तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?
माघ फाल्गुन द्वितीय अर्थात संत तुकाराम बीज उत्सव महाष्ट्रातात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या दिवशी संत तुकोबा किर्तन करतांना अदृश्य होऊन सदेह वैकुंठाला गेले होते.म्हणून तुकाराम बीज उत्सव असतो देहू मध्ये संत मेळा किंवा संताची मांदियाळी जमत असते. अनुपम सोहळ्यास महाराष्ट्रातील वारकरी एकत्र येऊन "ज्ञानदेव-तुकाराम"गजर करतात.परंतू त्याच काळात हिंदू समाजात जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या काही विद्रोही संघटनाच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन"संत तुकारामाचे वैकुंठ गमन नव्हे तर हत्या" किंवा तुकारामांचा खून झाला आहे अशा निच विषया द्वारे समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात.वास्तव मध्ये तुकारामांच्या हत्या विषयी कोणताही पुरावा विद्रोही टोळ्या कडे नाही केवळ मनात येईल त्या प्रमाणे लेखन करतात किंवा प्रपोगंडा करीत असतात.तसेच "नाताळच्या माथी हाणू काठी"म्हणणाऱ्या कणखर तुकोबांची हत्या होऊ शकते एवढे ते लेचेपेचे नव्हते किंवा शिवरायांचे गुरू असलेल्या तुकोबांची हत्या समाजाने सहन केली असती काय ? तरी सुद्धा समाजाला ऐकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या तुकोबा सारख्या संतांच्या नावाने उपद्व्याप करून समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असतात.काही विद्रोही व विद्वेषी संघटनाची पिलावळ संत तुकाराम बीज उत्सव दरम्यान तुकाराम वैदिक की विद्रोही व तुकोबांचे वैकुंठ गमन की हत्या असा चुकीचा इतिहास मांडून सामाजिक एकोप्याचे वातावरण कलुषीत करतात.वारकरी संप्रदाय किंवा पंथ आजही संत तुकारामांच्या वैकुंठ गमनावर ठाम असून त्यांनी विद्रोही मंडळीच्या टीका - टिप्पणीस कधीच भिक घातली नाही. वारकरी बंधूंनी तुकोबा आमचे आहेत व आम्ही आमचे पाहून घेऊ या तुम्ही (विद्रोही टोळ्या) कशाला लुडबुड करता अशा कणखर भूमिकेमुळे विद्रोही टोळ्यांना अनेक वेळा तोंडघशी पाडले आहे तरी सुद्धा काही विद्रोही टोळ्या फाल्गुन द्वितीया तुकाराम बीज उत्सव निमित्ताने किर्तन,व्याख्यान, समाज माध्यम व प्रसार माध्यमा द्वारे संत तुकोबांच्या वैकुंठ गमन विषयी समाजात संभ्रम निर्माण करणारे लेखन, साहित्य प्रसारीत करुन समाजाची दिशाभूल करतात.
साळुंखेची विद्रोही तुकाराम मांडणी.
तुकोबांनी वेद,देव,व्रतवैकल्य वैदिकधर्म नाकारला होता, त्यांची हत्या झाली होती अशा प्रकारची खोटी मांडणी फाल्गुन महिन्यात केली जाते तसेच डॉ.आ.ह.सांळूखे यांनी"विद्रोही तुकाराम"पुस्तकाद्वारे तुकोबांना विद्रोही तुकाराम करुन समाजात प्रस्तुत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सुद्धा "संत तुकारामांचा खून रामदासी ब्राम्हणांनी केला". प्रा.जेमिनी कडू , सुनील टाक यांनी"संताचा छळ आणि हत्या" तसेच मा.म.देशमुख आणि प्रवीण गायकवाड यांनी सुध्दा तुकाराम महाराजांची हत्या केली असल्याचा प्रपोगंडा निर्माण केला आहे तुकोबांनी वैदिक विचारा विरुद्ध बंड पुकारल्याचे सांगुन सदेह वैकुंठगमनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तुकोबांची हत्या झाली असल्याचा विषय प्रस्तुत करुन वारकरीबंधू मध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण वारकरीबंधुनी दोघांच्या पुस्तक व विचाराला कवडीचीही किंमत दिलेली नाही त्यामुळे तुकोबांचे वैकुंठगमन आणि तुकोबा वैदिक की विद्रोही यावर विचार करण्याची आवश्यकता आहे
शिवरायांच्या सनद मधील उल्लेख.
