पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम गावातील ग्रामसभेने अलीकडील घटनांचा विचार करून एक ठोस आणि लक्षवेधी निर्णय घेतला आहे. गावातील हिंदू मंदिरांवरील विटंबना, हिंदू धार्मिक स्थळांवर जाणीवपूर्वक अवमानाची कृत्ये, तसेच 'लँड जिहाद'च्या माध्यमातून भूखंड खरेदी करून ग्रामीण जीवनात सांस्कृतिक बदल घडवण्याचे प्रयत्न — या सर्व प्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र अशांतता पसरली होती. या पार्श्वभूमीवर, बाहेरगावाहून येणाऱ्या मुस्लिम व्यक्तींवर प्रवेशबंदी लादण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. गावकऱ्यांनी ‘मुस्लिम समाज नियंत्रण समिती’ स्थापन करून सामाजिक सुरक्षा, धार्मिक सन्मान आणि स्थानिक संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित प्रयत्न सुरू केले आहेत. हा निर्णय केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर हिंदू अस्मिता आणि सामुदायिक आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी घेतला गेलेला एक सामाजिक प्रतिसाद म्हणूनही पाहिला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अलीकडेच जे घडते आहे, ते केवळ स्थानिक घटना न राहता, एक व्यापक हिंदू जागृतीचे उदाहरण ठरू लागले आहे. जून २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामसभेने हिंदू समाजाच्या धार्मिक अस्मिता, सांस्कृतिक पवित्रता आणि स्थानिक सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण ठराव संमत केला. या ठरावाअंतर्गत ‘मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती’ची स्थापना करण्यात आली असून, बाहेरगावाहून येणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना नेरे दत्तवाडी, घोटवडे, पिरंगुट, वाडकी आणि लवळे ग्रामप्रवेशास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या समितीचे मुख्य उद्देश ग्रामदेवता व देवस्थानांची पवित्रता अबाधित राखणे, तसेच बाह्य व्यक्तींकडून होणाऱ्या सुरक्षेच्या आणि धार्मिक विघटनाच्या संभाव्य धोक्यांना प्रतिबंध घालणे असा आहे. ग्रामविकासाच्या नावाखाली चालणाऱ्या ‘लँड जिहाद’सारख्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ही समिती ग्रामस्थांना मार्गदर्शन करत आहे.

समितीने गावातील मुस्लिम व्यावसायिकांची माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले असून, ग्रामस्थांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, मुस्लिम मालकीच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरून खरेदी टाळणे, धार्मिक दृष्टिकोनातून वादग्रस्त तत्वप्रवृत्तींना जागा भाड्याने न देणे यांसारख्या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
भारतभरात — विशेषतः जम्मू, हैदराबाद, दिल्ली आणि मालेगाव यांसारख्या शहरांमध्ये — रोहिंग्या मुसलमान बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या घुसखोरांच्या काही गटांचे दहशतवादाशी संभाव्य संबंध असल्याबद्दल गंभीर इशारा दिला आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मुळशीसारख्या भागांमध्ये रोहिंग्या आणि इतर घुसखोर मुसलमानांची अनधिकृत वसाहत होणे ही एक उद्भवणारी सुरक्षा जोखम आहे.
यामुळे केवळ धार्मिक-सांस्कृतिक समतोल बिघडण्याचा धोका नाही, तर स्थानिक सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. भुकूम ग्रामस्थांनी केलेला ‘प्रतिबंधात्मक’ ठराव हा कोणत्याही समुदायाच्या विरोधात नसून, विशिष्ट विचारसरणीच्या आणि घुसखोर प्रवृत्तींविरुद्धचा एक नियोजनबद्ध सामाजिक प्रतिसाद आहे. या निर्णयाची प्रेरणा शेजारील नेरे दत्तवाडी, पिरंगुट, घोटवडे, लवळे व वाडकी या गावांमधील अशाच स्वरूपाच्या ठरावांतून मिळाली आहे. हिंदू समाजाच्या अस्तित्वासाठी सुरू झालेली ग्रामपातळीवरील वैचारिक क्रांती
- नेरे दत्तवाडी
मुळशी व्यतिरिक्त, नेरे दत्तवाडी गावाने मे महिन्यात मुस्लीम व्यापार्यांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पौड येथील मंदिर विटंबना आणि पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना, नेरे दत्तवाडीतील ग्रामस्थांनी केवळ निषेधापुरते थांबून न राहता, प्रत्यक्ष कृतीद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.
