बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे भूमिपूजन
Mar 22, 2023 10:30 To 12:30
पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या प्रस्तावित ८०० खाटांचे भव्य सुसज्ज आणि अद्ययावत वास्तूच्या पहिल्या टप्प्याचा भूमिपूजन समारंभ मा.डॉ.श्री. मनसुख मांडवीया केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री,भारत सरकार यांच्या शुभहस्ते होत आहे.
या कार्यक्रमास मा श्री.चंद्रकांतदादा पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री.भय्याजी जोशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. श्री.स्वामी गोविंदगिरी महाराज, मानद अध्यक्ष,पुणे., वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान आणि कोषाध्यक्ष, श्री.राम जन्मभूमी न्यास अयोध्या, मा.श्री.आदर पुनावाला, सी.ई.ओ. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मा.श्री.नानासाहेब जाधव, प्रांत संघचालक,पश्चिम प्रांत,महाराष्ट्र या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी आपण मित्रपरिवारासह उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
विनित : विश्वस्त मंडळ पुणे वैद्यकिय सेवा व संशोधन प्रतिष्ठान.
शनिवार दि २२/४/२०२३ अक्षय तृतीया रोजी सकाळी १०.३० वाजता.
स्थळ:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह,पुणे-सातारा रोड,विवेकानंद पार्क जवळ,बिबवेवाडी,पुणे ४११ ०३७.
[विशेष विनंती : सुरक्षेच्या कारणास्तव आपण कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी १५ मिनिटे आसनस्थ व्हावे.]