•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

सेवा भारतीतर्फे पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

विश्व संवाद केंद्र - पुणे 13 days ago
बातम्या  

सेवा भारतीतर्फे पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा 


“भारतामध्ये कुठल्याही भागात नैसर्गिक अथवा मानवी आपत्तीमध्ये संघ स्वयंसेवकांचा मदत कार्यासाठी नेहमी पुढाकार - श्री राहुल पोखरकर”

रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ ः सेवा भारती या संस्थेनी पुण्यात कात्रज व पर्वती भागातल्या स्वयंसेवकांसाठी व नागरिकांसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ (Disaster Management) या विषयाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.
 

नागरी संरक्षण दलाचे राहुल पोखरकर, श्रीकृष्ण पाटील व प्रमोद मोरे यांनी हा प्रशिक्षण वर्ग पद्मावती इथल्या वि.स. खांडेकर शाळेत घेतला. यावेळी बोलताना पोखरकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मदत कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, " गेली १०० वर्षे भारताच्या कुठल्याही भागात नैसर्गिक अथवा मानवी निर्मित आपत्तीमध्ये संघ आणि संघ स्वयंसेवक हे आपत्ती निवारणेसाठी पुढाकार घेऊन मदत कार्यासाठी तत्पर राहिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आणि भविष्यातसुद्धा याची गरज ओळखून या विषयात स्वयंसेवकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे ज्यांनी आपत्ती काळात प्रशासन आणि समाज यांना सहाय्य करता येईल या उद्देशाने हा वर्ग आयोजित केला होता."


प्रथम सत्रामध्ये श्री पोखरकर यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ म्हणजे नेमके काय? ‘आपत्ती’ ची व्याख्या, त्या मधले प्रसंग आणि ‘प्रथम प्रतिसादकांसाठी’ (First Responder) मूलभूत मार्गदर्शक माहिती दिली. यात प्रथम प्रतिसादकाने पूर्वतयारी म्हणून काय करावे, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा, कुठली साधने वापरावी असे अनेक मुद्दे समर्पक उदाहरणे आणि संदर्भासहित स्पष्ट करून सांगितले. 
त्यानंतरच्या कार्यशाळेत श्री पोखरकर, श्री पाटील आणि त्यांच्या टीम ने CPR चे प्रात्यक्षिक देऊन, CPR कधी व कसे द्यावे, कोणाला द्यावे, कोणाला देऊ नये हे सूक्ष्म पद्धतीने प्रकाश टाकून शिकवले.
त्याचबरोबर हाड तुटलेल्या रुग्णाला किव्वा तीव्र जखम झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचार कसे द्यावे हेही शिकवण्यात आले.


एका कार्यशाळेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरी आग लागल्यावर ती कशी वीझवावी, आग लागण्याची दुर्घटना घडू नये  म्हणून कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यशाळेत साधारण ८५+ महिला व पुरुष उपस्थित होते.  त्याच बरोबर सेवा भारती संस्थेचे प.महाराष्ट्र सचिव श्री प्रदीप सबनीस, प.महाराष्ट्र सहसचिव श्री अविनाश नाईक व श्री मुकुंदराव दरेकर हे आवर्जून उपस्थित होते.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • सेवाभारती
  • संघ
  • प्रशिक्षण
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.