
चिन्मय प्रभु दास यांची बेकायदेशीर अटक: बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण
इस्कॉन बांग्लादेशच्या श्री चिन्मय प्रभू हे बांग्लादेशच्या शेख हसिना यांचे शासन उलथवून, प्रस्थापित करण्यात आलेल्या अराजक अश्या मोहंमद युनूस यांच्या धर्मांध शासनकाळात तेथील हिंदू समाजावर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा विरोध करून हिंदूंना संघटित आणि सक्षम करणाऱ्या चळवळीचे उर्धायु आहेत. श्री. चिन्मय प्रभू दासांना तेथील धर्मांध शासनाने बेकायदेशीरपणे अटक केली आहे आणि न्यायालयात त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांची देखील हत्या करण्यात आली आहे. तसेच, तेथे पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या विरुद्ध हिंसाचार उफाळून आला आहे अश्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत.
बांगलादेशातील हिंदूंची भयावह स्थिती आणि तेथे ठरवून सुरू असणाऱ्या नरसंहाराचे दाहक स्वरूप भीषण आहे — तेथे मंदिरे पाडली जाताये, घरे उद्ध्वस्त केली जाताय, महिलांवर अनन्वित अत्याचार केले जाताय, आणि हिंसक जमाव रस्त्यावर उतरून निरपराधांचे प्राण घेताय अशी परिस्थिती आहे.
हिंदूंच्या मानवाधिकरांचे असे निर्दयपणे उल्लंघन होत असताना एकूणच आंतरराष्ट्रीय समुदाय यावर मौन पाळून आहे. हीच शांतता या मानवतेच्या हत्याऱ्यांना प्रोत्साहन देते आहे. बहुतांश भारतीयांना देखील याविषयी एक तर माहिती नाही किंवा ते उदासीन आहेत.
आत्ता वेळ आली आहे की जगभरातील सामान्य नागरीक, मानवाधिकार संघटना आणि सरकारांनी संवैधनिक मार्गांनी आपापल्या परीने आवाज उठवून बंग्लादेशात होणाऱ्या या अमानवीय मानवाधिकार उल्लंघनाच्या आणि हिंदू वांशनाशाच्या घटनांसाठी तेथील सरकारास जबाबदार धरिले पाहिजे आणि त्यांना या घटना रोखण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. अन्यथा तेथील अत्याचारांना आपली देखील मुक संमती आहे असेच गृहीत धरले जाईल.
(c) ॲड. आशिष सोनवणे