महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे स्थान अढळ आहे. गेली सातशेहून अधिक वर्षे विठ्ठल भक्ती आणि समतेचा विचार घेऊन ही परंपरा अविरतपणे चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात पुण्यातील एका नास्तिक की फास्तीक परिषदेच्या निमित्ताने मुग्धा कर्णिक या स्वतःला समाजशास्त्राची अभ्यासक म्हणवणाऱ्या बाईंनी वारी, विठ्ठल आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल जी विधाने केली, ती अत्यंत खालच्या पातळीवरची आहेत. कर्णिक यांनी वारीला 'मानवी ऊर्जेचा अपव्यय' आणि 'कालबाह्य' म्हटले आहे. यामुळे वारकरी आणि हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण होणे आवश्यक आहे. तसेच वारीसारख्या सामाजिक समरतेच्या गंगेबद्दल बोलण्याची हिची पात्रता आहे का, हेही तपासले पाहिजे. आयुष्यभर मार्क्सचा जप करणाऱ्या या विदुषीने खरे तर स्वतःच्या बौद्धिक दारिद्रयाचेच पुन्हा एकदा प्रदर्शन केले आहे.

वारकरी संप्रदाय आणि समरसता :
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सशक्त प्रवाह आहे. याची सुरूवात १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी केली आणि संत तुकारामांनी याला घराघरात पोहोचवले. 'वारी' म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी केली जाणारी पदयात्रा. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो हिंदू विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत जातात. ही वारी म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक समरसता टिकवून ठेवणारी जिवंत परंपरा आहे. वारीच्या रूपाने जात, धर्म आणि लिंग वगैरे भेदभावाचा लवलेश नसलेली समरसतेची गंगा वाहते. मुग्धा कर्णिक यांनी या व्यापक सामाजिकतेकडे केवळ भौतिक दृष्टिकोनातून पाहून वारीला 'कालबाह्य' ठरवले आहे.

मुग्धा कर्णिक: वैचारिक पार्श्वभूमी आणि निरीश्वर विचार :
मुग्धा कर्णिक मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाची माजी संचालिका आहेत. यांनी समाजशास्त्रात शिक्षण घेत आहे म्हणे, आणि नास्तिकता आणि पाश्चात्य तर्कवादाचा पुरस्कार करणाऱ्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. रिचर्ड डॉकिन्स यांच्या 'द गॉड डिल्यूजन' या पुस्तकाचा त्यांनी 'देव नावाचा भ्रम' या नावाने अनुवाद केला असून, त्यात यांनी देवाला मानवी कल्पनाशक्तीचा भ्रम मानले आहे.
- वारी आणि संतांवरील टीका
पुण्यातील नास्तिक परिषदेत आणि 'ऐसीअक्षरे' मधील लेखात कर्णिक यांनी वारीवर थेट हल्ला केला. यांच्या मते, आजच्या आधुनिक काळात वाहने असताना अनवाणी चालणे हा परंपरेचे लोढणे म्हटले आहे आणि ही ऊर्जेची नासाडी आहे. संतांची अभंगवाणी ही केवळ त्या काळातील भक्ती कविता असून, आज तिचे महत्त्व संपले आहे.
- समाजशास्त्रीय विश्लेषण: अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध श्रद्धा
मुग्धा कर्णिक यांनी निरीश्वरवादाच्या नावाखाली हिंदू धर्मातील प्रथांची तुलना 'वहाबी' कट्टरवादाशी केली आहे. वारीला 'कालबाह्य' म्हणताना त्यांनी महाराष्ट्राच्या सामूहिक जाणीवेकडे आणि भावनेकडे दुर्लक्ष केले. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) नुसार दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखवण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नाही. कर्णिक यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासक म्हणवून घेत असतानाही वारीतील सामाजिक समरसतेचा अनादर केला आहे.
वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून, ती केवळ श्रद्धा नाही तर एक समृद्ध जीवनपद्धती आहे. मुग्धा कर्णिक यांनी निरीश्वरवादाच्या नावाखाली वारीला 'ऊर्जेचा अपव्यय' संबोधून आणि संत तुकाराम महाराजांचा 'आडाणदेव फुकाराम' असा अपमान करून महाराष्ट्राच्या भावविश्वावर जीवघेणा आघात केला आहे. हिंदू समाज सहिष्णू आहे, मात्र संतांची विटंबना सहन केली जाणार नाही. वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध जीवनाचे प्रतीक आहे. हे प्रतीक कोणीही, कितीही प्रयत्न केले तरी विटाळणार नाही. आपल्या महान संस्कृतीचे रक्षण करणे आणि विघातक विचारांना रोखणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकार्य आहे. मुग्धा कर्णिक हिच्या भाषणाची लायकी…

