•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

श्री नारद भक्तिसूत्रे

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 22 days ago
भाष्य  

॥ श्री नारद भक्तिसूत्रे ॥

  भारतीय संस्कृतीत प्रस्थानत्रयी म्हणून गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रांना सर्वमान्यता असली तरी, भक्तीमार्ग अनुसरणाऱ्या प्रत्येक साधकास, श्रीमत् भागवत आणि श्री नारद भक्तीसूत्रे यांचा अभ्यास करणे अपरिहार्य असते. या दोन्हींचा विषय ‘भक्ती’ हाच असला, तरी अत्यंत सोप्या व संक्षिप्त स्वरूपात प्रतिपादन असल्यामुळे, श्रीनारद भक्तीसूत्रे सर्वांनाच जवळची वाटतात.श्री नारद म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ‘कळीचे नारद’ अशीच प्रतिमा उभी रहाते. परंतु ग्रंथाच्या प्रारंभी लेखकाने देवर्षी नारद या शब्दाची उत्पत्ती, नारदांची पूर्वपीठिका, त्यांनी चारी युगात केलेले कार्य, त्यांची योग्यता आणि थोरवी, सूत्र ग्रंथ म्हणजे काय? नारदांच्या आगोदर कोणी कोणी भक्तिसूत्रे लिहिली? याचा खुलासा केला असल्याने वाचकाला श्री नारदांची सूत्रे आणि त्यांची उकल समजण्यास सोपे जाते. या विषयावर आजवर अनेकांनी लेखन केले असले तरी, श्री नारदांनी ८४ सूत्रात शब्दबद्ध केलेल्या ग्रंथातील प्रत्येक सूत्राचे विवरण श्री. अविनाश हळबे यांनी, साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेतील पण विज्ञाननिष्ठ विवेचन, आधुनिक काळातील चपखल दृष्टांत, श्री समर्थांसारखा व्यावहारिक दृष्टीकोन, संत वाड्मयातील उचित प्रमाणे देवून केले असल्याने, भक्ती साधकांना हा ग्रंथ पाठ्यपुस्तकाप्रमाणे तर अभ्यासकांना संदर्भ ग्रंथासारखा मार्गदर्शक होईल यात संशय नाही. काही सुत्रांचे गुढार्थ उकलताना श्री हळबे यांनी त्या सूत्रातील विषयाच्या गांभीर्याला धक्का न लावता, सर्व प्रकारची क्लिष्टता टाळून, वाचकाला सहज कळेल आणि पचनीही पडेल अशा पद्धतीने समजावून सांगितली आहेत. या ग्रंथाचे कर्ते श्री नारद असले तरी, सूत्राच्या विवरणात दिलेल्या दृष्टान्तातील महानुभावांच्या व्यक्तिरेखाही, त्यांच्या गुणांच्या तपशिलासह श्री हळबे यांनी सांगितल्या असल्याने, ग्रंथाची परिणामकारकता आणि आशयगर्भता वाढली आहे यात संशय नाही. एका दृष्टीने विचार केला तर न्यूटन, आईनस्टाईन, अर्कीमेडीज इत्यादी श्री नारद भक्तिसूत्रे – विश्व संवाद केंद्र – अविनाश ब. हळबे २०२६ Page 2/2 वैज्ञानिकांचा अध्यात्मिक क्षेत्राशी तसा काही संबंध नाही. परंतु लेखकाने त्यांचे सिद्धांत आणि कथांचा काही सूत्रांचे विवरण करताना अत्यंत तर्कशुद्ध रीतीने उपयोग केला आहे. ही बाब नक्कीच अनोखी आहे यात शंका नाही. या ग्रंथास विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे यांची प्रस्तावना असून या विषयावरील लेखमाला पूर्वी प्रसिद्ध करणाऱ्या श्री समर्थ सेवा मंडळ / श्री रामदास स्वामी संस्थान - सज्जनगड, श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी- कोल्हापूर, गीता धर्म मंडळ – पुणे, या ४ अध्यात्मिक पीठांचे आशीर्वादही लाभले आहेत. असा हा ग्रंथ प्रत्येक भक्तीमार्गी साधकाने अवश्य अभ्यासावा आणि संग्रही ठेवावा असे सुचवावेसे वाटते.

श्री नारद भक्तिसूत्रे
ले. अविनाश ब. हळबे.
प्रसाद प्रकाशन
पाने १९४, किंमत २५० /-


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • शब्दाची उत्पत्ती
  • नारदांची पूर्वपीठिका
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.