गावकऱ्यांचा रोष केवळ भावनात्मक नव्हता, तर त्यामागे ठोस निरीक्षण होते — काही विशिष्ट मुस्लीम व्यापारी व्यवसायाच्या नावाखाली गावात शिरकाव करत होते, आणि त्याचवेळी 'धार्मिक प्रचार', 'स्थलांतर जिहाद' आणि ‘लँड जिहाद’ सारख्या रणनीतींना चालना देत होते. अल्पावधीत जमिनींची खरेदी, आर्थिक प्रलोभन देऊन लोकसंख्येचा समतोल बदलण्याचे प्रयत्न, आणि स्थानिक हिंदू संस्कृतीवर दबाव निर्माण करण्याचा धोका ग्रामस्थांनी ओळखला.
- पिरंगुट
पुणे जिल्ह्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीने एक ठराव संमत करून गावाबाहेरील मुस्लिम व्यक्तींना गावातील मुख्य मशिदीत, विशेषतः शुक्रवारी, नमाज पठाण करण्यास मनाई केली.
गावाबाहेरील, विशेषतः अनोळखी मुस्लीम व्यक्तींच्या सततच्या वावरामुळे गावात ‘धार्मिक एकत्रीकरण’ होऊ लागले होते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी किंवा रमजानसारख्या सणांवेळी बाहेरून येणाऱ्या नमाज पठणासाठीच्या गर्दीमुळे 'धार्मिक एकत्रीकरण' वाढू लागले होते. ही गर्दी केवळ धार्मिक विधीसाठी मर्यादित राहिलेली नसून, तिचा अप्रत्यक्ष परिणाम स्थानिक जनजीवनावर होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले. वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, महिलांना असुरक्षित वाटणे, गल्ली बोळांत अनोळखी लोकांचा वावर, आणि एक प्रकारचा मानसिक दबाव — हे सर्व परिणाम या निर्णयामागे कारणीभूत ठरले.
ग्रामसुरक्षा समितीच्या शिफारशींनंतर आणि पोलीस प्रशासनाशी विचारसिमर्ष करून हा निर्णय घेण्यात आला. यामागे कुठलाही धार्मिक पूर्वग्रह नसून, गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न केंद्रस्थानी होता, असा ग्रामपंचायतीचा दावा आहे.
- घोटवडे
मुळशी तालुक्यातील घोटवडे ग्रामपंचायतीने नोव्हेंबर २०२४ मध्ये एक स्पष्ट आणि ठोस निर्णय घेतला होता त्या अंतर्गत गावातील मशिदीत बाहेरगावच्या मुस्लिम व्यक्तींना प्रवेशबंदी लागू करण्यात आली.
स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामसुरक्षा समितीच्या सांगण्यानुसार, अलीकडच्या काही महिन्यांत गावाबाहेरील नमाज पठणासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह, द्वेषमूलक प्रचार केला जात होता. या पोस्ट्समुळे गावात धार्मिक तणावाची शक्यता निर्माण झाली होती, तसेच स्थानिक हिंदू समाजामध्ये अस्वस्थता वाढली होती.त्यामुळे, गावाच्या सामाजिक समतोल, कायदा-सुव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने, ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
- गारडे
गारडे ग्रामपंचायतीने जानेवारी २०२५ मध्ये घेतलेला निर्णय हा मुळशीतील उगम पावलेल्या "सजगतेच्या ग्राममॉडेल" चा पुढचा टप्पा ठरला. या निर्णयानुसार, बाहेरगावच्या मुस्लिम व्यक्तींना गारडे गावच्या हद्दीत नमाज पठणास मनाई करण्यात आली.
ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामागे दिलेला स्पष्ट युक्तिवाद म्हणजे – पौड, घोटवडे आणि पिरंगुट यांसारख्या आसपासच्या गावांमध्ये झालेल्या विघटनात्मक घटनांचा दाखला. या ठिकाणी धार्मिक एकत्रीकरणाच्या नावाखाली सुरू झालेली छुपी घुसखोरी, समाजमाध्यमांवरील उत्तेजक मजकूर, आणि सांस्कृतिक दबाव निर्माण करणाऱ्या गोष्टींनी गावकऱ्यांना सावध केले होते. या व्यतिरिक्त वडकी आणि लवळे गावांमध्येही शुक्रवारी वाढणारी गर्दी, बाहेरगावच्या लोकांचा वावर, आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांचा विचार करून बाहेरगावच्या मुस्लिमांना मशिदींमध्ये प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे निर्णय मुळशीतील काही अपवादात्मक प्रतिक्रिया नसून, देशभरात सुरू झालेल्या एक व्यापक सजगतेच्या लाटेचे प्रतिबिंब आहेत. मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही हिंदू समाजाने धर्मरक्षणाच्या दृष्टीने ठोस आणि स्थानिक पातळीवर प्रभावी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनांमधून स्पष्ट होते की, ‘सहिष्णुतेचा गैरफायदा घेणाऱ्या’ कट्टर प्रवृत्तींना उत्तर देण्यासाठी हिंदू समाज आता सजग झाला आहे आणि "धर्मनिरपेक्षतेच्या मुखवट्याआड लपलेल्या घुसखोरीला" सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद वाढत आहे.