कर्णिक बाई स्वतःला समजशास्त्राची विद्वान समजते, पण एखादी गोष्ट सभ्येतेने कशी मांडावी, एवढी साधी अक्कल हिला नाही. आडाणदेव फुकाराम असे शब्द यांनी तुकाराम महाराजांना वापरले. वारी कालबाह्य झाली म्हणते. या विद्वान बाईला साधी अक्कल पाहिजे होती की, हिंदू संस्कृतीत नास्तिकतेलाही जागा आहे. आयुष्यभर देवळात गेला नाही तरी तो हिंदूच असतो. हिंदुत्व हे काही १४०० वर्षे बुरसटलेला एखादा मजहब नाही. अत्यंत प्रवाही आणि कालसुसंगत जीवन पध्दती म्हणजे हिंदुत्व आणि नास्तिक शब्द पाहिला तर, कसा बनला हो ? आस्तिक या शब्दाला न् लावूनच नास्तिक शब्द तयार झाला ना? मग आस्तिक शब्द नसता तर नास्तिक शब्दाला काय अर्थ उरला असता? आणि तुमच्या नास्तिक परिषदेलाही कोणी भीक घातली असती? जर वारी किंवा वारकरी संप्रदाय कालबाह्य झाला असं म्हणालात ना? मग हिजाब, हलाला, याला काय म्हणणार? जर वारी किंवा वारकरी संप्रदाय कालबाह्य आहे, मग धर्मांतरण कालसुसंगत आहे की, सेक्युलॅरीझम? स्वतःला समजशास्त्राच्या अभ्यासक म्हणवता? तुम्हाला वारीतील समरसता समजत नाही आणि तुम्ही कसल्या अभ्यासक? दुर्दैव असे की, हिंदू समाज मुग्धाबाईंची मुक्ताफळे खपवून घेतो. तुम्ही जिथून एकोपा निर्माण होईल असं थोतांड पसरवता ना, तिथून नक्षलवादी निर्माण होतात, आणि तुम्ही ज्या संघावर, वारीवर, विश्व हिंदू परिषदेवर टीका करता ते भारतभर राष्ट्रवादी समाज निर्माण करत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची तुमची लायकी आहे का? जाता जाता ही म्हणते, चिकित्सक विचाराच्या नावाखाली आडाणदेव श्री फुकाराम. हे यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची खिल्ली उडवण्यासाठी म्हटले आहे.
अहिंदूबाबत काही बोलायचं म्हणजे हिच्यासारख्यांची दातखिळी बसते. तिकडे काही बोललं तर मुंडकी मारतात, हे यांना माहीत आहे. म्हणूनच हे शेपूट घालून बसतात. विठ्ठलाबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, वारीबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या या बाईला रस्त्यावर फिरणं कठीण केलं पाहिजे.
तसं हिची फार काही कुणी दखल घेतली नाही. कोणती नास्तिक की, फास्तीक परिषद झाली हेही लोकांना माहीत नाही. पण काळ सोकावू द्यायचा नसेल तर प्रत्येक हिंदूने यावर तीव्र आक्षेप घेणे हे त्याचे धर्मकार्य आहे. हिंदूंनो उठा आणि आपल्या धर्माचे रक्षण करा. नाहीतर कुणीही ऊठ सूठ तुमच्या धर्माचा अपमान करेल आणि तुम्ही षंढासारखं ते सहन कराल.
(साभार - वायुवेग)
मुग्धा कर्णिक यांच्या विरुद्ध वारकऱ्यांनी तक्रार करूनही आजवर त्यांना अटक झालेली नाही. भाजप सरकार त्यांना का पाठीशी घालते आहे ? हेच जर अल्ला व येशुबाबत कुणी बोलले तर सरकार तक्रारीची वाट न पहाता कारवाई करते. मुग्धा कर्णिक यांचे वक्तव्य सरकारला योग्य वाटत असेल तर श्री विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा सरकार मधील मंत्र्यांना काहीही अधिकार नाही. जर विठ्ठल आऊटडेटेड तर या निवडणुकीत सरकारही आऊटडेटेड…
Vikram Bhave
04 Apr 2026 09:39
संतश्रेष्ट तुकोबाराय यांच्या पालखीमागे आमची चिंतामणी प्रासादिक दींडी क्र . 30 नंबर गेली ३८ वर्षे चालत आहे . संत तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचा कळस आहेत त्यांचा गाथा पाचवा वेद समझला जातो . त्यांचा एक अंभग आहे ' भले देऊ तरी कासेची लंगोटी नाहीतर नाठाळ्यांच्या माथी हाणु काठी ' या उक्ती प्रमाणे या नास्तीक कर्णीक बाईला आता सविधानत्मक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे .कोणीही अज्ञानी जीवाने उठावे आणी हींदुच्या संतांवर खालच्या भाषेत बोलावे हेच ती मुस्लीम धर्मीया विरुद्ध का बोलत नाही . सनातन धर्म की जय??
हभप. दतात्रय चोरघे महाराज..
02 Apr 2026 10:17
मुग्धा कर्णिक, तारा भवाळकर व तत्सम तथाकथित अतिशिक्षित पुढारलेले dhongi निधर्मी विचारवंत हिंदू समाजाला लागलेली कीड आहे आणि त्यावर जालीम उपाय शोधले पाहिजेत
Janardan Babulal Sinkar
02 Apr 2026 09:03
मुग्धा कर्णिक, तारा भवाळकर अशासारखे tathe कथित पुढारलेले अतिशिक्षित ढोंगी निधर्मी विचारवंत ही हिंदू समाजाला लागलेली कीड आहे या किडीवर जालीम उपाय शोधले पाहिजेत.
Janardan Babulal Sinkar
02 Apr 2026 09:00
https://youtu.be/HIqKPK6xhis?si=9ndAR1giAaKnqvNv
जयंत देशपांडे
01 Apr 2026 19:25
https://youtu.be/HIqKPK6xhis?si=9ndAR1giAaKnqvNv
जयंत देशपांडे
01 Apr 2026 19:25