पुण्येश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव
पुणे, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ ः कसबा पेठेतील पुण्येश्वर महादेव महाशिवात्र उत्सव येथील पुण्येश्वर मारूती मंदिरासमोर साजरा करण्यात आला. यावेळी 'आई भवानी शक्ती दे , पुण्येश्वराला मुक्ती दे' असा जयघोष करण्यात आला होता. समर्थ ढोल पथकाचे वादन, संकल्प सिद्धीसाठी होम , एक हजार महिलांचे महामृत्युंजयाचे जप , पाच हजार रुद्राक्षांचे वाटप, महाआरती आणि अघोरी नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हभप संग्राम बापू भंडारे यांचे व्याख्यान व महाआरती झाली आहे. कार्यक्रमाला सर्व गणेश मंडळ, हिंदुत्ववादी संघटना, महिला बचत गट, सर्व राजकीय पक्ष अशांची उपस्थिती होती. हभप भंडारे यांच्या भाषणाने पूर्ण परिसर जय पुण्येश्वरच्या घोषणांनी दुमदुमून गेला. सर्वांनी मिळून पुण्येश्वर पुनर्निमानाचा संकल्प घेऊन यापुढेही मोठ्या संख्येने येण्याचा आश्वासन दिले. गणेश मंडळांनी नारळ व हारांचे तोरण मिरवणुकीने वाजत गाजत येऊन पुण्येश्वरला वाहिले.
दिवसभरामध्ये सुमारे दहा हजार भाविकांनी पुण्यश्वेराचे दर्शन घेतले. खासदार मेधा कुलकर्णी,आमदार हेमंत रासने,आमदार सुनील कांबळे व सर्व पक्षीय नगरसेवक यांनी देखिल कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे संयोजक कुणाल कांबळे यांनी केले. समितीमधील राहुल पुंडे , विवेक कुलकर्णी ,सुनील तांबट, किरण शिंदे, भरत ढोके, सागर तारू, लोकेश कोंढरे, अनिकेत वाडकर, आनंद घाळी , सर्वेश कुलकर्णी ,विजय जाधव , ओंकार फंड ,विशाल पवार, मोनु तिकोने , गणेश मंडळ कार्यकर्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. पोलिसांचे व मनपा प्रशासनाचे हि उत्तम सहकार्य लाभले.