•  27 Aug 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

भटके विमुक्त समाजाला मानाच्या गणपतींच्या आरतीचा सन्मान

विश्व संवाद केंद्र - पुणे 25 days ago
बातम्या  

पुणे गणेशोत्सवात समरसतेचा झंकार:

भटके विमुक्त समाजाला मानाच्या गणपतींच्या आरतीचा सन्मान

पुणे, शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ — समरसता मंच व भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने सालाबादप्रमाणे पुणे महानगरातील गणेशोत्सवात सामाजिक समरसतेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मानाच्या गणपती मंडळांत भटके विमुक्त समाज बांधवांना श्रींच्या आरतीचा मान देण्यात आला. कसबा, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केसरीवाडा, गुरुजी तालीम, दगडूशेठ व विंचूरकर वाडा या मंडळांनी सत्कार करून समरसतेचा संदेश दिला.

या उपक्रमात पुणे शहर व परिसरातील भोर, पुरंदर, पिंपरी-चिंचवड, हडपसर, विद्यापीठ, कात्रज, येरवडा, पर्वती भागातील भटके विमुक्त समाज घटक—वैदू, वडार, रामोशी, कोल्हाटी, पारधी, बहुरूपी, गोसावी, डवरी गोसावी, नाथपंथी, लमान बंजारा, कंजार भाट, शिकलकर, बैरागी, भोई, गोंधळी, कैकाडी, मसणजोगी, पद्मशाली, धनगर—यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद खंडागळे यांनी करताना सांगितले की, “ही आरती केवळ धार्मिक विधी नाही, तर सामाजिक समतेचा दीपप्रज्वलन आहे.” डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्याची माहिती दिली आणि ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या "भटके विमुक्त दिना"बद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले.

समरसता मंचाचे अखिल भारतीय संयोजय प्रा. रमेशजी पांडव यांनी आपल्या भाषणात भारतीय परंपरेतील संयुक्त समाजरचनेचा गौरव करताना सांगितले, “भारतीय समाजरचना ही व्यवसाय, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि कलागुणांवर आधारित होती. आज भटके विमुक्त समाजाला मागास मानले जाते, पण याच समाजाने इतिहासात अग्रगण्य योगदान दिले आहे. समता युक्त समाजनिर्मितीसाठी संविधान हे मार्गदर्शक आहे. प्रत्येक समाजबांधवाने न्यूनगंड न ठेवता भारताच्या विकासात सहभागी व्हावे, हीच खरी समरसतेची आरती आहे.”

प्रमुख उपस्थित मान्यवर:
- समरसता मंच चे अखिल भारतीय संयोजय प्रा. रमेशजी पांडव
- पी.एस.आय. श्री शिवराज हाले  
- श्री. खंडोबा देवस्थान, जेजुरीचे विश्वस्थ डॉ. राजेंद्र खेडेकर
- केसरी संपादक रामदास नेरुरकर
- ह.भ.प.नाराण महाराज
- कसबा गणपती अध्यक्षा संगीताताई ठाकरे

कार्यक्रमाचे नियोजन समरसता मंचाचे डॉ. प्रसाद खंडागळे , श्री महल्ले, श्री शरद शिंदे, श्री रवीजी ननावरे, भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रशांत सहस्त्रबुद्धे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख), श्री अरविंद देवकर (पुणे महानगर संयोजन), श्री अभय जामगावकर (पश्चिम महाराष्ट्र प्रांत कोष प्रमुख), श्री स्वामी धनगर(पश्चिम महाराष्ट्र संयोजक), डॉ. जितेंद्र ठाकूर (पश्चिम महाराष्ट्र प्रांत रक्षा प्रमुख) व श्री किशोर शिंदे(पालावरची शाळा गटनायक) व इतर कार्यकर्त्यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता विंचूरकर वाड्यात एकत्रित सहभोजनाने झाली, जिथे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परंपरेला समरसतेचा नवा अर्थ मिळाला!


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • समरसता
  • पुणे
  • गणेशोत्सव
  • भटके विमुक्त
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (58), सामाजिक (111), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (44), संस्कृती (40), जनजाती (17), महिला (15), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (28), कम्युनिझम (6), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (14), सेवा (18), साहित्य (11), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.