•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मजबूत लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या सुरक्षेसाठी जनसुरक्षा विधेयक - सुनील कांबळे

विश्व संवाद केंद्र - पुणे 1 day ago
बातम्या  

मजबूत लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या सुरक्षेसाठी जनसुरक्षा कायदा - सुनील कांबळे

पुण्यात समर्थनार्थ मोठ्या मोर्चाचे आयोजन; शहरी नक्षलवादाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिक आक्रमक 

पुणे, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ ः मजबूत लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या सुरक्षेसाठी जनसुरक्षा विधेयक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. पुण्यात संविधानवादी संघटनांच्या वतीने भव्य समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेत आपली बाजू न मांडणारे विरोधक आता रस्त्यावर येऊन अराजकता माजविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. 

पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समर्थन सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी जनसुरक्षा विधेयकाचे जोरदार समर्थन केले. आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत विरोधी पक्षांनी आपली बाजू न मांडता रस्त्यावर येऊन आंदोलन करतात यातच त्यांच संविधान विरोधी वागणे उघड झाले आहे, असे विधान केले.

तसेच माजी खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा संविधान देताना सर्वांच्या रक्षणाची आणि प्रगतीची खात्री त्यात नमूद केलेली आहे हे सांगितले त्याचबरोबर हा कायदा कोणत्याही प्रकारे विरोधकांचे दमन करण्यासाठी नाही असे म्हटले.

अभ्यासक तुषार दामगुडे यांनी डॉ.आंबेडकरांनी मार्क्स नाकारून बुद्ध का निवडला यातच समस्त भारतीयांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. गरीब आणि वंचित युवक युवती यांना देशाविरुद्ध संविधाना विरुद्ध उभे करून जंगलात न्यायचं आणि त्यांच आयुष्य उद्धवस्त करायचा हा माओवादी कावा जनसुरक्षा मुळे उघडा पडला आहे. 

आयोजक : 
नक्षलविरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समिती

विवेक विचार मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,  अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,  समरसता मंच, जनजाती कल्याण आश्रम, भटके विमुक्त विकास परिषद,  लोकशाही जागर मंच, मातंग साहित्य परिषद, राजे शिवराय प्रतिष्ठान, शिववंदना परिवार, जयतु फाउंडेशन, शिवरुद्र
 प्रतिष्ठान, समता प्रतिष्ठान, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सजग नागरिक.

-----


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • जनसुरक्षा विघेयक
  • पुणे
  • शहरी नक्षल
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.