•  21 Jun 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

योग दिवस २१ जून निमित्त सक्षम युवा, योगयुक्त भारत

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
क्रीडाविश्व  

योग दिवस २१ जून निमित्त
सक्षम युवा, योगयुक्त भारत
   

युवा पिढी म्हणजेच देशाचा मुख्य कणा समजला जातो. युवा पिढी कडून आपण उज्वल भविष्याची अपेक्षा करत असतो. आताची युवा पिढी तर अतिशय हुशार, जिद्दी , टेक्नो सॅव्ही आहे.खूप उच्च शिक्षित तसेच समाजकारण ,राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये सुद्धा खूप अभ्यासू व पुढे आहे.परंतु अशा या पिढीला बेरोजगारी, मानसिक ताण,  नकारात्मक विचार यांचा सुद्धा मनावर लगेच परिणाम होतो.या पिढीचे मानसिक स्वास्थ उत्तम राहण्यासाठी योगाभ्यासाची ,व्यायामाची, ध्यान धारणेची खूप आवश्यकता आहे.

योगासन किंवा योगाभ्यासाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे .आजकाल प्रत्येकालाच ते पटू लागले आहे. जर लहान मुले किंवा युवा पिढीने जर याचा नियमित अभ्यास सुरू केला तर त्यांना त्याचा खूप लाभ होणार आहे .आजकाल  अभ्यास; स्पर्धा परीक्षा याच्यामुळे  त्यांचा खूप मानसिक ताण वाढत आहे. तो वाढल्यामुळे बरेच वेळा या मुलांच्या मनात नकारात्मक भावना, नकारात्मक विचार निर्माण व्हायला सुरुवात होते .हे सर्व टाळण्यासाठी व स्वतः मधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी रोज बाकीच्या व्यायाम प्रकारा बरोबर योगाभ्यास सुद्धा करणे आवश्यक आहे.दररोज निदान दहा ते पंधरा मिनिटे आसन, प्राणायाम व ध्यानाचा  अभ्यास केला तर या पिढीला सुदृढ राहण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. यासाठी काही आसने जशी की त्रिकोणासन, चक्रासन, भुजंगासन, उष्ट्रासन , सर्वांगासन ही दररोज करणे आवश्यक आहे.
 त्याचप्रमाणे अनुलोम-विलोम , भ्रमरी प्राणायाम याचा सुद्धा सराव रोज करावा. यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होतात. तसेच स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यासाठी खूप मदत होते.

आज- काल बरेच विद्यार्थी खूप ओव्हर थिंकिंग करताना दिसत आहेत म्हणजे जी गोष्ट घडलीच नाहीये किंवा ज्यावर आपण कामच केले नाही त्याचा चांगला रिझल्ट येईल का नाही याचा विचार करताना दिसतात .
याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो .त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, नकारात्मक विचार वाढतात, मानसिक त्रास होतो हे सर्व कमी करण्यासाठी योगासन व प्राणायाम यांच्या सरावाने उत्तम लाभ मिळतो.योग ही मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्लीच आहे .
आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्तम राहू शकतो. खूप वेळा आज काल इगो प्रॉब्लेम वाढत आहे असे दिसते..इगोमुळे सुद्धा मानसिक स्वास्थ्य बिघडते. आपल्यामध्ये acceptence   आला पाहिजे.
लवचिकता ही फक्त शरीराची नाही तर मनाची सुद्धा असली पाहिजे.
मनाची लवचिकता वाढवण्यासाठी रोज प्राणायाम व ध्यानाचा सराव करणे आवश्यक आहे.
शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी नियमित योगासने आवश्यक आहे.

