•  23 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

कॉकरोच जनता पार्टी: तरुणांचा उद्रेक की... राजकीय प्रयोग?

विश्व संवाद केंद्र - पुणे 1 day ago
भाष्य  

डिजिटल वर्तुळात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची जोरदार चर्चा आहे. वरकरणी हा सामान्य आणि बेरोजगार युवकांचा आक्रोश वाटत असला, तरी या चळवळीच्या रचनेमागे सोशल मीडिया मानसशास्त्र आणि राजकीय प्रचाराचा मोठा अनुभव असलेल्या व्यक्तीचा हात असल्याचे समोर येत आहे. आगामी काळातील आंदोलनांची पार्श्वभूमी आणि मराठवाड्याचे राजकीय वातावरण पाहता, तरुणांनी या लाटेत वाहून जाण्यापूर्वी सत्य काय हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यावर प्रकाश टाकणारा हा स्वतंत्र लेख...

- अमोल कृष्णराव टेंभुर्णे , पुणे

“Cockroach Janta Party” ही फक्त बेरोजगार तरुणांची अचानक उभी राहिलेली चळवळ आहे, असा समज अनेक जण करून घेत आहेत. पण उपलब्ध माहिती पाहिली तर ही चळवळ पूर्णपणे “सामान्य युवकांची स्वयंस्फूर्त लाट” नसून, एका अनुभवी राजकीय सोशल मीडिया कार्यकर्त्याने उभारलेला डिजिटल प्रयोग असल्याचे दिसते.

या चळवळीचे संस्थापक अभिजित दीपके हे पूर्वी AAP च्या सोशल मीडिया टीमशी जोडलेले होते आणि त्यांनी निवडणुकांमध्ये डिजिटल प्रचार, मीम कॅम्पेन आणि युवकांपर्यंत पोहोचणाऱ्या राजकीय मोहिमांवर काम केले होते. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांचा AAP शी संबंध स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. म्हणजेच ही काही “अचानक पेटलेली सामान्य बेरोजगार तरुणांची चळवळ” नसून, सोशल मीडिया मानसशास्त्र आणि राजकीय प्रचार यांचा अनुभव असलेल्या व्यक्तीने उभारलेली मोहीम असल्याचा प्रश्न उपस्थित होतो.

यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे — संभाजीनगर आणि मराठवाडा. इतिहास पाहिला तर मराठवाडा हा आंदोलनांचा आणि भावनिक प्रश्नांवर पटकन पेट घेणारा भाग राहिला आहे. आरक्षण, नामांतर, पाणी, बेरोजगारी किंवा सामाजिक असंतोष अशा मुद्द्यांवर येथे वारंवार मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या आहेत.सध्या आरक्षण हा मुद्दा ज्वलंत आहे आणि येत्या काळात पुन्हा त्यासाठी उपोषण आणि आंदोलन होणार अशा आशयाच्या बातम्या प्रसारित होत आहे.त्यामुळे काही जणांच्या मते, अशा प्रदेशातूनच डिजिटल आंदोलनाचा चेहरा पुढे येणे हे योगायोग नसू शकते.


सध्या महाराष्ट्रात बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, शेतकरी प्रश्न आणि प्रादेशिक असंतोष यावर वातावरण तापलेले आहे. अशा वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधी भावना एकत्र करून पुन्हा मोठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.

तथापि, हे सर्व विश्लेषण एक राजकीय निरीक्षण आहे. याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही की ही चळवळ एखाद्या विशिष्ट पक्षाच्या थेट नियंत्रणाखालीच चालते. पण संस्थापकाची राजकीय पार्श्वभूमी आणि चळवळीची डिजिटल रचना पाहता, याकडे केवळ “सामान्य युवकांचा उद्रेक” म्हणून पाहणेही तितकेच अपूर्ण ठरू शकते.
त्यामुळे कुठल्याही चळवळीला पाठिंबा देण्याअगोदर आपला सदसद्विवेक वापरावा.

- अमोल कृष्णराव टेंभुर्णे , पुणे

(लेखक युवकांविषयीच्या घडामोडीचे अभ्यासक आहेत.)


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • कॉकरोज जनता पार्टी
  • युवक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (104), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (42), संस्कृती (38), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (27), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (18), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.