कौशिक व्याख्यानमालेत डॉ. उपाध्ये, डॉ. निरगुडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन

पुणे, ११ डिसेंबर
कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत यंदा डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे यंदा चौथे वर्ष असून स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे.
पहिल्या दिवशी शनिवार १३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ लेखक आणि वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांचे 'अज्ञानी विरुद्ध ज्ञानी' या विषयावर व्याख्यान होईल. अभिनेते आणि व्याख्याते योगेश सोमण यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील.
'अस्थिरता, फुटीरतावाद आणि भारत' या विषयाव रविवारी १४ डिसेंबर रोजी डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान होईल. अतिरिक्त पोलिस उपायुक्त मनोज पाटील या वेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही व्याख्यानांची वेळ सायंकाळी सात असून सर्वांसाठी ही व्याख्यानमाला विनाशुल्क खुली आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था संस्थेतर्फे करण्यात आले आहे.