•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सूर्यनमस्कार: योग्य स्थितींमुळे होणारे लाभ

अंजली तागडे (Anjali Tagade) 11 days ago
भाष्य  

सूर्यनमस्कार: योग्य स्थितींमुळे होणारे लाभ
सर्व रोगांचा परीहार करिता सूर्यासी नमस्कार । 
स्फूर्ति वाढे निरंतर घेता सूर्याचे दर्शन

आपण नेहमीच ऐकतो की सूर्यनमस्कार घातल्यामुळे आरोग्य सुधारते पण का? कसे? केव्हा?
सूर्याचे महत्त्व –


सौर मंडलात सूर्याचे एक अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यापासून उत्पन्न झालेले सर्व ग्रह त्याच्या सभोवती प्रदक्षिणा घालत असतात. आपण सर्व जाणतोच की पृथ्वीची निर्मिती सूर्यापासूनच झालेली आहे. सूर्याच्या ऊर्जेमुळेच पृथ्वीवर सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्याच्या ऊर्जेमुळेच सृष्टी जीवंत राहते. मनुष्यप्राणी सुद्धा या सृष्टीचाच एक घटक आहे. त्यामुळे त्याच्याप्रती आपण नेहमी कृतज्ञ राहिलेच पाहिजे व ती कृतज्ञता सूर्यनमस्कार घालून व्यक्त केली जाते. 
सूर्यापासून – सातत्य, अहंकारविरहीत जीवन जगण्याचा संस्कार आपण शिकतो

सूर्यनमस्काराची वैशिष्ट्ये –
सूर्यनमस्कार हा शरीराला व्यायाम व मनावर संस्कार घडवणारा व्यायाम आहे. म्हणून भारतीय परंपरेत दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कारांचा व्यायाम प्रकार म्हणून समावेश केलेला आढळतो. कमीत कमी जागेत, वेळेचे बंधन नाही (सकाळ-दुपार-संध्याकाळी), फार पथ्य नाहीत. स्त्री-पुरुष असा लिंग भेद विरहीत, वनवासी, ग्रामीण, शहरी भागातील कोणीही, लहान असो वा वयस्कर व्यक्तींपर्यंत, व्यक्तिगत अथवा सामुहिकरित्या, अंक तालावर अथवा संगीताच्या साथीने नमस्कार घालू शकता हे सूर्यनमस्कारांचे वैशिष्ट्य आहे. 
सूर्य नमस्कार ही एक वेगवेगळ्या क्रमबद्ध आसनांची मालिका आहे. आपण असेही म्हणूया की या वेगवेगळ्या आसनरुपी पुष्पांची माला सूर्याला अर्पण केलेली आहे. आणि त्या आसनांचे लाभ नमस्कार घातल्यामुळे मानवाला मिळत असतात. 
सूर्यनमस्कार घालण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातल्या त्यात सर्व सामान्य माणसाला कमीत कमी वेळेत व सहज करता येईल अशा १० अंकाच्या नमस्कारांतील आसनांपासून मिळणारे लाभ आपण पाहू या.  
सूर्यनमस्कार स्थिती व त्यापासून होणारे लाभ

सिद्धस्थिती (प्रणामासन) – एकाग्रता वाढते, मनुष्य अंतर्मुख होतो. आज्ञाचक्रावर लक्ष केंद्री होते त्यामुळे मन प्रसन्न होऊन ताण-तणावाचा सामना करण्याची तयारी वाढते. पुढील आसनांचा अभ्यास सुकर होतो. हात हृदयावर दाबल्यामुळे मेंदूला उत्तेजना मिळते. समाजात वावरताना ताठमानेने वावरावे मात्र आपले वरिष्ठ, गुरुजन, आई-वडिल, नातेवाईक व समाज ज्याकडून खूप काही शिकायला मिळते त्यांच्यापुढे नम्र राहण्याचा संस्कार यातून होतो.

हस्त उत्थानासन (नभोवंदन) : (सूर्यनमस्कारातील १ ची स्थिती) आकाश तत्वाशी एकरुपता आहे. पाठीचा कणा व पोटावरील त्वचा ताणली जाते. तेथील अतिरिक्त मेद कमी होतो.पोटातील अवयवांचे स्वास्थ्य, हात व खांद्यांचे स्नायू, गळ्यातील सप्तपथ यांचे आरोग्य सुधारते. फुफ्फुसे ताणले गेल्यामुळे श्वसन क्षमता सुधारते. शरीराला ऑक्सिजनची मात्रा वाढते.

उत्तानासन (पादहस्तासन) : (सूर्यनमस्कारातील २ ची स्थिती)पायाच्या स्नायूंना बळकटी लाभते. पाठीच्या स्नायूंना आवश्यक व्यायाम व पोटावरील चरबी कमी करणारे आसन आहे. पचनासंबंधीच्या तक्रारी कमी होतात.  वाढत्या वयाच्या मुलांची उंची वाढण्यासाठी उपयुक्त असे आसन आहे. मेंदूकडे रक्तपुरवठा  जास्त होतो. शारीरिक व मानसिक तणाव कमी होतो. मन शांत होते.

