लॅंड जिहादनंतर आता हौंसिग जिहाद
एसआरए प्रकल्पांत अपात्र मुस्लिमांना घरे; मुंबईतील धक्कादायक प्रकार

झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली नव्या हौसिंग सोसायटीमध्ये बेकायदा अपात्र मुस्लिमांना घरे दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. आधी हिंदू बहुल असलेली सोसायटी पुनर्विकासानंतर मुस्लिम बहुल होत आहे. एकप्रकारे गृहनिर्माण संस्थाच बळकवण्यासाठी मुस्लिम बांधकाम व्यावसायिकांकडून ही खेळी केली जात आहे. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, वोट जिहादनंतर देशभरातच आता “हौसिंग जिहाद”(HOUSING JIHAD) विक्राळ स्वरूप धारण करत आहे.
“हौसिंग जिहाद”च्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमध्ये मुस्लिमांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांभिर्याची बाब म्हणजे या प्रक्रियेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा देखील समावेश आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस. आर. ए) प्रकल्पांमध्ये "हाऊसिंग जिहाद" होत असल्याचा आरोप केला आहे.
- “हौसिंग जिहाद” काय प्रकार आहे ?
आधी हिंदूबहुल असलेल्या गृहनिर्माण संस्था पुनर्विकासानंतर मुस्लिम बहुल होत आहेत. याचा अर्थ जाणीवपूर्वक हिंदू समाजाला या जिहादच्या माध्यमातून लक्ष केलं जात आहे. प्रामुख्याने “हौसिंग जिहाद” हा मुस्लिम बांधकाम व्यावसायिकांकडून पुरस्कृत करण्यात येत असून काही प्रकल्पांमध्ये, मुस्लिम बांधकाम व्यावसायिक बनावट नोंदी तयार करून, एका कुटुंबाला एकापेक्षा जास्त घरे दिली आहेत, वीज बिलांमध्ये फेरफार करून अपात्र लोकांना पात्र दाखवले जात आहे. यात
अब्दुल सुभान किताबुल्ला- १७ घरे
अब्दुल गनी किताबुल्ला-१३ घरे
जनून इकबाल घासवाला - १९ घरे
सरीम सिकंदर घासवाला, अतीकुर रेहमान घासवाला अशी अनेक नावे समोर येत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एस. आर. ए) नियमानुसार एका व्यक्तीला एकच घर मिळू शकते. उदाहरणार्थ, २०२१ मध्ये ओशिवरा येथील एका परिसरात ४५ झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र होत्या, परंतु २०२२ मध्ये हा आकडा ८२ वर गेला आणि २०२३ मध्ये ९५ वर पोहोचला. निरुपम यांच्या मते, हे वाढलेले आकडे बनावट नोंदींचे परिणाम आहेत.

- झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाऱ्यांची मिलीभगत
संजय निरुपम यांनी मुंबईत होणाऱ्या हौसिंग जिहाद मधील घटना समोर आणल्या आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की मूळ हिंदू रहिवासी अल्पसंख्याक बनत असून, पुनर्वसन झालेल्या भागांमध्ये मुस्लिम रहिवासी बहुसंख्य होत आहेत. श्री शंकर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (शास्त्री नगर) आणि ओशिवरा पॅराडाईस 1 आणि 2 (जोगेश्वरी पश्चिम) यांसारख्या प्रकल्पांची नावे समोर येत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी आणि काही बांधकाम व्यावसायिक मिळून बेकायदेशीररित्या पात्रता ठरवून मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत.
या जिहादच्या घटना मुख्यतः पश्चिम उपनगरांसह गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, साकीनाका आणि बांद्रा या भागांत घडत आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ६०० प्रकल्पांपैकी सुमारे १०% प्रकल्प मुस्लिम बांधकाम व्यावसायिक चालवत आहेत. अशा जिहादच्या घटनांमधून जाणीवपूर्वक हिंदूंनाच बदनाम केले जात आहे. “हौसिंग जिहाद” हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी जोडलेला गंभीर विषय आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली बेकायदेशीर घुसखोरांना आश्रय दिला जात असून हिंदू समाज आपल्या हक्काच्या ठिकाणी अल्पसंख्य होण्याची भीती निर्माण झाली आहे.