बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि धार्मिक उन्माद २०२४ मध्ये इतक्या टोकाला पोहोचला आणि संपूर्ण देशात अराजकाचे वातावरण पसरले. पाकिस्तान प्रायोजित इस्लामी जिहादी गटांनी रस्त्यांवर खुलेआम हिंसाचार केला. रक्तपात, जाळपोळ, मंदिरांचा विध्वंस, आणि अल्पसंख्याकांवर संघटित हल्ले यांचे सत्र सुरु झाले. परिणामी, ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान शेख हसीना यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला.

या घटनांमुळे धर्मनिरपेक्ष बांगलादेशचे नवे ओंगळवाणे आणि रानटी जिहादी रूप उघड झाले. या रक्तरंजित घडामोडीमध्ये सर्वाधिक बळी गेले ते हिंदू. देशभर मंदिरांवर एकाच वेळी संघटित आणि नियोजित हल्ले करण्यात आले. अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली गेली. ऐतिहासिक देवस्थाने मातीमोल झाली. हिंदूंच्या वसाहती पेटवण्यात आल्या, महिलांवर अत्याचार झाले आणि शेकडो निरपराध हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली.
बांगलादेशातील धार्मिक उन्मादाची व्याप्ती केवळ मंदिरांवरील हल्ल्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता सांस्कृतिक वारशाच्या नाशाच्या दिशेने त्याची झपाट्याने वाटचाल सुरु आहे. ज्या संस्कृतीनं "बांगला" ओळखीचा आत्मा घडवला, त्या मूळ बिंदूंनाच इस्लामी कट्टरतेच्या विळख्यात संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आणि याचे सर्वाधिक धक्कादायक उदाहरण म्हणजे दोन थोर बंगाली प्रतिभावंत – रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे – यांच्या वास्तूंचा विनाश.

सत्यजित रे यांचे आजोबा “उपेन्द्रकिशोर रे चौधरी” यांच्या मायमनसिंग जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूवर १५ जुलै २०२५ रोजी स्थानिक प्रशासनाने बुलडोझर चालवला. ही बांगलादेशाच्या सांस्कृतिक वारशाला तडा देणारी गंभीर घटना आहे. शतकभरापूर्वी बांधलेली ही वास्तू रे कुटुंबाच्या इतिहासाचा आणि बंगाली साहित्यसृष्टीच्या जडणघडणीचा महत्त्वाचा भाग होती.
याच सत्यजित रे यांनी बंगालची सांस्कृतिक प्रगल्भता जगासमोर उभी केली होती. "पथेर पांचाली", "अपूर्व संसार", "चारुलता" यासारख्या त्यांच्या कलाकृती केवळ चित्रपट नव्हत्या, तर बंगाली जीवनशैलीचा, मूल्यांचा आणि चिंतन परंपरेचा आरसा होत्या. पण कट्टरवाद्यांच्या दृष्टीने हा सर्व 'हिंदू मूल्यांचा प्रचार' असल्याने, आज त्या पद्धतशीरपणे संपवल्या जात आहेत.
हीच वास्तू एकेकाळी "मायमनसिंग शिशु अकॅडमी" म्हणून ओळखली जात होती. बालसाहित्य, छायाचित्रण, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या उपेन्द्रकिशोर रे यांचं हे घर केवळ वास्तुशिल्प नव्हते, तर तो एक सांस्कृतिक संस्कारांचा जिवंत ठेवा होता. त्याच घरात पुढे सत्यजित रे यांचा वैचारिक वारसा बहरत गेला. 'पाथेर पांचाली' सारखा जागतिक कीर्तीचा चित्रपट देणाऱ्या रे यांची जडणघडण तेथेच झाली होती. भारताने ही वास्तू वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. उपेन्द्रकिशोर रे आणि सत्यजित रे यांचा सांस्कृतिक वारसा केवळ बंगालपुरताच मर्यादित नसून, तो संपूर्ण भारताची कलात्मक आणि बौद्धिक समृद्धी दाखवतो. त्यामुळेच भारत सरकारने हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी बांगलादेश सरकारकडे विनंती केली. पण दुर्दैवाने, त्या वास्तूचा शेवटदेखील बांगलादेशातील इतर अनेक ऐतिहासिक हिंदू स्थळांसारखाच झाला. स्थानिक प्रशासनाने हे ठिकाण "अनधिकृत वापरातील" दर्शवून कारवाई केली असली तरी बांगलादेश मधील घटनाक्रम पाहता बंगाली बौद्धिकतेच्या आणि हिंदू वारशाच्या पायावर कुऱ्हाड चालवणे हाच या कारवाई मागील खरा हेतू होता.

