•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

महापुरूषांना जातीत कोंडणारी विकृत विषवल्ली

रवींद्र मुळे 7 days ago
भाष्य  

महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेने बांधलेला १८ पगड आणि १२ बलुतेदार यांचा संपूर्ण समाज !परंतु दुर्दैवाने महाराजांच्या विशाल दृष्टीला संकुचित करणारे कपुत अलीकडच्या काळात जन्माला आले आहेत. ते स्वतःला इतिहासकार समजतात. कुणी विचारवंत समजतात आणि कुठलेही संशोधनाचे कष्ट न करता झालेले इतिहास संशोधक म्हणून ठराविक लोक त्यांना मान्यता पण देतात. काही लोकांना जाती जातीमध्ये लढवायच्या आणि स्वतःच्या पिढ्या पोसायच्या आहेत.

- रवींद्र मुळे, अहिल्यानगर


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. निमित्त होते 'तंजावरचे मराठे' या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन. या देखण्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी (Dr. Mohan Bhagawat) यांचे अत्यंत विचार प्रवर्तक भाषण झाले. मुळात हा कार्यक्रम एकूणच महाराष्ट्रवासी म्हणजेच मराठ्यांच्या (Maratha) अभिमानाचा विषय. उत्तरेकडील अटके पार झेंडे , शिंदे ,होळकर साम्राज्य ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहेतच .पण छत्रपतींनी (Shivaji Maharaj) हिंदवी साम्राज्याचा दक्षिणेत केलेला विस्तार ह्या बद्दल कमी  लिहले जाते किंवा बोलले जाते. तंजावरच्या मराठी माणसाच्या पाऊलखुणा , इतिहासातील पराक्रम आज ही तेथे उमटलेले दिसतात अशा वेळी असे पुस्तक किंवा कार्यक्रम याचे स्वागत झाले पाहिजे. मराठा म्हणजे समस्त महाराष्ट्र.

 

महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेने बांधलेला १८ पगड आणि १२ बलुतेदार यांचा संपूर्ण समाज ! परंतु दुर्दैवाने महाराजांच्या विशाल दृष्टीला संकुचित करणारे कपुत अलीकडच्या काळात जन्माला आले आहेत. ते स्वतःला इतिहासकार समजतात . कुणी विचारवंत समजतात आणि कुठलेही संशोधनाचे कष्ट न करता झालेले इतिहास संशोधक म्हणून ठराविक लोक त्यांना मान्यता पण देतात. काही लोकांना जाती जातीमध्ये लढवायच्या आणि स्वतःच्या पिढ्या पोसायच्या आहेत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती सुरू केली याला यांचे आक्षेप. वास्तविक आमच्या माहिती प्रमाणे स्वामी विवेकानंद याना पण महाराजांच्या कर्तृत्वाची , पराक्रमाची भुरळ पडली होती आणि लोकमान्य यांच्या भेटीत त्यांची यावर चर्चा झाली अशी नोंद आहे. संघाने तर महाराज हेच आपले आदर्श मानले आहेत. (RSS) संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जर कुणी आदर्श मानायचा असेल तर छत्रपतींना माना असेच स्वयंसेवकांना सांगितले. त्याच प्रेरणेतून सगळीकडे जिथे जिथे संघ पोहचला तिथे तिथे शिवाजी महाराज यांची प्रेरणा पोहचली. 

श्री शैलम येथील स्मारक ह्या इतिहासकारांनी पाहिले आहे का ? गेल्या वर्षी तिथे भव्य परिषद झाली त्या परिसंवादात विषय होता शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य. अर्थात राष्ट्रपुरुषांच्या गौरवाचे श्रेय घेण्याचे संस्कार संघाचे नाहीत. हे मी माझ्या वडिलांचे कौतुक करतो, गौरव करतो असे मुलाने म्हणण्यासारखे आहे. पण अलीकडे महाराज हा ब्रँड म्हणून वापरण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.

अलीकडील १५ दिवसात महाराजांच्या पुतळ्याचे दुर्दैवी पडणे , नंतर सुरत स्वारी का लूट ? आणि समाधी चा शोध या सगळ्यामध्ये छत्रपती जणू एखाद्या कंपुची खासगी मालमत्ता असल्यासारखे काही लोकांना वाटते. कुठूनतरी महाराजांची हिंदुत्ववादी प्रतिमा बदलायची आणि महाराजांच्या कर्तृत्वाचे ब्रॅण्डिंग एका पक्षासाठी किंवा जाती साठी वापरायचे हा धंदा या लोकांनी सुरू केला आहे. त्यासाठी खोटे पुरावे द्यायचे आणि खरे पुरावे झाकायचे हा त्यांचा उद्योग आहे. यात जातीत भांडणे लावायची आणि ब्राह्मण द्वेष पसरव्याचा हा दुष्ट कावा. 

