•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संघ शिक्षा वर्ग ( इथे घडतात कार्यकर्ते... (भाग २)

विश्व संवाद केंद्र - पुणे 4 days ago
संपादकीय शिफारस   भाष्य  

 

                                                                इथे घडतात कार्यकर्ते... (भाग २)

 

 'संघ शिक्षा वर्ग' किंवा 'कार्यकर्ता विकास वर्ग' या वर्गांचा दिनक्रम पहाटे पावणेपाच पासून सुरू होतो आणि रात्री दहापर्यंत सारे शिक्षार्थी अगदी घड्याळाबर हुकूम सर्व कार्यक्रम करत असतात. या वर्गांच्या कार्यक्रमाची आखणीच अशी केलेली असते की, शिस्तीचे, स्वावलंबनाचे, सहजीवनाचे, मैत्रीचे, परस्परांना सहकार्य करत पुढे जाण्याचे, देशभक्तीचे, आपल्या संस्कृतीचे, सदाचरणाचे संस्कार येथे आपोआप होत जातात. 

 
नकळत होणारे संस्कार
'आता मी तुम्हाला शिस्त शिकवतो...' असे सांगून वर्गातील एखादा शिक्षक इथे कधीच शिस्तीचे धडे देत नाही. उलट, वर्गातील सर्व कार्यक्रम शंखाच्या (बिगुल) किंवा शिट्टीच्या संकेतावर सुरू असतात. प्रत्येकजण शिस्त पाळत असतो. वेळेचा संकेत पाळत असतो. ती वेळ पाळणे हळूहळू साऱ्यांच्याच अंगवळणी पडते. त्यामुळे वेगळे कोणतेही शिक्षण न देता शिस्त आपोआपच मुरते. या वर्गांमध्ये स्वावलंबनालाही कमालीचे महत्त्व असते. त्याचे पालन करणे सुरुवातीला काहीजणांना अवघडही जाते. परंतु हळूहळू त्याचीही छान सवय होऊन जाते. इतकी की, नंतर प्रत्येक जण स्वावलंबनाचे आचरण करत दुसऱ्याच्या मदतीलाही तत्परतेने धावून जातो.
 
क्रमाक्रमाने झालेले बदल
संघाच्या कार्यपद्धतीमध्ये वेळोवेळी अनेक बदल झाले आहेत. उन्हाळी वर्गांच्या रचनेतही आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. अगदी नावाचेच उदाहरण पाहा. सुरुवातीला या वर्गांचे नाव 'संघ शिक्षणाचे वर्ग' असे होते. या वर्गांना 'आॉफिसर्स ट्रेनिंग क्लासेस', 'आॉफिसर्स ट्रेनिंग कँप (ओटीसी)', 'उन्हाळ्यातील विशेष वर्ग' असेही म्हटले जात असे. नंतर 'अधिकारी प्रशिक्षण वर्ग' म्हणून हे वर्ग ओळखले जात होते. त्यानंतर 'संघ शिक्षा वर्ग' म्हणून आणि गेल्या वर्षीपासून 'कार्यकर्ता विकास वर्ग' म्हणून हे वर्ग सुरू आहेत. 
 
सांगलीत अभियांत्रिकीचा वर्ग
अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) सर्वच वर्षांच्या परीक्षा मे-जून महिन्यात होतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही 'संघ शिक्षा वर्गा'त कधीच जायला मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 'संघ शिक्षा वर्ग' आयोजित केला गेला होता. सांगलीत १९९४ साली हा वर्ग पार पडला होता आणि त्यातील सर्व शिक्षार्थी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे होते. वर्गांच्या रचनेत झालेल्या बदलांची अशी अनेक उदाहरणे आहेत. वर्गांच्या कालावधीतही वेळोवेळी बदल झालेला आहे. पूर्वी तृतीय वर्षाचा म्हणजे नागपुरातील वर्ग चाळीस दिवसांचा होता. पुढे तो तीस दिवसांचा करण्यात आला. 
 
कालावधीमध्ये झालेले बदल
प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या वर्गांचाही कालावधी वेळोवेळी बदललेला आहे. गेल्या वर्षीपासून (२०२४) प्रारंभिक वर्ग ( तीन दिवसांचा), प्राथमिक वर्ग (सात दिवसांचा), संघ शिक्षा वर्ग - सामान्य (पंधरा दिवसांचा), संघ शिक्षा वर्ग - विशेष (पंधरा दिवसांचा), कार्यकर्ता विकास वर्ग - एक (वीस दिवसांचा) आणि कार्यकर्ता विकास वर्ग - दोन (पंचवीस दिवसांचा) अशी वर्गांची रचना करण्यात आली आहे. 
 
फक्त उन्हाळ्यामध्ये हे वर्ग होत असत. आता वर्षाच्या अन्य कालावधीमध्ये देखील वर्गांचे आयोजन होऊ लागले आहे. या वर्गांमध्ये सामान्यतः महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसाय करणारे तरुण शिक्षार्थी सहभागी होतात. याशिवाय प्रौढांसाठी विशेष वर्गांचेही आयोजन केले जाते.
 
सहवासातून मिळणारे शिक्षण
संघासाठी पूर्णवेळ देऊन काम करणारे प्रचारक या वर्गांमध्ये प्रामुख्याने शिक्षक म्हणून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासमवेत रहायला मिळणे, त्यांच्याशी गप्पा, अनौपचारिक संवाद साधायला मिळणे ही शिक्षार्थ्यांसाठी मोठी शिदोरी ठरते. व्यवसाय, नोकरी, उद्योग, प्रपंच करणारे अनुभवी कार्यकर्तेही या वर्गांमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या अनुभवाचाही खूप मोठा फायदा वर्गांना होतो. 
 
संघाचे केंद्रीय कार्यकर्ते तसेच अनेक ज्येष्ठ कार्यकर्तेही या वर्गांमध्ये उपस्थित असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचाही फायदा शिक्षार्थ्यांना होतो. अशा कार्यकर्त्याबरोबर संवाद साधायला मिळणे, त्यांच्याशी चर्चा करणे, शंका-समाधान करून घेणे त्यांचे बौद्धिक वर्ग ऐकणे हा अनुभव कार्यकर्त्याला समृद्ध करणारा असतो.
 
'संघ शिक्षा वर्गां'मधून संघाला हजारो प्रशिक्षित कार्यकर्ते मिळाले. ज्यांनी संघकार्याच्या विस्ताराचे महत्त्वपूर्ण कार्य आपापल्या क्षेत्रात केले आणि करतही आहेत. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी ९८ वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणारी ही जी आगळी पद्धती घालून दिली, ती सर्वार्थाने यशस्वी ठरली आहे. शाखांसाठी शिक्षक आणि संघकार्यासाठी कार्यकर्ते घडावेत, हाच डॉक्टरांचा हे वर्ग सुरू करण्याचा उद्देश होता, तो पूर्णांशाने सफल झाला आहे. 
 
या वर्गांचे व्यवस्थापन, प्रत्यक्ष वर्ग सुरू असताना उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यातून काढले जाणारे मार्ग या गोष्टी समजून घेऊ या, पुढील भागात...

- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • संघ शिक्षा वर्ग ( इथे घडतात कार्यकर्ते... (भाग २)
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.