- "ते 'आमरा बांगाली' म्हणाले होते, पण धर्माने 'हिंदू' होते – एवढाच त्यांचा दोष."
यापूर्वी, ८ जून २०२५ रोजी नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक आणि द्वारकेश्वर नदीच्या तीरावरील शांतिनिकेतनच्या स्थापनेने संपुर्ण जगापुढे आदर्श मूल्यशिक्षणाचा विचार मांडणारे राष्ट्रभक्त दार्शनिक कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील सिराजगंज जिल्ह्यातील पिढीजात घरावर इस्लामी जमावाने हल्ला चढवला. हे देखील केवळ एखाद्या वास्तूवरचे आक्रमण नव्हते. तो सुद्धा बांगलादेशच्या सांस्कृतिक आत्म्यावर घालाच होता. रवींद्रनाथ टागोर हे फक्त पूर्व बंगालचे नाही तर बांगलादेशासह संपूर्ण भारताचे सांस्कृतिक प्राण होते. ब्रिटिश राजवटीत जेव्हा आजचा बांगलादेश बंगाल प्रांताचा भाग होता तेव्हा त्यांच्या कविता, गीते, कथा, आणि सामाजिक दृष्टिकोन भारतीय आणि विशेषतः बंगाली बुद्धिजीवी वर्गासाठी दिशादर्शक दीप ठरले होते. त्यांच्या मूल्य प्रेरित शांतीदूत विचारांना इस्लामी कट्टरपंथ्यांकडून 'हिंदू सांस्कृतिक प्रभुत्व' म्हणून वागणूक दिली जात आहे. या नव्या बांगलादेशात जगभरातील वंगदेशीयांचे लाडके रवींद्रनाथ "हराम" आहेत, त्यांच्या गीतालाही तेथे थारा नाही.
टागोरांनी सिराजगंज, पाटीसर, शिलाईदह या पूर्व बंगालमधील भागामध्ये निव्वळ जमीनदार म्हणून नाही, तर "स्वदेश हितैषी" म्हणून कार्य केलं. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी बँक सुरू केली, ग्रामीण रुग्णालये उभारली, मोफत शिक्षण संस्था स्थापन केल्या, आणि स्थानिक लोकांमध्ये आत्मशक्ती जागवली. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नोबेल पारितोषिकाची रक्कम या कामांसाठी वापरली.
दुर्दैवाने, जिथे टागोरांनी दीन-दुबळ्यांसाठी सेवा केली त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृतीचिन्हांवर हल्ले झाले. हे हल्लेखोर कदाचित ज्या शेतकऱ्यांना एके काळी गुरुदेवांनी आधार दिला होता त्याच शेतकऱ्यांचे वंशज असतील. पण सत्ताकांक्षा, धार्मिक कट्टरता, आणि सांस्कृतिक वंशविच्छेदाचा अजेंडा चालवण्यासाठी आज त्याच स्मृती पुसल्या जात आहेत.
बांगलादेशात इस्लामी कट्टरतेने इतकी तीव्र रूप धारण केले आहे की, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं 'आमार सोनार बांगला' या बांगलादेशाच्या राष्ट्रगीतालाही काही जण विरोध करत आहेत – केवळ "ते हिंदू होते" या कारणावरून. १९०५ साली जेव्हा ब्रिटीशांनी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली, तेव्हा त्या अन्यायकारक निर्णयाविरोधात रवींद्रनाथ टागोर यांनी "आमार शोनार बांगला" लिहिले. या गीताच्या माध्यमातून त्यांनी बंगालमधील सामूहिक ओळख, संस्कृती, भाषा आणि बंधुत्व यांना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

