•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

बांगलादेशबाबत मानवाधिकारवाले गप्प का ?

अशोक राणे 10 days ago
भाष्य  

बांगलादेशबाबत मानवाधिकारवाले गप्प का ?  

                                                                             
▪️ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांनी कटकारस्थाने करून शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकले. इस्लामी मूलतत्त्ववादी मोहमद युनूस यांच्या खुनी गटाने एकत्र येऊन तेथील सत्ता हस्तगत केली आहे. युनूस यांचे हंगामी सरकार स्थापन होताच शेख हसीना यांच्या  निवासस्थानावर हल्ला केला. तसेच ढाका शहर सरकार पुरस्कृत हिंदू हिंसाचाराचे केंद्र ठरले आहे. इस्लामी मूलतत्ववादी गटाने एकत्र येऊन तेथील हिंदू समाजाला तसेच तेथील हिंदू मठ मंदिरे, हिंदू प्रतिष्ठानास लक्ष्य  करून हिंसा व रक्तपात सुरू केला आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून बांगलादेश निपराध हिंदुंच्या रक्ताने माखला आहे. रंगल्या जात असून हिंदू समाज तेथे सरकार पुरस्कृत दहशतीच्या छायेत सतत नरक यातना भोगत आहेत ज्या इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने बांगला देशात मानवी मूल्य जपून त्यांची सेवा केली त्याच बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांनी इस्कॉन मंदिराला सुद्धा लक्ष्य  केले आहे.

▪️शोधून शोधून हिंदुंची दुकाने लुटली जात आहे सोबतच स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या सह निपराध हिंदुंना तुरुंगात टाकून सरकार पुरस्कृत मारहाण सुध्दा होत आहे. पत्रकारांना सुध्दा प्रचंड त्रास देण्यात येत आहे. महिला पत्रकार मुन्नी साहा यांचे प्रकरण ताजे आहे आजही तेथील  परिस्थिती अत्यंत बिकट असून हिंसा व रक्तपात सुरूच आहे परंतु युक्रेन-रशिया आणि इस्राईल - गाझा पट्टी मधील ग्राउंड बातम्या प्रसिध्द करणारे पत्रकार तसेच गाझा पट्टी मधील युद्ध व हिंसा यासाठी गळे काढणारे किंवा सेव्ह गाझा बॅनर घेऊन मोर्चे काढणारे मानवधिकारी सेव्ह गाझा म्हणणारी दुटप्पी जमात आता गप्प का आहेत ?

▪️बांगला देशातील हिंदू समाजावर, महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारबाबत मूग गिळून बसले आहेत की, आता त्यांची दातखीळ बसली आहे ? असा प्रश्न सामान्य माणसाला  पडला आहे.

▪️बांगला देशातील हिंदू अत्याचाराचा मुद्दा सामान्य माणसात  मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

▪️जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकावर हल्ले केले जात असत शुक्रवारी सुनियोजित दगडफेक सुध्दा होत असे परंतु सुरक्षा रक्षकांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतिकाराला हिंसेची लेबल लावून किंवा छोट्या छोट्या घटनांची दखल घेऊन मानवाधिकार व पाळीव पत्रकार वळवळ करायचे.मानवाधिकाराची गळचेपी होत आहे अशा बोंबा मारून भारत सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या टोळ्या आता गप्प का आहे ? टोळ्या कोठे लपल्या आहेत. असा संतप्त प्रश्न सामान्य माणसात चर्चिला जात आहे.

▪️पत्रकारांनी  बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या सरकार पुरस्कृत अन्याय, अत्याचार आणि दडपशाहीची दखल घेऊन आपले निष्पक्ष पत्रकारीतेचे कर्तव्य पूर्ण करावे. बांगला देशातील सरकार पुरस्कृत आणि इस्लामी कट्टरपंथीयांकडून   हिंदुंचा छळ व नरसंहार जगा समोर आणावा

▪️ओडिसा मधील ग्रहाम स्टेंस- दारासिंग, कंधमाल मध्ये स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या झाल्या नंतर तेथे जनक्षोभामुळे उसळलेली दंगली, गुजराथ मधिल साबरमती एक्स्प्रेस कारसेवक यांना जिवंत जाळल्या नंतर गोध्रा दंगल, मणिपूर हिंसाचार या सर्व घटनांमध्ये काही पत्रकार आणि मानवाधिकारी यांनी जागतिक पातळीवर भारताची हिंदू कट्टरवादी अशी प्रतिमा मलिन केली होती.                                           ▪️आता बांगलादेशामध्ये मोहम्मद युनूस यांच्या खुनी सरकारकडून मानवी हक्क पायदळी तुडवून होत असलेल्या हिंदू नरसंहार घटनांवर विश्व मानव अधिकार दिना निमित्ताने खऱ्या मानवाधिकाऱ्याची  भूमिका घ्यावी.


 ▪️अशोक राणे  ▪️


- अशोक राणे

  • मानवाधिकारवाले
  • हिंदू
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

अशोक राणे

 सामाजिक (3), इतिहास (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.