•  15 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे

सम्राट कदम 24 days ago
बातम्या  

 

पुणे, विश्व संवाद केंद्र ः आपण आपल्या अनुभवाच्या आधारे विविध जीवनमुल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात 'सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यमे' या विषयावर आंबेकर बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, विश्व संवाद केंद्र पुणेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार म्हणून 'सकाळ माध्यम समुहा'चे संपादक सम्राट फडणीस यांना, आश्वासक पत्रकारितेसाठी 'महाराष्ट्र टाईम्स'चे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे आणि कोल्हापूर येथील 'टोमॅटो एफएम'च्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी, तर समाजमाध्यम विभागात 'मराठी किडा' या चॅनलचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

आंबेकर पुढे म्हणाले, "अस्तित्वाच्या संकटातून नव्हे तर लोककल्याणकारी आणि सकारात्मक दृष्टीकोणातून भारत राष्ट्र म्हणून उभे राहिले. राष्ट्र म्हणजे भाषा किंवा धर्माच्या आधारे राज्यांचा संघ अशी संकल्पना रूजली आहे. मात्र भारत म्हणून आपण या पलीकडील समान सूत्रांच्या आधारे एकत्र आलो आहोत. पाश्चिमात्य दृष्टीकोनातून धर्म, संस्कृती, परंपरा यांची व्याख्या करण्यात आली आहे. नव्या पिढीने डोळसपणे पाहत आशा संकल्पनांना आव्हान द्यायला हवे." माध्यमातील राष्ट्रीय विचारांची गरज अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "राष्ट्रीय विचारांचे जागर करण्याचे काम विश्व संवाद केंद्र करत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माध्यमांमध्ये राष्ट्रीय विचार रूजविणे गरजेचे आहे."

फडणीस म्हणाले, "पत्रकारिता सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी कल्पना स्विकारताना पत्रकारितेला प्रयत्नपूर्वक दिशा द्यायला हवी."

प्रसाद पानसे म्हणाले,"पत्रकारितेचे मूल्यमापन माध्यम समुहाबरोबरच समाजही करत असतो. आशा पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद आहे." नभोवाणीच्या माध्यमातूनही समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य करता येते. या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिक वाढल्याची भावना रसिका कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तर  सोशल मिडीयावर इन्फ्ल्यूयन्सर म्हणून कार्यकरताना आपल्या मुल्यांशी नाळ घट्ट हवी, असे खटावकर म्हणाले.

कार्यक्रमात पुणे श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे, पत्रकार संघाच्या सरचिटणीस मिनाक्षी गुरव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आनंद काटीकर यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमापूर्वी सुनील आंबेकर यांनी फर्ग्युसन मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या खोलीला भेट दिली. दिपा भांडारे यांनी नारद स्तवन केले. सूत्रसंचालन शिल्पा निंबाळकर यांनी केले. कार्यवाह आनंद काटीकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

----------

आंबेकर म्हणाले....

- डोळे बंद करून कोणतीही गोष्ट स्विकारू नये, आपल्या परंपरेतील सर्वच चांगले आणि पाश्चिमात्यांचे सर्वच वाईट असे नाही

- आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि आर्थिक संपन्नता आली. मात्र अनेक देशांत गरिबी, पर्यावरण आणि सामाजिक जिवनाशी निगडीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

- भारतीय दृष्टीकोणातून धर्म आणि विज्ञान असे द्वंद्व नाही

- संस्कृती म्हणजे व्यवहारिक दृष्टीकोण आणि नात्यांकडे बघण्याची दृष्टी

- पाश्चिमात्य संकल्पनांच्या डुप्लिकेशनचा शिक्षणाबरोबरच माध्यमांत चर्चा व्हायला हवी

- माध्यमांनी लोकप्रबोधनाचे कार्य हाती घ्यावे

----------------


- सम्राट कदम

  • RSS
  • सुनिल आंबेकर
  • नारद पुरस्कार
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

सम्राट कदम

- सहयोगी संपादक, विश्व संवाद केंद्र, पुणे
- विज्ञान, तंत्रज्ञान आणि उच्चशिक्षण पत्रकार
- भौतिकशास्त्रात एम.एस्सी. (भौतिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) 
- रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदव्यूत्तर पदविका
- विज्ञान, शिक्षण आणि ग्रामिण अर्थकारण हा  संशोधनाचा विषय 

 विज्ञान (5), रा. स्व. संघ आणि परिवार (2), माध्यमे (1), संस्कृती (2), हिंदुत्व (2), इतिहास (1), सामाजिक (2), महिला (1), उद्योग (1), सेवा (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.