•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण : डॉ. मोहन भागवत

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 4 days ago
बातम्या  

धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे कल्याण : डॉ. मोहन भागवत

चांदवड तालुक्यातील णमोकार येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळा संपन्न; विविधतेत एकता हेच भारताचे बलस्थान

मळसाणे (णमोकार)जि. नाशिक, दि. १०  : "धर्माचा मार्ग सोडून भौतिकतेचा स्वीकार केलेल्या जगाला सुविधा मिळाल्या, मात्र सुख दुरावले आहे. यामुळेच आज मानवासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा समन्वय साधून धर्माच्या आचरणातूनच मानवजातीचे खरे कल्याण होईल," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.


मळसाणे (ता. चांदवड) येथील 'णमोकार' तीर्थक्षेत्री आयोजित दिगंबर जैन पंथाच्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर गणाचार्य श्री कुंथुसागरजी महाराज, आचार्य श्री देवनंदीजी महाराज, आमदार डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते.


डॉ. भागवत पुढे म्हणाले की, "धर्मावलंबी समाजामुळेच भारतातील विविधतेत एकता निर्माण झाली आहे. अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह या मूल्यांमुळेच मानवजातीचा प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 'णमोकार मंत्र' हा केवळ शब्दसमूह नसून तो मनुष्य आणि सृष्टीच्या कल्याणाचा मार्गदर्शक मंत्र आहे. आता संपूर्ण जगाला हा कल्याणकारी मंत्र देण्याची वेळ आली आहे." तीर्थक्षेत्रे ही तपस्येची साधने असून मानवकल्याणाच्या विचारांची ती प्रेरणास्थाने आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आचार्य देवनंदीजी महाराज म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. साधू-संत ही देशाची खरी विरासत असून, त्यांच्या अध्यात्म आणि भक्तीमुळेच देशाची प्रगती होत आहे. गणाचार्य कुंथुसागरजी महाराजांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की, जगाचे कल्याण साधू-संतांच्या आशीर्वादानेच शक्य आहे. समाजातील हिंसक प्रवृत्तींचा नाश करून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणे ही काळाची गरज आहे.
या सोहळ्यात विशेष ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच 'पंचपरमेष्ठी मंडपा'चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी देशभरातून हजारो जैन बांधवांनी उपस्थिती लावली होती.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • अनेकांतवाद
  • अपरिग्रह
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.