•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ हवे

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 13 days ago
बातम्या  

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे
माजी खासदार प्रदिप रावत, हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांना अभिवादन

पुणे ः "हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या (constitution) रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व (hindutwa) प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो", असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले.

डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते. संविधान रक्षणासाठी आणिबाणी विरोधात सत्याग्रह केला, म्हणून श्रीकांत लिंगायत यांना १९ महिने तुरूंगवास झाला होता. त्यांची पुण्यातील लष्कर भागात १९८२ मध्ये धर्मांध जिहाद्यांकडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त लोकशाही समोरील आव्हानांची जागृती करण्यात आली. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै.श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. 

संविधान रक्षणासाठी हिंदूंना शत्रुबोध आवश्यक असल्याचे स्पष्ट मत रावत यांनी मांडले. ते म्हणाले,"राजकीय हिंदूत्वात त्रुटी जरी असल्या तरी, त्या दूर करून देशाच्या हितासाठी ते आत्मसात करायला हवे. कारण हिंदू टिकला तरच संविधान टिकेल."  
हिंदू-मुस्लीम असा प्रश्न नसून तो फक्त मुस्लीम प्रश्न असल्याची सडेतोड भूमिका रावत यांनी घेतली. ते म्हणाले, शांततापूर्ण सहअस्तित्व इस्लामला शक्य नाही. हा केवळ आत्ताचा नाही, तर त्याच्या जन्मापासूनचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी एक हजार वर्षाच्या धर्मांध इस्लामी सत्तेचा पाया उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. एक हजार वर्षाच्या अन्याय-अत्याचारात मरण पावलेल्या राष्ट्रीय पित्रांचा दिन आपण आणला पाहिजे. इस्लामला हिंदूंच्या नाही तर इस्लामच्या नजरेतून पाहायला हवे. इस्लाम रक्त बंधुत्व नाही. तर धर्मबंधुत्व मानतो. म्हणूनच ते धर्म म्हणून मतदान करतात. जातीपातीत विभागलेल्या हिंदूंनीही याचा विचार करायला हवा. संविधानाच्या रक्षणासाठी हिंदू म्हणून मतदान करायला हवे."

संविधान, लोकशाही मुल्यावर निष्ठा ठेवणे जिहाद्यांना मान्य नाही. कुराण आधी की संविधान असा प्रश्न धर्मांध इस्लामच्या अनुयायांना विचारायला हवे, असा रोखठोक सवाल आमदापुरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले,"हिंदू समाज आज राजकीयदृष्ट्या जागृत झाला असला तरी प्रश्न सुटलेला नाही. केवळ राजकीय परिवर्तन पुरेसे नसून, समाजाचा मानस बदलायला हवा." सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले. आभार महेश पवळे यांनी मानले.  
---


लिंगायत २०० टक्के हिंदूच  
शंकराचा पुजारी असलेले लिंगायत तेंव्हाही हिंदू होते आणि भविष्यातही राहतील, असे परखड मत चंद्रकांत लिंगायत यांनी मांडले. ते म्हणाले, हिंदू समाज तोडून जातीपातीत वाद घालण्याचे काम काही लोक करत आहे. लिंगायत समाज हा २०० टक्के हिंदू असून, हिंदू धर्म आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्याने रक्त सांडले आहे.
----


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • संविधान
  • हिंदुत्व
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.