अश्वसंचालनासन (सूर्यनमस्कारातील ३ ची स्थिती) कंबरेचे विकार दूर होतात. खुब्याचा सांधा, गुडघा व घोट्याचा सांधा यांना व्यायाम घडतो. पाठीच्या कण्यास ताण येतो. छाती व फुफ्फुसांचा विस्तार होतो.

मेरुदंडासन, तुलीतवपू :  (सूर्यनमस्कारातील ४ ची स्थिती)चेहऱ्यावरील स्नायू सोडून इतर सर्व स्नायूंना व्यायाम घडततो. मणगट,  दण्ड व मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पोटातील अवयव ओढल्यामुळे अंतर्गत अवयवांना व्यायाम घडतो. त्यांची कार्यक्षमता वाढते.

भूवंदन अष्टांग नमस्कार : (सूर्यनमस्कारातील ५ ची स्थिती) पृथ्वी तत्त्वाशी संबंध येतो. गलग्रंथींवर दाब, मानेच्या मणक्यांना मसाज घडतो. मेरुदण्डास नैसर्गिक आकार प्राप्त होतो. पोटातील इंद्रीयांवर दाब पडतो त्यामुळे यकृत, प्लिहा, व अंतर्गत पचनेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. हृदयाला आराम मिळतो. गुरुत्वमध्य जमिनीच्या जवळ आल्याने हृदयावरील ताण कमी होतो. ज्या भूमातेमुळे आपले पोषण, वर्धन, होते ती आपल्या सर्वांचीच माता आहे, तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपली सर्वांची आहे ही भावना निर्माण होते.

भूजंगासन (सूर्यनमस्कारातील ६ ची स्थिती) खांदा व मानेला मोकळे करते. पोट, पुष्ट करते, पाठ व खांदे सशक्त होतात. पाठ लवचिक होते. छाती विस्तारते, रक्ताभिसरण सुधारते. थकवा व तणाव कमी होतो. श्वसनाचे विकार दूर होतात. 

अधोमुख श्वानासन (सूर्यनमस्कारातील ७ ची स्थिती) आधीच्या स्थितीत पोटाच्या स्नायूंवर आलेल्या ताणानंतर या आसनात पोटातील स्नायूंचे आकुंचन होते पोटातील अंतःग्रंथींचे कार्य सुधारते. पाठीचे आरोग्य सुधारते. मांड्या, गुडघे व घोटे यांना व्यायाम मिळतो, सहाजिकच त्यांचे कार्य सुधारते. यामध्ये त्रिबंध (मुलबंध, जालंधर व उडीयानबंध) लागतो. सहाजिकच त्याचे लाभ मिळतात. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यनमस्कार घातल्यामुळे क्रीडावैद्यक शास्त्राप्रमाणे अवयवांमधील ताकद (strength), चिकाटी (endurance), लवचिकता (flexibility), आणि एकसंधपणा/ समन्वय (co-ordination), चपळता (speed)  शारीरिक समतोल साधला जातो. एकाग्रता वाढते. स्नायू, सांध्यांची घडण आणि कार्यक्षमतेत वाढ.  या गोष्टी आपणास प्राप्त होतात. 

सूर्यनमस्कारांमुळे हृदयापासून सर्व अवयवांना होणारा रक्त पुरवठा वाढतो. एका मिनिटात ५ लि. पासून २५ लि. पर्यंत वाढू शकतो. हृदयाचा रक्त पुरवठा ४ ते ५% च राहतो व स्नायूंचा रक्तपुरवठा १५-२०% पासून ८०-८५% पर्यंत वाढतो.

रक्तातील Free fatty Acid (कॅलिस्ट्रोल वाढवणारे ॲसिड) कॅलिस्ट्रोलमुळे  रक्तवाहिन्यांमधील विकार, हृदय विकार आणि मेंदूतील रक्तस्त्राव वाढतो. कमी होण्यास मदत होते. अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर सुडौल, काटक आणि सडपातळ होते.
बायोलॉजिकल क्लॉक सुरळीत चालण्यास मदत होते. बायोलॉजिकल क्लॉक बिघडण्याची काही उदाहरणे म्हणजे लांबचा विमान प्रवास, रात्र पाळी, रात्रीची जागरण. ह्यामुळे झोपेच तंत्र बिघडत. ते व्यवस्थित होण्यासाठी मेलॅटोनीनच्या गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र नियमित सूर्यनमस्कारामुंळे हे हे बायोलॉजिकल क्लॉक सुरळीत होते. दिवस आणि रात्र यांचा मेंदूवर व पर्यायाने शरीरावर योग्य परिणाम होतो. 
सर्व ग्रंथींना (पिट्यूटरी, हायपोथलॅमस, पिनल, थायरॉईड, पॅराथायरॉईड, आद्यांत्र, जठर, यकृत, स्वादुपिंड, वृक्क, वृषण, अंडाशय) चालना मिळते.

