आपल्या सोयीसाठी स्वातंत्र्य लढ्याला आपण टिळक युग आणि गांधी युग असे म्हणतो. पण या युगात हजारो माणसे होऊन गेली ज्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. हैद्राबादच्या स्टँड स्टील कराराच्याच्या काळात कन्हैयालाल मुन्शी भारत सरकारच्या वतीने एजंट जनरल होते. तिथली अत्यंत नाजूक परिस्थिती त्यांनी अतिशय कौशल्याने हाताळली. संविधान सभेमधील त्यांचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने मोठे आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मानचे मोठे काम त्यांनी केले असून, आज त्यांचे उदाहरण घेऊन राम मंदिरसारखा प्रकल्प उभा राहिला आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक आणि माजी खासदार प्रदीप रावत यांनी दिली.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुन्शी यांच्या कार्याचा वेध घेणाऱ्या 'सांस्कृतिक जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. कन्हैयालाल यांनी समाजातील प्रत्येक पैलुला स्पर्श केला. गुजराती साहित्यात सर्वात आघाडीचे लेखक आजही तेच आहेत, अशी माहिती प्रदीप रावत यांनी दिली. ते म्हणाले, संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी मोठे काम केले. आर्थिक धोरणाच्या बदलाची बीजे मुन्शी यांनी पेरली. भारतीय विद्या भवन सारखी मोठी संस्था त्यांनी सुरू केली." पुस्तकाचे लेखन प्रसाद फाटक यांनी केले आहे.
स्वातंत्र्यलढ्यामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. परंतु काही ठराविक नावे वगळता अनेकांची नावे आणि विचार मागे पडले अथवा ते मर्यादित राहिले अशा विस्मृतीत गेलेल्यांचे पुन्हा एकदा स्मरण करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विचार साधना प्रकाशनाद्वारे कन्हैयालाल मुन्शी यांचे चरित्र प्रकाशित केले गेले.
पुस्तकास भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे. कार्यक्रमाला भारतीय विचार साधना प्रकाशनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, भांडारकर प्राच्य - विद्या संशोधन संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, भांडारकर संस्थेचे डॉ. श्रीनंद बापट आणि लेखक प्रसाद फाटक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गिरीश आफळे यांनी केले. ॲड. विभावरी बिडवे यांनी पुस्तक परिचय दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. श्रीनंद बापट यांनी संशोधनाचे महत्त्वः दिशा आणि संधी या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाले, कन्हैया लाल मुन्शी यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी History and Culture of Indian people या अकरा खंडांच्या निर्मितीतून ही दृष्टी दिसून येते. आभार भाविसाचे कार्यवाह काशिनाथ देवधर यांनी मानले, तर कार्यक्रमाची सांगता प्रांजल अक्कलकोटकर यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली. सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
----
जेधे शकावलीमुळे महाराजांची जन्म तारिख पक्की झाली-
कार्यक्रमात संशोधन पद्धतीचे महत्त्व डॉ. बापट यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, "अध्ययन, अभ्यास, व्यासंग, या सर्वातून संशोधन होत जाते. उदा. हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करताना अनेक पुरावे मिळत गेले. त्या पुराव्यांचा उपयोग आर्य आक्रमणाचा सिद्धांत मोडून काढण्यासाठी खूप महत्वाचा ठरला."
डॉ. बापट यांनी प्राचीन इतिहासातील उदाहरणे देऊन संशोधनाच्या माध्यमातून प्राचीन साहित्यातील संदर्भ कसे उलगडता येतात हे सांगितले. नवीन मुद्दा असा आला की वेदांमध्ये सगळ्यात जास्त उल्लेख असणारी सरस्वती नदी हीचे महत्व अधोरेखित झाले आणि त्यावर संशोधन सुरू झाले. जेधे शकावली सापडली आणि इतिहासातील अनेक तारखा पक्क्या होण्यात मदत झाली. महाराजांची जन्म तारीख पक्की होण्यात याचा मोठा हातभार होता यातील १८१ तारखांनी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांना पुराव्यांचे बळ दिले.
डॉ. बापट यांनी गजानन मेहेंदळे यांचा संदर्भ देऊन असे सांगितले की, पूर्वीच्या संशोधकांनी अत्यंत कष्ट करून उन्हा तन्हात काम केले आणि आपल्या पर्यंत पुरावे उपलब्ध करून दिले त्यामुळे आमच्या सारखे संशोधक सावलीत बसून काम करू शकतात. संशोधनाचे मूळ असे असले पाहिजे की ती संज्ञा आपल्याला आधी समजली पाहिजे. असे मेहेंदळे म्हणतात. संशोधन पद्धतीत अभ्यासाची साधने अत्यंत महत्त्वाची असतात. सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे साहित्य म्हणजे ऐतिहासिक साहित्य होय. आपण करत असलेल्या संशोधनाचा गैरवापर होणार नाही अशा प्रकारें संशोधन करणे हे मोठे आव्हान आजच्या संशोधकांसमोर आहे, असेही ते म्हणाले.
--
फोटो साभार - संसद टिव्ही