
पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२५: केरळमधील २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अनंतु अजी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून "लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत लैंगिक शोषण" झाल्याच्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टीच्या (सीपीएम) युवा आघाडीने यासंदर्भात आरोप केले आहेत. कोट्टयम इथं राहणाऱ्या या युवकाच्या आत्महत्येचा संघाशी संबंध जोडून सुनियोजित पद्धतीने बदनामी करण्यात येत आहे. याचे फॅक्ट चेक नक्की काय आहे, ते आपण जाणून घेऊयात.
२६ वर्षांचा अनंतु आपल्या बालपणी संघ शाखेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगत असेल, आणि तेही आत्महत्येच्या प्रसंगी, तर निश्चितच यामागे संदिग्धता आहे. केरळमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील काही तथ्ये आपण बघूया:
- संघाशी संबंध: अनंतु अजी हा दिवंगत श्री. अजी यांचा मुलगा आहे. अनंतुचे वडील, अजी, सहा वर्षांपूर्वी वारले. अजी आणि अनंतु हे दोघेही कधीकाळी संघ स्वयंसेवक होते. मात्र, अनंतु तोडूपुझा येथील अल-अझहर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून सुमारे पाच वर्षांसाठी संघापासून दूर झाला होता. त्याच्या अंतिम नोटमध्ये, अनंतुने त्याच्या संघ-संबंधित मित्रांची नावे आणि त्यांच्यासोबतच्या चांगल्या संबंधांचाही उल्लेख केला आहे.
- अनंतुची मानसिक आरोग्याची स्थिती: अनंतु ओ.सी.डी. (Obsessive Compulsive Disorder), पॅनिक अटॅक, चिंता (Anxiety) आणि नैराश्याने त्रस्त होता (संदर्भ - इंस्टाग्राम पोस्ट). त्यासाठी तो उपचारही घेत होता. कुटुंब नियमित समुपदेशन आणि क्लिनिकल फॉलो-अप्सची पुष्टी करते. या काळात तो अंतर्मुख (Introverted) झाला होता आणि त्याला वारंवार पॅनिक अटॅक येत असत. त्याने आपण नास्तिक (Atheist) आणि अविश्वासू बनल्याचे कारण देत बालपणीच्या मित्रांपासून दूर राहणे सुरू केले होते.
- बहिणीचे वैयक्तिक आयुष्य: स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतुच्या बहिणीचे अन्झिल बशीर या मुस्लिम युवकासोबत प्रेम होते. त्यांचा विवाह झाल्याची चर्चा आहे. हे नाते घरातील बहुतेकांनी स्वीकारले असले तरी, घरात चिंतेचे वातावरण होते. अनंतुच्या कुटुंबाने आपले जुने संबंध दूर सारले होते आणि सामाजिक संपर्कही कमी झाला होता.
- इंस्टाग्राम पोस्ट आणि तथ्य:
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली पोस्ट नियोजित वेळेनुसार (Scheduled Upload) अपलोड केल्याचे दिसते. मात्र, अनंतुच्या मूळ मजकुराच्या नोटमध्ये प्रकाशित होण्यापूर्वी अनेक तारखांवर संपादन केल्याचे दिसते (उदा. सप्टेंबरच्या सुरुवातीला लिहिण्याचा संदर्भ, नंतरचे संपादन आणि ४ ऑक्टोबर रोजी अंशतः भाषांतर).

- फॉरेन्सिक पडताळणी गरजेची:
१. अनंतुच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया गतिविधींचा संपूर्ण संपादन इतिहास तपासणे गरजेचे आहे, ज्यामुळे पोस्टमध्ये कोणी आणि कधी बदल केले, हे स्पष्ट होईल.
२. लॉगिन ऑडिट (आयपी/आयएमईआय, डिव्हाइस आयडी, भौगोलिक स्थान) तपासणे गरजेचे आहे. त्याच्या नेहमीच्या डिव्हाइसव्यतिरिक्त किंवा इतर कोणी त्याच्या अकाउंटमध्ये प्रवेश केला होता का, याचा तपास आवश्यक आहे.
३. त्रयस्थ व्यक्तीने लॉगिन केले होते का (कुटुंबाच्या उपकरणांमधून, ज्याचा बाहेरील व्यक्तींना प्रवेश आहे, यासह); त्याचा फोन/संगणक कायदेशीररित्या जप्त करून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
४. ही पोस्ट केवळ अनंतुनेच लिहिली किंवा पोस्ट केली होती की कोणीतरी अनधिकृत प्रवेश केला होता, हे निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्यासाठी एक नियोजित कटाचा हा भाग असू शकतो. कारण एका सुनियोजित पद्धतीने सोशल मिडीयावर एक कॅंपेन चालवल्याचे दिसते.
संघ शताब्दी वर्षात संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.याची सविस्तर चौकशी करुन दोषीला शिक्षा मिळाली पाहिजे.
महेंद्र छगनलाल देसाई
15 Oct 2025 16:38
या गोष्टीचा सखोल अभ्यास करून ज्याने संघाला बदनाम करण्याचे प्रयत्न चालवलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजेत. जय श्रीराम
प्रशांत गणपतराव पाटील
14 Oct 2025 09:58