वारजे परिसरात शस्त्रपूजन
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वारजे येथील आर. एम. डी महाविद्यालय क्रीडांगणात, तर पौड रोड वरील जीत मैदानावर शस्त्रपूजन उत्सव झाला.
जीत मैदानावर झालेल्या उत्सवाप्रसंगी व्यासपीठावर रा.स्व.संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, प्रमुख पाहुणे म्हणून एफ.डी.एस इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद आळतेकर आणि प्रांत कार्यवाह धनंजय घाटे उपस्थित होते. तर वारजे येथील कार्यक्रमात अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य आणि भटके विमुक्त संघटन प्रमुख दुर्गादास व्यास, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ अभिनंदन बुद्रुक आणि छत्रपती संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास उपस्थित होते.
मंगेश भेंडे यांनी आपल्या वक्तव्यात गेल्या ९९ वर्षांचा रा.स्व.संघ कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, संघाच्या शाखांकडून समाज कार्याला प्रेरणा मिळते आणि सामाजिक जीवनात परिवर्तन होते. देशाला सक्षम बनवणे आवश्यक आहे. संपूर्ण हिंदू समाजाला पुर्नस्थापित करणे आवश्यक आहे. आज समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ स्वयंसेवक कार्यरत आहे, आणि समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे."भेंडे यांनी संघाच्या 'पंच परिवर्तन' विषयी माहिती दिली. 'पंच परिवर्तना' मध्ये 'समरसता' (बंधुत्वाची समानता), 'पर्यावरण अनुकूल' जीवन शैली, सर्व मूल्यांना प्रदान करण्यासाठी 'कुटुंब प्रबोधन', जीवनाचे सर्व पैलू 'स्व बोध' आधारित करणे (सामाजिक जागृतीसाठी "भारतीय" भावना निर्माण करणे) आणि 'नागरिकांचे कर्तव्य' याविषयी माहिती दिली.
आळतेकर यांनी भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी इथून होणारे 'प्रतिभा पलायन' (ब्रेन ड्रेन) कमी करावे लागणार असल्याचे अधोरेखित केले
दुर्गादास व्यास म्हणाले, उचलली आहेत. सामाजिक समरसतेसाठी संघाने अनेक पावले उचलाली आहे. डॉ. बुद्रुक यांनी सांगितले की, चंगळवादाने वेढलेल्या वातावरणात देशभक्तीने भरलेला समाज निर्माण करण्याचे काम केवळ संघच करतो असे म्हटले. भरकटलेल्या समाजात संघ स्वयंसेवक दीपस्तंभासारखे काम करत आहेत.
दोन्ही उत्सवाच्या ठिकाणी संघ स्वयंसेवकांची व्यायाम योग, दंड, समता, नियुद्ध आणि घोषाची प्रात्यक्षिके झाली. संभाजी भागाचे कार्यवाह रवींद्र लाटे आणि सहकार्यवाह आमोद कालगावकर यांनी अनुक्रमे जीत मैदान आणि वारजे येथील कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले.दोन्ही ठिकाणी नागरिक, महिला आणि संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयादशमीच्या दिवशी (शनिवार दि. १२ अक्टोबर) भागाच्या सातही नगरांमधे सघोष संचालन होणार आहे.