•  03 Sep 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

त्र्यंबकेश्वर येथे 'निर्मल प्रदक्षिणा महा-स्वच्छता अभियान' उत्साहात; १५ टन प्लास्टिक कचरा संकलित

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
बातम्या  

त्र्यंबकेश्वर येथे 'निर्मल प्रदक्षिणा महा-स्वच्छता अभियान' उत्साहात; १५ टन प्लास्टिक कचरा संकलित

त्र्यंबकेश्वर, दि. २ सप्टेंबर २०२६ :
"नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना" तसेच "जनसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी ३ लाखांहून अधिक भाविकांनी त्र्यंबकनगरीत हजेरी लावली. मात्र, भाविकांकडून अजाणतेपणाने तसेच हौशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकला जातो, ज्यामुळे निसर्गाचे आणि स्थानिक शेतीचे मोठे नुकसान होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागातर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी 'निर्मल प्रदक्षिणा महा-स्वच्छता अभियान' यशस्वीरीत्या राबवण्यात आले.

गत १२ वर्षांची परंपरा कायम राखत राबवलेल्या या अभियानात त्र्यंबकेश्वर आणि हरसूल भागातून सुमारे २५० ते ३०० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रदक्षिणा मार्गावरून सुमारे ७ ते ८ ट्रॅक्टर, म्हणजेच १२ ते १५ टन प्लास्टिक व अवांतर कचरा जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

- रक्षाबंधन व मार्गदर्शन
उपक्रमाची सुरुवात रक्षाबंधन कार्यकर्माने करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य घुले सर, ह.भ.प. योगेश महाराज धात्रक, दिघे सर आणि तालुका संघचालक योगेश देवकुटे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना निसर्ग संवर्धन व सेवाभावावर मार्गदर्शन केले.

- प्रशासन व मान्यवरांचे सहकार्य
या अभियानासाठी त्र्यंबक नगरपरिषद, तहसीलदार गणेश जाधव-पाटील, मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, नगरसेवक प्रशांत गायधनी, विष्णू दोबाडे व कुणाल उगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच, उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भुजंग, सचिन शिंगणे, देवेंद्र काण्णाव, अमित गोसावी, दत्तात्रय फडताळे, भूषण थेटे, भूषण भूतडा, चिन्मय फडके, कीर्तनकार चंद्रशेखर शुक्लबुवा, नितीन लोहगावकर, सुयोग देवकुटे, प्रणव जोशी, पंकज भूतडा, जयंत देवकुटे, दीपक शेठ लड्डा, संतोष कदम, समीर पाटणकर, तेजस लोहगावकर आणि नाशिकच्या 'योगेश्वर ग्रुप फाउंडेशन'च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- विविध संस्था आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग :
१.मराठा विद्या प्रसारक समाज (के.व्ही.एन. नाईक) महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर: ८३ विद्यार्थी
२.विवेकानंद केंद्र, पिंपळद: ४५ विद्यार्थी
३.मातोश्री कॉलेज: २० विद्यार्थी
४. हरसूल परिसर (जातेगाव खुर्द/बुद्रुक, चिंचवड, बेहेडमाळ, तोरंगण): १५० स्वयंसेवक
५. त्र्यंबकेश्वर शहर: ३० स्थानिक स्वयंसेवक


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • त्र्यंबकेश्वर
  • महा-स्वच्छता
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (203), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (70), रा. स्व. संघ आणि परिवार (88), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.