एक असाही महिला दिन
धक्कादायक..! धर्मांतरासाठी महिलांवर अत्याचार
मुस्लिमबहुल भागात हिंदू महिला असुरक्षित; देशभरातील महिला रिपोर्ट
राजस्थानमधील मेवात असो की अलवर, अगदी महाराष्ट्रातील जळगाव आणि मालेगावातही धर्मांतरासाठी हिंदू महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना नव्या नाहीत. अलवरच्या ग्रामिण भागात तर मुलींना चक्क मुलांचे कपडे घालून वावरावे लागत आहे. संध्याकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे शक्य नाही. या अत्याचारांच्या घटनांबद्दल दैनिक भास्करने केलेला ग्राउंड रिपोर्ट सर्वांचेच डोळे उघडणारा आहे. लोकसंख्येचा असमतोल केवळ हिंदूंच्या घटत्या संख्येपुरता मर्यादित नाही. तर महिलांच्या सुरक्षेशी संबंधीत आहे. निदान महिला दिनी तरी आपण याची जागृती करणार आहोत का नाही?
अलवरमध्ये एका वर्षात ६४८२ महिलांवर अत्याचार ः
राजस्थानातील अलवरच्या ग्रामिण भागात मुस्लिमांचे प्रमाण हे ८० टक्क्याहून जास्त झाले आहे. तिथे २०२४ या वर्षात ६ हजार ४८२ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. जवळपास सर्वच प्रकरणात पिडीत ही हिंदू युवती, तर अत्याचार करणारे मुस्लिम युवक होते! दैनिक भास्करच्या महिला पत्रकार प्रेरणा सहानी आणि पूजा शर्मा यांनी स्वतः याविषयी ग्राउंड रिपोर्ट केला आहे. त्यात समोर आलेली माहिती धक्कादायक असून, देशातील इतर मुस्लिम बहुल भागातही समान धागा दिसत आहे. हिंदूंचे जीवन असुरक्षित करत धर्मांतरासाठी दबाव टाकण्याची ही जूनी आणि सर्वश्रुत पद्धत आहे. महाराष्ट्रातील मालेगाव आणि जळगावमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. जळगावातील पाळधी येथे दोन गटात झालेल्या मारामारीची पार्श्वभूमी ही अशाच प्रकारची होती.
हिंदू घरे दहशतीत ः
अलवर येथील परिस्थितीचे वर्णन करताना पत्रकारांनी हिंदू घरे दहशतीत असल्याचे सांगितले. तुलेडा येथील मालिवास परिसरामध्ये रात्री घरातील पुरूष हे जागता पहारा देतात. ज्यासाठी ते घराच्या वऱ्हांड्यातच झोपतात. जेणेकरून घरावर काही हल्ला झाला तर तातडीने प्रतिकार करता येईल. तसेच या भागातील मुलींची १४ व्या वर्षीच लग्न केली जात असल्याचे स्थानिक सरपंचांनी सांगितले. मुलींवरील अत्याचाराच्या घटना पाहता शाळेत जर एखादी मुलगी पोहचली नाही. तर तातडीने पालकांना कळवावे, असे आदेशाच शाळांना दिल्याचे बामोलीचे सरपंच बब्बल यादव यानी दैनिक भास्करला सांगितले आहे.
महिला सातच्या आत घरात...
भास्करला दिलेल्या मुलाखतीत स्थानिक हिंदू महिलांनी दहशतीचे वर्णन केले आहे. संध्याकाळी सुर्यास्तापूर्वीच सर्व मुली घरात हव्यात. मुस्लिम बहुल भागात महिलांना जाण्यापासून जवळपास मज्जावच आहे. रामगढ, नौगावा, बगड तिहारा, एमआयए आदी परिसरात अत्याचाराच्या घटना जास्त असून, महिला पत्रकारांनाही त्या भागात जाऊ नका असा सल्ला स्थानिकांनी दिला होता. गांभिर्याची बाब म्हणजे घरात मुलगी असेल तर तिला मुलाप्रमाणे वागवले जाते. तिचे कपडे एवढंच काय केसांची रचनाही मुलासारखी आहे. नराधमांपासून वाचविण्यासाठी हिंदू कुटुंबे आज संघर्ष करत आहेत.
हिंदू असुरक्षित तर महिला असुरक्षित ः
हिंदू कुटुंबांच्या धर्मांतरासाठी सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला जात आहे. लॅंड जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ कायद आदी घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. सुरूवातील प्रॉपर्टी घेणे त्यानंतर मुस्लिमांची संख्या वाढविणे आणि नंतर अल्पसंख्यांक झालेल्या हिंदू समाजावर अत्याचार करणे, ही देशभरातील धर्मांतराची कार्यपद्धती दिसते. अल्पसंख्यांक झालेल्या हिंदू समाजाचा विरोध अपुरा पडतो. एक तर हिंदू स्थलांतरीत करतो किंवा जाचाला कंटाळून धर्मांतर तरी करतो. मात्र, धर्मांधतेच्या माध्यमातून हिंदू स्त्रियांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. त्याविषयी आजच जागृती होणे गरजेचे आहे.
-----------------
आकडे बोलतात...
अलवरमधील महिला अत्याचाराच्या घटना
(संदर्भ ः दैनिक भास्कर ग्राउंड रिपोर्ट, अलवर)
संदर्भ ः https://www.bhaskar.com/local/rajasthan/alwar/news/wherever-i-saw-alwar-countryside-there-was-terror-of-rapists-134318887.html