बांगलादेश निर्माण झाला तेव्हा या गीताच्या पहिल्या दहा ओळी बांगलादेशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या गेल्या. १९७१ साली जेव्हा बांगलादेशने पाकिस्तानपासून स्वतंत्रता मिळवली, तेव्हा हेच गीत तिथल्या लढवय्या राष्ट्रवादाचे प्रतीक ठरले. पण दैवदुर्विलास हा की, आज ते राष्ट्रगीत हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे – केवळ "ते हिंदू होते" या कारणावरून.
(संदर्भ -https://x.com/FrontalForce/status/1945319344503746991)
हे गीत १९०५ मध्ये बोंगोदर्शन आणि बाऊल या नियतकालिकांमध्ये एकाच वेळी प्रसिद्ध झाला. टागोर यांची भाची इंदिरा देवी हिने त्यांच्याकडून ऐकून घेतलेली धून लिहून ठेवली आणि त्यातूनच पुढे हा सांगीतिक वारसा तयार झाला. परंतु तो आता बांगलादेश साठी “हराम” आहे.
आचार्य म्हणजे अभिजित बॅनर्जी, अमर्त्य सेन, अमिताव घोष यांसारख्या बंगाली आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बुद्धिजीवी मंडळींनी यावर मौन बाळगले आहे. सांस्कृतिक वारशाच्या रक्षणाच्या बाबतीत त्यांची निष्क्रियता या विध्वंसाला अप्रत्यक्ष संमती भासत आहे.
वस्तुतः शेख मुजीबुर रहमानसारख्या बांगलादेशाच्या संस्थापकाच्या घराला सुद्धा न सोडणाऱ्या जिहाद्यांकडून सहिष्णुता, समजूतदारी किंवा माणुसकीची अपेक्षा कशी ठेवता येईल? ५ फेब्रुवारी रोजी ढाक्यातील ‘धनमंडी ३२’ या ऐतिहासिक ठिकाणी जमावाने उन्मत्त हल्ला चढवून शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानी आग लावली. बांगलादेशच्या निर्मात्याची, शेख मुजीबुर रहमान यांची, याच घरात निर्घृण हत्या झाली होती. फक्त जाळपोळीवर ही कट्टरता थांबली नाही. शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची नंतर क्रेन्स आणि जेसीबीने जमीनदोस्तपणे तोडफोड करण्यात आली. त्यापुढे जाऊन भिंतीवर “थाकबे ना” (उरणार नाही) असे मोठ्या अक्षरात लिहून जणू संपूर्ण इतिहासच नष्ट करण्याची भूमिका मांडली गेली. ही फक्त एका घराची नासधूस नव्हती. ती एका राष्ट्राच्या निर्मितीमागील सांस्कृतिक विचाराची हत्याच होती. हीच मानसिकता गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी आणि सत्यजित रे यांच्याबाबतही दिसून येते.
शाहजादपूर (सिराजगंज) येथील ऐतिहासिक रवींद्र कचेरीबारीच्या नुकत्याच झालेल्या विध्वंसामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे – मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम शासनाने बांगलादेशला जणू एखाद्या शापासारखे ग्रासले आहे. ऑगस्ट २०२४ पासून, ज्यांनी ब्रिटिश गुलामगिरीच्या आणि नंतर पूर्व पाकिस्तानवर पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व असण्याच्या काळात बंगाली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक स्मृतींचे जाणीवपूर्वक उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही केवळ वास्तूंची तोडफोड नाही, तर पूर्व बंगालच्या अस्मितेवरच घाला आहे.
जिहादी मुस्लिम विचारसरणी केवळ असहिष्णुतेत अडकलेली नाही, तर ती इतिहास, स्मृती, कला, साहित्य आणि सांस्कृतिक ओळख या सर्वांना शत्रू मानते हे यावरून स्पष्ट होते. हे केवळ वर्तमानावरील हल्ले नसून भूतकाळ आणि भविष्यातील सामूहिक स्मृती नष्ट करण्याचे षड्यंत्र आहे. जे जे काही 'हिंदू' समजलं जाते ते नष्ट करायचे, पुसून टाकायचे, आणि अखेरीस ते कधी अस्तित्वातच नव्हते असा आभास निर्माण करायचा हाच या कट्टरपंथाचा मूळ हेतू आहे.
बांग्लादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांनी खूप पूर्वी आपल्या संशोधनातून एक अत्यंत धक्कादायक चित्र मांडले होते. त्यांच्या पुस्तकानुसार, १९६४ ते २०१३ या पन्नास वर्षांच्या कालावधीत सुमारे १.१३ कोटी हिंदूंना धार्मिक छळामुळे देश सोडावा लागला. हा केवळ एक आकडा नसून, एका योजनाबद्ध आणि व्यवस्थात्मक वांशिक उच्छेदाची शोकांतिका आहे.
सध्याची स्थिती पाहता, २०३० पर्यंत बांगलादेशातील हिंदू समाज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचेल, असे वाटते. धार्मिक अत्याचार, जमिनीच्या जबरदस्तीने मालकी बदल, मंदिरांवर होणारे हल्ले, मुलींचं अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतरण – या सगळ्या घटनांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अबुल बरकत यांची २०४६ ची भीती काळाच्या आधीच खरी ठरू शकते.

बांगलादेशात जे हिंदू उरले आहेत, त्यांचं आयुष्य अनिश्चिततेच्या छायेत आहे. आपली ओळख लपवून, आपले सण थोडक्यात साजरे करत, आणि कोणत्याही क्षणी सगळं गमावण्याची भीती बाळगत ते फक्त आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फक्त धार्मिक द्वेषाचं किंवा बहुसंख्यांक अहंकाराचं प्रकरण नाही. हे एका संपूर्ण संस्कृती आणि समाजाच्या इतिहासाच्या निर्मम हत्याकांडाचे वास्तव आहे.
हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे पिसाळलेल्या कुत्र्याच्या शेजारी माणूस जगूच शकत नाही शांत झोपू शकत नाही पहिले त्या कुत्र्याला नष्ट करावे लागेल
Narendra Dharnidhar Kulkarni
10 Aug 2025 07:04