण जिजाऊंनीच केले .म्हणजेच या माउलीने एकाचवेळी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपुरुष घडवले . संभाजी राजांचे ही चारित्र्य जिजाऊंनीच मुख्यत्वे घडवले ..माझे तर स्पष्ट मत आहे शिवराय व संभाजी राजे यांच्या मुख्य गुरू या स्वतः जिजाउच होत्या व त्यांनीच हे दोन्ही महापुरुष घडवले १६८९ ला  औरंगजेबाने जेव्हा संभाजी राजांना पकडले तेव्हा संभाजी राजे अवघे ३३ वर्षांचे होते .

या प्रसंगी औरंगजेब मराठयांचे सगळेच राज्य गिळंकृत करतच आला होता व त्याने संभाजी राजांच्या समोर मुस्लिम धर्म स्वीकारणे वा मृत्यू हे पर्याय ठेवले ..जसे आधी सांगितले संभाजी राजेही जिजाऊंच्या च्याच तालमीत तयार झालेले दुसरे छत्रपती होते , त्यामुळे त्यांच्यात ही हिंदू धर्माचा अभिमान तितकाच होता जितका तो पहिल्या छत्रपतीमध्ये होता ! त्यामुळे त्यांनी व त्यांचे मित्र कवी कलश यांनी अतिशय धैर्याने मृत्यूचा स्वीकार केला पण मुस्लिम धर्म स्वीकारला नाही ..या दोघांचाही प्रचंड छळ झाला , पण त्यांनी या कमी वयातही अद्भुत धैर्य दाखवले ...संभाजी महाराजांचे हे बलिदान म्हणजे अभूतपूर्व ठरले व मराठे सूडाने पेटून उठले व त्यांनी औरंगजेब ची कबर येथे महाराष्ट्रातच  नुसती  खोदली नाही तर पुढच्या पन्नास-साठ वर्षांत मुघलांचे साम्राज्य पूर्णपणे उध्वस्त केलं! शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले ..पुढे थोर मराठा सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीवर भगवा फडकवला , जो तब्बल ४० वर्ष तरी तसाच अभिमानाने फडकत होता ...

४ . सध्याचा काळ

सध्याचा काळ म्हणजे एक संक्रमण काळ सुरू आहे . हिंदू समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे आपले  सर्वोत्तम आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते ,त्यांच्या सैन्यात खूप सारे मुस्लिम होते , त्यांना हिंदू धर्माचा काही विशेष अभिमान नव्हता तर त्यांना सगळे धर्म सारखेच वाटत असायचे असे अगदी रंगवून  , व खोटे खोटे सांगितले जात आहे  व अर्धवट अभ्यास असणारे व ज्यांचे फार असे वाचन नाही असे लोक गोंधळून जाणे वा संभ्रमित होणे सहज शक्य आहे  किंवा जे अशा प्रकारच्या पुरावा नसलेल्या लिखाणावर विश्वास ठेवू शकतात व त्यांची दिशाभूल सहज शक्य आहे

या सगळ्यालाच छेद देणे व पुराव्यासाहित हे सगळे मांडणे गरजेचे होते व वाटले ..

शिवाजी राजे परधर्माचा द्वेष कधीही करत नव्हते . पण त्याचवेळी ते सहिष्णुता बाळगणारे ही नव्हते स्वतः जिजाऊ व शिवराय त्यावेळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांचा कावा ही ओळखून होते  , म्हणूनच त्यांनी साध्या मावळ्यांमध्येही  स्वधर्म ( म्हणजेच हिंदू धर्म ) व स्वराज्य ( हिंदूंना न्याय देणारे स्वतःचे राज्य )  याचा स्वाभिमान जागा केला .  त्यामुळेच हे मावळे प्रत्येक युद्धात धैर्याने लढले व प्रसंगी मृत्यूला ही त्यांनी या मोठ्या कारणास्तव व या यशासाठी कवटाळले ! 

