•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सोनईत 'विराट हिंदू संमेलना'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जातीभेद गाडून संघटित होण्याचे आवाहन

विश्व संवाद केंद्र - पुणे 7 days ago
बातम्या  

 

सोनई : समाजातील भेदभाव दूर होऊन हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव, देश अन् धर्मासाठी समर्पित भावनेने कार्यरत व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त सोनई येथे आयोजित 'विराट हिंदू संमेलना'ला हजारो हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महादेव मंदिर प्रांगणात बुधवारी (दि. ८ एप्रिल) हे संमेलन संपन्न झाले.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधनकार ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के उपस्थित होते. बजरंग दलाचे अखिल भारतीय सहसंयोजक विवेकजी कुलकर्णी यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिनजी गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.

मुख्य वक्ते विवेकजी कुलकर्णी म्हणाले की, "संघाचे कार्य राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वयंसेवक घरोघरी जाऊन हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत. आगामी काळात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध, पर्यावरण आणि नागरिक कर्तव्य या 'पंच परिवर्तना'चे मुद्दे घेऊन संघ समाजात जाणार आहे. सर्व समाजाने जातीभेद विसरून धर्मकार्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे."

"बटोगे तो कटोगे आणि घाटोगे तो भी कटोगे," असा इशारा देत ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के यांनी समाजाला सावध केले. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांच्या विचारांवर समाजाने चालायला हवे. देव, देश आणि धर्मासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र यायला हवे."

- कुटुंबावरील संस्कार हीच खरी सुरक्षा : सचिनजी गायकवाड
सचिनजी गायकवाड यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केले. "राष्ट्रविरोधी शक्ती जाती-जातींमध्ये भेद पाडून हिंदू समाज तोडण्याचे काम करत आहेत. याला उत्तर देण्यासाठी आपल्या मुला-मुलींवर योग्य संस्कार करणे आणि त्यांना वेळीच सावध करणे ही पालकांची जबाबदारी आहे," असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

वैविध्यपूर्ण प्रदर्शनाचे आकर्षण
कार्यक्रमाची प्रस्तावना स्वप्नील भळगट यांनी केली. संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी सोनई व परिसरात अभूतपूर्व जनजागृती करण्यात आली होती. संमेलनाच्या ठिकाणी लव्ह जिहाद, गोहत्या, हिंदू संस्कृती आणि धर्म-विज्ञान या विषयांवर आधारित विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच 'भारतीय विचार साधना'तर्फे लावण्यात आलेल्या ग्रंथ विक्री दालनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुनमताई दरंदले यांनी केले. याप्रसंगी नेवासा तालुका कार्यवाह सुनील सावंत यांच्यासह सोनई परिसरातील हजारो माता-भगिनी आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सोनई
  • हिंदू संमेलन
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.