•  15 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम

विश्व संवाद केंद्र - पुणे 23 days ago
बातम्या  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महिलांच्या सहभागातूनच द्वेषमुक्त निकोप समाजनिर्मिती - अभिनेते राहुल सोलापूरकर

निगडी दि.२३ (प्रतिनिधी)

स्त्रीचा शब्द कुटुंबात परवलीचा शब्द असतो, ते एक अस्त्र असते त्याची ताकत ओळखून त्यांनी द्वेषमुक्त निकोप एकसंध समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जेष्ठ सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

निगडी येथील सावरकर मंडळ परिसरात झालेल्या भव्य मातृ शक्ती जागर कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई तारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

पुढे बोलतांना सोलापूरकर यांनी मातृसत्ताक पद्धतीचा उल्लेख करत चापेकर बंधूंच्या मातोश्रींचे उल्लेख करून राष्ट्रहितासाठी असंख्य महिलांचे अतुलनीय योगदान आहे आता महिलांना त्यांचे न्याय हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी भारतीय न्याय संहितेत देखील आमूलाग्र सुधारणा झाल्याचे सांगितले. वक्फ बोर्ड कायद्याचे त्यांनी सखोल विश्लेषण करून लव जिहाद, जमीन जिहाद, व्होट जिहाद या संबंधी महिलांनी जागृत राहणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जगभरातील सध्याची परिस्थिती बघता, लोकशाहीतील १००% मताधिकाराचा योग्य वापर करून आपण जातीपातीत न अडकता सर्वांनी एक हिंदू म्हणून हिंदूहिताची बाजू मांडणाऱ्या प्रतिनिधीच्या मागे आगामी विधानसभेला ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी बर्वे, परिचय शिल्पा बिबिकर तर आभार निवेदिता कच्छवा यांनी मानले.

यावेळी उत्साहात संपन्न झालेल्या दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते झाले. सहभागी कलाकारांनी झळकवलेले भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, सणवार, १००% मतदान, महिला सशक्तीकरण या विषयावर संदेश देणारे आकर्षक फलक लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाला विविध संस्था संघटना, विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (35), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.