दिवसेंदिवस जाहिरात व प्रलोभन  यांचे युग वाढायला लागले आहे असे म्हणायला हरकत नाही.
 त्यामुळे मुले नको त्या गोष्टींकडे आकर्षित होतात व महत्त्वाच्या गोष्टी अभ्यास ,खेळ ,कला यावरील लक्ष विचलित होते .
हे टाळण्यासाठीच  योगाभ्यासाचा उपयोग होतो.सगळ्या प्रलोभनांमुळे मुलांमध्ये एकाग्रता कमी  व्हायला सुरुवात होते . ही एकाग्रता टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी योगासन आणि ध्यान याची खूप आवश्यकता 
आहे..जर विद्यार्थ्यांनी रोज दहा ते पंधरा मिनिटं जरी  ध्यानाचा अभ्यास केला व तोलात्मक आसनाचा सराव केला तर त्यांची एकाग्रता वाढण्यास सुरुवात होते.त्याचप्रमाणे रोज ओंकार, ध्यानधारणा केल्यामुळे एकाग्रता वाढणार आहे .मन शांत राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कमी वेळात   पाठांतर होण्यास मदत होईल व  वेळ वाचणार आहे. काही तोलात्मक आसने जसे की वृक्षासन ,संतुलनासन, गरुडासन कोकिळासन, द्रोणासन इत्यादी...  ही  आसने योग्य मार्गदर्शनाखाली शिकून नियमित सराव करण्यास काहीच हरकत नाही .

आजच्या युवा पिढीसाठी योग शास्त्र हे आज करियर म्हणून सुद्धा बघता येईल.
 बहुतांशी पालक किंवा मुले हे नेहमीच्या पठडीतल्या  अभ्यासक्रमाचीच निवड करत असतात .
परंतु सध्या स्पोर्टस इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री यांना सुद्धा खूप महत्त्व  आहे.
पुढील आयुष्य आपण शारीरिक, मानसिक, वैचारिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तसेच दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा सक्षम करण्यासाठी योगशास्त्राचा खूप उपयोग होतो .त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी योगशास्त्र हे आपल्या आयुष्याचे करियर म्हणून निवडण्यासाठी विचार करण्यास काहीच हरकत नाही .
आपल्या देशात जशी चांगल्या योग शिक्षकांची गरज आहे तसेच बाहेर देशात सुद्धा चांगल्या योग शिक्षकांची खूप गरज आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांचे व्यायाम प्रकार व योगशास्त्र याचा उत्तम अभ्यास करून आपण याची करिअर म्हणून निवड नक्कीच करू शकतो.

बदलत्या काळातील योग
योग्य शास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला कळून चुकलेले आहे .
योग ही आपली संस्कृती आहे. परंतु जशा रुढी ,चालीरीती, परंपरा बदलत गेल्या त्याचप्रमाणे योग साधनेच्या रूपातही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे.
 योगाचा प्रचार व प्रसार हा भरपूर प्रमाणात होत आहे .
तसेच योगासने करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बदल झालेला आहे.
 नवीन नवीन पद्धती निर्माण होत आहे. त्यामुळे तरुण वर्ग तिकडे खूप आकर्षित होत आहे.
आणि त्यांनाही योगाभ्यासाचे महत्त्व जाणवत आहे. बरेच वेळा युवा पिढीला जिम मध्ये जाऊन किंवा खूप ताकदीचे व्यायाम प्रकार करायला खूप आवडतात ते नक्की करावेत सुद्धा पण त्याबरोबरच त्यांनी योगाभ्यासाचा सुद्धा लाभ करून घेणे त्याचा अभ्यास करणे हे आवश्यक आहे त्यांच्या वयानुसार आवडीनुसार आजच्या बदलत्या काळातील योगाचे प्रकार नियमित करू शकतात त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल.
नवीन पद्धती जसे की पॉवर योगा ,एरियल योगा ,आर्टिस्टिक योगा ,चेअर योगा , फेस योगा, हॅमोॉक योगा इत्यादी.

भगत गीतेमध्ये सांगितलेच आहे समत्व योग उच्चते:

योग कर्मसु कौशलम:

संतुलन योगस्य प्राण :
डॉ. मनाली देव 
आंतरराष्ट्रीय योग तज्ज्ञ 
९९२२९२७०३४


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • योग दिवस
  • युवा पिढी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (165), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (65), रा. स्व. संघ आणि परिवार (82), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (9), विज्ञान (5), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.