•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य

विश्व संवाद केंद्र - पुणे 15 days ago
बातम्या  

                                    अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य

          

      आखीव रेखीव रिंगण सोहळ्यात , अश्व दौडले चौखूर l
      टाळ मृदुंगाच्या गजरात,  निनादले विठ्ठलाचे गोपुर ll

 

आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. वैष्णवांच्या या नादब्रह्माने जणु विठ्ठलाचे गोपुर निनादल्याचा भास झाला . पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. उद्या दि. २ रोजी हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होईल.
 
पहाटे भिमराव वाघमारे यांनी कर्णा केला. अवघे वैष्णवजन लगबगीने प्रातःविधी उरकून पालखी तळावर जमा होवू लागले. माऊलींच्या तंबूत प्रमुख विश्‍वस्त डॉ. भावार्थ देखणे  यांनी माऊलींची नैमित्तीक पूजा सुरू केली. ही पूजा चालू असतानाच टाळाच्या साथीने विणेच्या झंकारीत पहाटेचे काकडा सुरु होता . पवमान पूजा झाल्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली. माऊलींच्या पादुका माळशिरस मुक्कामासाठी पालखीत विराजमान करण्यात आल्या. माऊली माऊली नामाच्या जयघोषात खांदेकर्‍यांनी लिलया पालखी खांद्यावर घेतली. एक एक दिंड्या क्रमांकाप्रमाणे उभा राहू लागल्या. माऊली रथात विराजमान झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते . या सकाळच्या सुखद वातावरणातच वैष्णवांनी पंढरीची वाट धरली. सकाळी ८.३० वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्‍यांनी दुपारचे भोजन उरकले. अडीच तासाच्या विश्रांतीनंतर सकाळी ११ वाजता सोहळा पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवनगर  नजीक पुरंदावडे गावच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला. सदाशिवनगर येथे सोहळा पोहोचल्यानंतर माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच विरकुमार दोशी , उपसरपंच विष्णू भोंगळे , श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, लेबर ऑफिसर रवींद्र जगताप , संचालक यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.
दुपारी १२.३० वाजता माऊलींचे अश्‍व तर १ वाजता लाखो वैष्णवांसह माऊलींचा पालखी सोहळा पुरंदावडे येथे पोहोचला. सरपंच राणी मोहिते , उपसरपंच देवीदास ढोपे  व  ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. रथापुढील २७ तर रथामागील २० अशा सुमारे ४७ दिंड्या रिंगणासाठी रिंगणस्थळी पोहोचल्या. पोलिसांनी आळंदी देवस्थान कर्मचाऱ्यांच्या मदतीने आखीव रेखीव रिंगण तयार केले होते. रिंगणाच्या मध्यभागी पालखी ठेवण्यासाठी छोटासा मंडप टाकण्यात आला होता. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पादुकांची व आश्वांची पूजा करण्यात आली व रिंगण सोहळ्यासाठी अश्व रिंगणामध्ये आणण्यात आले .

 

अश्‍वांची नेत्रदिपक दौड

 

माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते. रिंगण सोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येऊन ही विश्‍व माऊलींची पूजा बांधतात. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्‍वांचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माऊलींचे विश्‍वरूप दर्शन वारकर्‍यांना होते. पुरंदावडे येथील हा नेत्रदिपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळेल याचा नेम नव्हता. दुपारी १. १० वाजता रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार  यांच्या माऊली व स्वाराच्या अश्‍वांना रिंगणासाठी सोडले. सुरूवातीला काही वेळ स्वाराचा अश्‍व थबकत धावला . स्वराचा अश्व मात्र त्याला प्रोत्साहित करीत होता ..त्यानंतर माऊलींच्या अश्‍वाने नेत्रदिपक दौड करीत स्वाराच्या अश्‍वाला अर्ध्या फेरीतच मागे टाकत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला. आज माऊलींचा अश्‍व चौखूर उधळला. या अश्‍वाला आवरताना सेवकांची मात्र दमछाक झाली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यांमधून हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी हे मैदानी खेळ रंगले. त्यानंतर चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रीत केले. माऊलींना मध्यभागी घेवून या दिंड्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीन आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्‍वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते.

 

पुरंदावडे येथील रिंगण सोहळा झाल्यानंतर श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सोहळा येळीव येथे अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी विसावला. त्यानंतर तो माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी समाजआरतीनंतर हा सोहळा विसावला.
 

 

माळशिरस /सूर्यकांत भिसे


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.