शरीरातील सप्तधातू – रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र सुदृढ होतात. 

शरीरातील संस्था - रक्ताभिसरण, श्वसन, पचन, अस्थि, स्नायू, मज्जा, चेता, ज्ञानेंद्रिय, प्रजनन, व उत्सर्जन या सर्व संस्थांना चालना मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

शरीराला जशी बाह्य स्वच्छतेची आवश्यकता असते तशीच अंतर्गत स्वच्छतेचीही गरज असते. वेगवेगळे बंध (उदा.जालंधर, उड्डीयान व मूलबंधांमुळे ती होते.)

 श्वसनपद्धतीमुळे शरीरात असलेल्या ७१ हजार नाडयांना योग्य मात्रेत ऑक्सिजन पुरवठा होतो व त्यांचे कार्य सुधारते.

सूर्यनमस्कार महिलांसाठी वरदान –
कित्येक महिने डाएटींग करुन जे साध्य होत नाही ते सूर्यनमस्कारांनी साध्य होते. स्वास्थ्याविषयी जागरुक असलेल्या महिलांना ते एक वरदानच आहे. सूर्यनमस्कारांनी जास्तीचे कॅलरीज वापरले जातातच परंतु पोटाच्या स्नायूंवर ताण व दाब पडल्याने शरीर सहज, सोप्या पद्धतीने सुडौल बनते. 
काही आसन स्थितींमध्ये कंठातील ग्रंथी (थायरॉईड, पॅराथायरॉईड)चे कार्य सुधारते. संप्रेरकांचा योग्य स्रावामुळे कॅलशियमचे प्रमाण योग्य राहते.
मासिक पाळीतील अनियमितता देखील सूर्यनमस्कारांनी नियमित होते. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात. सुलभ प्रसुतीसाठी उपयुक्त आहे. कोणत्याही बाह्य उपचारांशिवाय चेहरा सतेज तर राहतोच शिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होवून त्या चिरतरुण व उत्साही राहतात.

सर्वसाधारण लाभ –
बुद्धीचे सामर्थ्य वाढते. स्मरणशक्ती वाढते. यशाने हुरळून जात नाही व अपयशाने नैराश्य येत नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते.
निरामय दीर्घायुष्य लाभते श्वसनाचे विकार दूर होतात जठराग्नी चांगला वाढून भूक लागते. पचन चांगले होते. पोट, पाठ, कंबर, बाहू, मांड्या इ.चे स्नायू मजबूत होतात . उंची योग्यप्रमाणात वाढते, वाचा सुधारते. विचार शुद्ध व आचरण सात्विक होते. पेशी मृत होण्याचा वेग मंदावतो. पेशी सशक्त होतात. 
स्थुलता कमी होते. पुरुषांच्या शरीरातील शुक्रपेशी व स्त्रियांचे शरीरातील अंडपेशी यांची निर्मिती, पोषण व वहन हे कार्य सुधारते. प्रजनन संस्था सुधारते. स्त्री व पुरुष दोघांच्या प्रजनन संस्थेची कार्यक्षमता व यौनक्षमता वाढते. लैंगिक आरोग्य सुधारते परिणामी आत्मविश्वास वाढतो. 

हे सर्व लाभ केवळ नियमित सूर्यनमस्कारांमुळे मिळत असतात. त्यामुळे सूर्यनमस्कारांकडे केवळ व्यायाम म्हणून न बघता ती जीवन जगण्याची एक शैली व्हावी. रोजच्या दिनक्रमात त्यांना स्थान देण्यात यावे. रोज किमान १३ सूर्यनमस्कार घालावेत सुरुवात २-३ ने करावी. शेवटी म्हटले आहेच ‘‘देहि आरोग्य नांदते भाग्य नाही ते यापरते’’ आरोग्यपूर्ण व निरामय जीवनासाठी सूर्यनमस्कार घालावे ही सर्वांच्या चरणी नम्र विनंती.


मनोजकुमार साळी,  पुणे
9011090751
sali.manoj@gmail.com

 


- अंजली तागडे (Anjali Tagade)

  • Surya Namaskar
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

अंजली तागडे (Anjali Tagade)

संपादक, विश्व संवाद केंद्र पुणे

 संस्कृती (8), जनजाती (3), महिला (5), पर्यावरण (4), उद्योग (2), सामाजिक (31), साहित्य (2), हिंदुत्व (2), रा. स्व. संघ आणि परिवार (5), इतिहास (8), मनोरंजन (2), राजकारण (1), कला (3), सेवा (4), शिक्षण (2), विज्ञान (2), कृषी (1), क्रीडा (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.