•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संघाच्या समन्वय बैठकीत सामाजिक परिवर्तनावर चर्चा

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 20 days ago
बातम्या  


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक म्हणजे नक्की काय असते? त्यात कोण सहभागी होते? चर्चेचे मुद्दे काय असतात? या बैठकीचे वैशिष्ट्ये काय असते, अशी अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ प्रेरणेने चालणाऱ्या समविचारी संघटनांमध्ये समन्वयासाठी वर्षभरातून एकदा ही बैठक होते. संघाची समन्वय बैठक म्हणजे लोकशाही पद्धतीने सर्वसमावेशक धोरण प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण आहे. संघटनेच्या विस्ताराबरोबरच समाजातील तत्कालीन जटील प्रश्नांवर येथे चर्चा होते. केवळ चर्चेपूरते मर्यादीन न राहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक आराखडाही तयार होतो.   

या वर्षीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समविचारी संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक केरळ राज्यातील पलक्कड येथे सुरु झाली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली आहे. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना बैठकीत संघ विस्ताराबरोबरच सामाजिक पंच परिवर्तनावर भर असेल. ज्यामध्ये सामाजिक परिवर्तन, समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरि दायित्व आदिंवर चर्चा होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

पलक्कड येथे शुक्रवार (ता. 30) पासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत बैठकीस प्रारंभ झाला. 1925 मध्ये सुरू झालेले संघकार्य 2025 मध्ये 100 व्या वर्षात प्रदार्पण करत आहे. त्यामुळे या बैठकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील वर्षी पुण्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनजाती कल्याण आश्रम, राष्ट्रसेविका समिती, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पार्टी आदी 32 संघ प्रेरित संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी उपस्थित असतात.

काय असते समन्वय बैठक ?

- संघ आणि संघापासून प्रेरणा घेणाऱ्या समविचारी संघटनांची ही बैठक असते.
- देशभरातील 32 संघटनांचे 230 राष्ट्रीय पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 90 केंद्रीय अधिकारी यात सहभागी होतात
- सन 1925 च्या विजयादशमीला सुरू झालेल्या संघकार्याला आता 100 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे शताब्दी वर्षाच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 
- सामाजिक परिवर्तन, समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरि दायित्व आदिंवर बैठकीत चर्चा होईल
- बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांच्यासही अन्य पदाधिकारी सहभागी आहेत.   
......
 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • rss
  • समन्वय बैठक
  • पलक्काड
Share With Friends

अभिप्राय

एकत्रित बैठक ही चांगली पद्धत आहे पण याचे स्वरूप विस्तीर्ण असावे म्हणजे तालुका स्तरातून बैठकी पूर्वी मत विचारात घेऊन चर्चा व्हावी मते लादली जाऊ नयेत याची काळजी घ्यावी
Vishnu shelake 31 Aug 2024 15:09


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.