•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मराठी भाषा दिन -मराठी भाषा संवर्धन काळाची गरज

वैशाली काळे गलांडे 24 days ago
दिन विशेष   भाष्य  

 

                                                                मराठी भाषा संवर्धन काळाची गरज
 
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे.यानिमित्त मराठी भाषेचे वास्तव समजून घेऊन तिचे संवर्धन करणे, हे मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य आहे.
सध्याचे यांत्रिक युग ऐहिक सुखास प्राधान्य देणारे आहे. जागतिकीकरणाच्या झंझावातात आधीच इंग्रजाळलेल्या आपल्या संस्कृतीस पश्चिमी विचार प्रभावी वाटू लागले आहेत.इंग्रजी भाषेचा अत्यंत प्रभावी पगडा जनमानसावर पडला आहे . लहान लहान गावातून सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. त्यातच सीबीएससी शाळांचे अक्षरशः पेव फुटले आहे. मराठी भाषाच त्यांच्याच अभ्यासक्रमातून बाहेर पडत आहे. त्यामुळे मराठी भाषेचे भवितव्य अंधारात आहे . महाराष्ट्रीयन मुलांना मराठी भाषा नीट लिहिता वाचता येत नाही अशा प्रकारचा नकारात्मक सूर सध्या समाजात पसरला आहे . येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे. ही मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

 

जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी मराठी भाषा बोलली पाहिजे . जेथे जेथे दोन व्यक्तींना मराठी येते तेथे तेथे बोलण्याची माध्यम भाषा मराठीतच असली पाहिजे. जास्तीत जास्त आपण मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.                                              

मराठीतील बोलीभाषा भरपूर आहेत. बोलीभाषा कोकणी, अहिराणी ,विदर्भी अशा आहेत. त्यांच्यामध्ये साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मातृ भाषेतून  शिक्षण हा महत्त्वाचा  टप्पा आहे.  
 
भाषेत लवचिकता आणणे आवश्यक. व्यावहारिक कामे करताना इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत समाविष्ट केले पाहिजेत. विविध विषयावरील साहित्य मराठी भाषेत आणले पाहिजे.  मराठी ज्ञानकोश ,शब्दकोश ,परिभाषा कोश समृद्ध केला पाहिजे.                                                        
 
भाषांतरित साहित्य हे ललित साहित्यापुरते मर्यादित न राहता व्यवस्थापन ,विज्ञान ,समाजशास्त्र अशा विविध अंगाने समृद्ध झाले पाहिजे .त्यासाठी आपण मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत.                                          
 
जागतिक स्तरावर मराठीचा प्रभाव पाडण्यासाठी उच्च दर्जाच्या अफाट वाचनाची गरज असून उत्तमोत्तम साहित्य मराठीतून आणले पाहिजे . उत्साहवर्धक वाङमयीन वातावरण निर्माण केले पाहिजे.                                                                                                                           
 
गीताग्रजा
(डॉ वैशाली काळे-गलांडे)

- वैशाली काळे गलांडे

  • मराठी भाषा दिन - मराठी भाषा संवर्धन काळाची गरज
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

वैशाली काळे गलांडे

शिक्षण- बी.ए.एम.एस. (आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा,  १९९५); डिप्लोमा इन योगशास्त्र, एम.ए. (संस्कृत)

आयुर्वेदिक कन्सल्टंट, कोल्हापूर.

शाश्वत प्रगतीसाठी शेतीचे विविध प्रयोग चालू.

'गीताग्रजा' या टोपणनावाने लिखाण
 

 संस्कृती (1), हिंदुत्व (1), इतिहास (1), सामाजिक (2), साहित्य (1), शिक्षण (1), कला (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.