हिंदुत्व आणि हिंदू धर्म याबद्दलचे मूलभूत मुद्दे मोहनजी यांनी भाषणात मांडले. संघ स्वयंसेवकना पण चिंतन प्रवृत्त करणारे अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला. त्यात बोलण्याच्या ओघात महाराज यांच्या समाधी चा मुद्दा आला असेल. त्यातील लक्षवेधक विषय इंग्रजांनी जाणीवपूर्वक महाराजांचा इतिहास , आठवणी , कर्तृत्वाची स्थळे नष्ट करण्याचे षडयंत्र केले हा होता न की कुणी समाधीचा शोध लावला ? 

आमच्या दृष्टीने महात्मा फुले किंवा लोकमान्य टिळक हा वाद येथे बिलकुल नाही. दोघांनी वेगवेगळ्या काळात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. महापुरुषांना परस्परांच्या विरुद्ध उभे करायचे, वाद निर्माण करायचे आणि जातीच्या वणव्यात आपल्या राजकीय पोळ्या शेकायच्या ह्या वृत्तीला आणि ह्या वृतीसाठी इतिहास तज्ञांचे रुप घेणाऱ्या आणि त्याची जाणीवपूर्वक प्रसिध्दी करून टीआरपी वाढवणारी मराठी माध्यमे आणि पत्रकार यांची युती समाज विघातक बनत चालली आहे. ही विषवल्ली गँगरीन सारखी आहे. वेळीच उपाय केले नाही, तर एक एक अवयव जसा काढून टाकावा‌ लागतो तशी समाज पुरुषाचे अवयव खाणारी ही वृत्ती आहे. या वृत्तीला त्यांच्या मेंदूतून हद्दपार करण्यासाठी आपल्याला जाती निरपेक्ष विचार संहिता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

विद्यापीठाची ज्ञान मंदिरे, इतिहासाची संशोधन केंद्रे, विज्ञानाच्या प्रयोगशाळा आणि सामाजिक चळवळी या सगळ्या ठिकाणी सकस राष्ट्रीय जाती निरपेक्ष, राजकीय पक्ष विरहित विचारसरणी प्रस्थापित होण्याची गरज आहे.

मोहनजी भागवत यांनी मांडलेले विचार मुळात ऐकून घ्यायची इच्छा आहे त्यांनी संदर्भ विरहित कुठल्या गोष्टी ऐकण्या पेक्षा प्रामाणिक पने जर स्वतःची मते बनवली तर समाज आणि देशासाठी ते जास्त हितकारक ठरेल. बाकी वस्तुस्थिती इतिहासकारांनी सांगितलेली आहेच. हा विषय फुले किंवा टिळक नाही.  

छत्रपती शिवराय यांचा प्रेरणादायी इतिहास लपविण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला हे आम्ही समजू शकतो. पण स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाच्या ज्या काही खुणा होत्या त्या एक तर दुर्लक्षित झाल्या किंवा नष्ट झाल्या हे पाप कुणाचे ? विशाळ गडावरील अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने ? अफजलखानाचा उरूस चालवण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिले ? स्वतःच्या पापा ना झाकण्यासाठी जातीचे पांघरूण घेणारे राजकीय पक्ष खोट्या इतिहासकारांची जी विषवल्ली उभी करत आहे त्याचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. 

तेंव्हा उगवत्या पिढीला घडवण्यासाठी , उद्याचा भारत घडवण्यासाठी जाती निरपेक्ष , निःपक्ष इतिहासकार , संशोधक निर्माण करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. कारण ज्या मातीत  महापुरुषांनी , संत ,महंतांनी जन्म घेतला त्याच मातीत पसरलेल्या विषवल्ली ह्या महापुरुषांना जातीत कोंडून त्यांना संकुचित करू पाहत आहेत.

 


- रवींद्र मुळे

  • शिवाजी महाराज
  • समाधी
  • महात्मा फुले
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

रवींद्र मुळे

 इतिहास (5), सामाजिक (5), महिला (1), विज्ञान (1), राजकारण (1), हिंदुत्व (3), रा. स्व. संघ आणि परिवार (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.