संत तुकाराम महाराज माघ फाल्गुन द्वितीय दिवसी किर्तन करतांना अदृश्य होऊन सदेह वैकुंठगमनास गेले आहेत.हे सत्य जगातील तुकाराम महाराजांच्या करोडो भक्तांना मान्य आहे कोणाचेही दुमत नाही.तसेच बाबत अनेक तत्कालीन पुराव्याचा अभ्यास केल्यास लक्षात येते. तुकोबा छ.शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्यांच्या राज्याभिषेका नंतर शिवरायांनी संत तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांना सनद दिली आहे.तुकोबा किर्तन करता करता अदृश्य झाले असल्याचा विख्यात उल्लेख केला आहे. संत जनागडे महाराज यांच्या साहित्या मध्ये" जगद्गुरु तुकोबाराय प्रथम पहरी सशरीर वैकुंठाला गेले असल्याचा उल्लेख आहे.तसेच जेव्हा देहू ची गादी तुकोबांचे वैकुंठगमन मान्य करून बीज उत्सव साजरा करते तेव्हा इतरांनी लुडबुड करण्यात काहीच अर्थ नाही
अंतकाळी विठो आम्हास पावला ! कुडी सहित गुप्त झाला तुका !!
संत निळोबाराय व तुकोबाचे बंधू कान्होबाराय आणि संत जनागडे महाराज यांच्या अभंगा मध्ये सुध्दा तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असल्याचा उल्लेख आढळतात.त्यामुळे शिवरायांच्या काळात त्यांच्या गुरूंची हत्या होणे शक्य नसून होत असलेला प्रकार शुध्द पाखंड किंवा फसवणूक म्हणावी लागेल. आ.ह.सालुंखे यांनी काही वर्षा पूर्वी आपल्या "विद्रोही तुकाराम" पुस्तका द्वारे वैदिक तुकारामास विद्रोही प्रस्तुत करून त्यांनी धर्म शास्त्रा विरुद्ध बंड पुकारले होते असे चित्र उभे केले आहे तसेच वैदिक सण उत्सव,व्रत वैकल्य, पूजापाठ नाकारल्याचे म्हटले आहे तसेच पुरुषोत्तम खेडेकर, प्रा.जेमिनी कडू, प्रवीण गायकवाड यांनी तुकोबांची हत्या झाली असल्याचा प्रपोगंडा केला आहे तुकोबांच्या गाथेचे निरीक्षण केल्यास आर्धी गाथा वैदिक धर्म वेद,व्रत वैकल्य,पंढरपुरचा विठ्ठला संबधी काय भाष्य केलेल आहे . वेदा संबधी कठोर भूमिका घेतांना तुकोबा म्हणतात
मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते!वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ!
तुकोबांनी उपरोक्त अभंगा मध्ये वेदाची निंदा करणाऱ्यांस भ्रष्ट, सुतक्या,खळ व मातेची स्तन फाडणारा म्हटले आहे. पुढे तुकोबा म्हणतात
वेद जया गाती, आम्हा तयाची संगति! तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवा नये!
वेदा चे गुणगान व प्रमाण मानणाऱ्याची आम्हाला संगती होऊ शकते असे निक्षून सांगीतले आहे .
व्रत,वैकल्या संबंधी तुकोबा म्हणतात
आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी !
कंठी मिरवा तुळसी!व्रत करा एकादशी!
म्हणवा हरीचे दास,तुका म्हणे मज हे आस !!
मुखाने विठ्ठल नामस्मरण करावे म्हणजे आपण सुखी होतो गळ्यात तुळशी माळ मिरवा,एकादशी व्रत करा असा संदेश निर्वाळा तुकोबांनी दिलेला आहे व्रतवैकल्यासाठी जेवढे आग्रही होते तेवढेच हरी कथे विषयी सुद्धा आग्रही होते.तुकोबांचा हरी कोण ?
गीता जेणे उपदेशिली,ते ही विटेवर माऊली ! वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाचि साधला!
विटेवरी समचरण,तो हा रुक्मिणीरमण! वेद शास्त्रा माहेर, केले दासा उपकार!!
चार वेद,सहा शास्त्रे,अठरा पुराण,शास्त्राचा सार आणि वेदाची मूर्ति असलेला विठ्ठल माझा प्राण सखा संगाती आहे ज्यांनी गीतेचा उपदेश केला तोच वेदशास्त्र माहेर रुक्मिणीरमण विटेवर उभी असलेली माऊली आहे.त्यामुळेच "वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम" ठरवीने आणि शिवरायांनी तुकोबांचे पुत्र नारायण महाराज यांना दिलेल्या सनदी मध्ये "अदृश्य झाल्याचे विख्यात"केलेला उल्लेख पाहता वैकुंठगमनास हत्या ठरविणे कितपत योग्य आहे ?
अशोक राणे , अकोला