गंगेचे पाणी खरंच अशुद्ध आहे? वैज्ञानिक तत्थ्ये नेमकी काय सांगतात?
महाकुंभाला (mahakumbha) मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामूळे हिंदुत्वाचा वाढता प्रभाव समाजातील काही घटकांच्या डोळ्यात खुपतोय की काय असा प्रश्न सध्या पडत आहे? गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांना जिवाणू संसर्ग व त्वचा संक्रमणाचा धोका असल्याचे सतत लोकांना विविध माध्यमांद्वारा सांगितले जात आहे. पण यात किती तथ्य आहे? आजपर्यंत गंगाजलच्या गुणधर्मांबद्दल केलेले संशोधन या दाव्याचे खणखणीत उत्तर आहे. काय आहेत गंगाजलचे गुणधर्म आणि हिंदू धर्मात केवळ गंगाजलाला इतके पवित्र का संबोधले गेले आहे? चला, समजून घेऊया:

गंगाजल हे गंगोत्री (उत्तराखंड) येथून उगम पावणारे एक अद्वितीय गोड्या पाण्याचे परिसंस्थान आहे, जे सुमारे २५२५ किमीचा प्रवास करून अखेरीस भारतीय महासागराला मिळते. या संगमस्थळाला गंगा सागर (पश्चिम बंगाल) (ganga) म्हणून ओळखले जाते. या दरम्यान आपले पवित्र जल जवळपास संपूर्ण उत्तर आणि काही पूर्व भारताला पुरवत वाहते. भारतीयांच्या आयुष्यात गंगेचे महत्वाचे स्थान आहे. परंतु महाकुंभाच्या निमित्ताने जेव्हा जग भरातील हिंदू गंगेत स्नान करतात तेव्हा मात्र असा विचार सतत भारतीयांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला जातो की गंगेचे पाणी केवळ अशुद्धच नाही तर भारतीयांच्या प्रकृतीसाठी अयोग्य आहे. गंगाजलाच्या ‘संशयित पावित्र्याबद्दल’ संशोधक काय सांगतात पाहूया:
भौगोलिक संशोधनानुसार, ज्या ठिकाणी कधी काळी टेथिस महासागर अस्तित्वात होता, त्याच ठिकाणी भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या आदळण्यामुळे हिमालय पर्वत निर्माण झाले. त्यामुळे हिमालयाचा समुद्राशी असलेला संबंध सिद्ध होतो, आणि म्हणूनच हिमालयाच्या उंच शिखरांवर सापडणारे सागरी जीवाश्म या विस्मयकारक शोधाचे देखील कारण समजते. गंगानदीच्या पाण्यात विलक्षण जीवाणूनाशक गुणधर्म असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, अत्यंत प्रदूषित वातावरणातही हे पाणी उच्च प्रमाणात विरघळलेल्या प्राणवायूचे (Dissolved Oxygen) प्रमाण टिकवून ठेवू शकते. या वैशिष्ट्याचा शोध सर्वप्रथम ब्रिटिश जीवाणुतज्ज्ञ अर्नेस्ट हँकिन यांनी १८९६ मध्ये लावला. त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले की सामान्य नळाच्या पाण्यात सहज विकसित होणारे कॉलरा रोगाचे जीवाणू गंगाजलाच्या संपर्कात आल्यावर अतिशय जलद गतीने नष्ट होतात.

या घटनेचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांनी गंगाजलाचे दोन नमुने तपासले — एक उकळून आणि दुसरा गाळून. निरीक्षणात असे आढळले की गाळलेल्या पाण्यात जीवाणूनाशक गुणधर्म कायम होते, तर उकळलेल्या पाण्यात ते नष्ट झाले. यावरून हे देखील स्पष्ट झाले की, गंगाजलातील हा जीवाणूनाशक घटक उष्णतेमुळे नष्ट होणारा आहे.
सुमारे दोन दशकांनंतर, १९१६ मध्ये कॅनेडियन सूक्ष्मजैवशास्त्रज्ञ फेलिक्स डी'हेरले यांनी पॅरिसमधील इन्स्टिट्यूट पास्तूर येथे संशोधन करत असताना फेजेस (Phages) या सूक्ष्मजीवांची संरचना शोधून काढली आणि स्पष्ट केली. हे फेजेस प्रथिनांनी बनलेल्या बाह्य आवरणाने वेढलेले असतात आणि त्यामध्ये अनुवांशिक सामग्री असते. विशेष म्हणजे, त्यांचाही उष्णतेमुळे नष्ट होण्याचा गुणधर्म आहे, जो हँकिन यांच्या शोधांशी पूर्णपणे जुळणारा आहे.
गंगाजलाची ही स्वतःला शुद्ध ठेवण्याची आणि स्वतःच पुनरुत्पन्न करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता पाश्चिमात्य जगासाठी विस्मयकारक होती.

गंगेच्या या पवित्र्यामुळेच कोणतेही हिंदू धार्मिक विधी गंगाजलाशिवाय पूर्ण होत नाहीत. अर्थात या निमित्ताने हे देखील सिद्ध होते की भारतीय ऋषींचा गंगाजलाबद्दल किती सखोल आभास असेल. ही माहिती घेतल्या नंतर जेव्हा वेदांमधील गंगेचे वर्णन आणि सनातन धर्मात असलेले गंगेचे महत्व यांचा संदर्भ लावतो तेव्हा खऱ्या अर्थाने ‘गंगेत स्वर्ग’ असल्याचे लक्षात येते.
संदर्भ
२) Study reveals Ganga's self-purifying ability amid CPCB water quality concerns at Maha Kumbh