म्हणजेच शिवरायांच्या आधीची राज्ये ही हिंदूंना न्याय देणारी , त्यांच्या भावना जोपासणारी , त्यांच्या मंदिरे ,देव यांची प्रतिष्ठा जपणारी असती तर हिंदूंनी त्यांना ही आपले मानलेच असते ! पण ती राज्ये तशी बिलकुल नव्हती आणि म्हणूनच स्वराज्याची व हिंदू धर्माची पताका घेऊन शिवराय व मराठे यांना रणांगणात तलवार घेऊन उतरावे लागेल . शिवाय या हिंदू धर्माच्या व भगव्या च्या  रक्षणासाठी अनेकांनी घरादाराची , कुटुंबाची चिंता न करता स्वतःचे प्राणही दिले  

सध्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन आपापसातील जातिभेद , मतभेद विसरून पूर्वी जितके एक झालो नाही , त्यापेक्षाही जास्त एकत्र येऊ या ! हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य पावती असेल .

सध्या हिंदूंनीही  छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन आपापसातील जातिभेद , मतभेद विसरून पूर्वी जितके एक झालो नाही ,त्यापेक्षाही जास्त एकत्र येऊ या ! हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य पावती असेल .

म्हणूनच शिवाजी महाराजांचे चरित्र वाचताना हेच लक्षात घ्यावे की त्यांनी जे स्वराज्य निर्माण केले ते हिंदवी स्वराज्य होते , हिंदूंचे आपले स्वतःचे राज्य होते ! त्यांचे चरित्र बहुविध आहे , त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या व घेण्यासारख्या असंख्य घटना वा गोष्टी आहेत , त्यामुळेच त्याचा अभ्यास जगातल्या अनेक देशांत केला जात आहे , व तो आपल्या देशासाठी अभिमानास्पद नक्कीच आहे .

म्हणूनच जिजाऊ साहेब व शिवराय यांना उद्देशून म्हटले जाते ( कविता कुणाची आहे , सापडत नाही , पण खूप अर्थपूर्ण आहे )

                   " तुम्ही नसता तर , नसती दिसली अंगणात तुळस,

                    तुम्ही नसता तर , नसते दिसले मंदिरांचे कळस !

                    तुम्ही नसता तर , नसते दिसले सुहासिनींच्या भाळी कुंकू

                    पतिव्रतांच्या किंकाळ्या मग , विरल्या असत्या रानी ! "

म्हणूनच शिवरायांचे चरित्र निर्माण होण्याची प्रेरणा व उद्देश आपण हिंदूंनी कधीही विसरू नये व जेव्हा जेव्हा परत तशीच परिस्थिती निर्माण होईल वा निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा तेव्हा आम्हा हिंदूंची मुख्य प्रेरणा व आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच असतील यात काय शंका ?

 

                                                                    छत्रपती शिवाजी महाराज की जय !

 

 हेमंत सदाशिव सांबरे

 

 

 


- हेमंत सांबरे (Hemant Sambare)

  • हिंदूंनो
  • ' शिवचरित्र असे वाचा !!
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

हेमंत सांबरे (Hemant Sambare)

पूर्ण नाव - हेमंत सदाशिव सांबरे 

जन्मतारीख -०५/०१/१९८२ . 

मुख्य अभ्यास विषय - स्वातंत्र्यवीर सावरकर . 

वयाच्या १५ व्या वर्षापासून कविता , कथा , स्फुट इ प्रकारात लेखन सुरू .

आजपर्यंत तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रांत कविता व लेख प्रकाशित. तसेच अलीकडे अनेक दिवाळी अंकातही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

 
"सावरकर समजून घेताना" हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे व त्यावर लेखन व संशोधन सुरू आहे.

 
स्वतःचा ब्लॉग असून त्यावर आजपर्यंत ५०,००० पेक्षा जास्त वाचकांनी भेट देऊन वाचन केले

 इतिहास (2), हिंदुत्व (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.